हॉकी वर्ल्ड कप : रोमांचक लढतीत भारताचा पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

भारत विरुद्ध न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

ओडिशात सुरु असलेल्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत यजमान भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. अतिशय चुरशीच्या क्रॉसओव्हर लढतीत न्यूझीलंडने भारतावर 5-4 असा विजय मिळवला.

चौथ्या क्वार्टरनंतर 3-3 अशी बरोबरी होती. बरोबरीचा तिढा सोडवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. पेनल्टी शूटआऊटमध्येही स्कोअरकार्ड 3-3 असंच राहिलं. सडन डेथ मध्ये न्यूझीलंडने शिताफीने खेळ करत 5-4 अशी बाजी मारली. न्यूझीलंडसमोर आता बेल्जियमचं आव्हान असणार आहे.

सडन डेथमध्ये न्यूझीलंडला पहिली संधी मिळाली पण त्यांना गोल करता आला नाही. भारतालाही या संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही.

दुसऱ्या संधीत मात्र न्यूझीलंडने गोल केला. तेव्हाही मुकाबला बरोबरीत होता. तिसऱ्या संधीतही न्यूझीलंडने गोल केला. यावेळी प्रत्युत्तरात भारतीय संघ गोल करु शकला नाही. भारताचा गोलकीपर श्रीजेशला झालेली दुखापतही न्यूझीलंडच्या पथ्यावर पडली.

निर्धारित वेळेत भारताकडून ललित उपाध्याय, सुखजीत आणि वरुण कुमार यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात खेळणाऱ्या भारतीय संघाने तुल्यबळ न्यूझीलंडला कडवी टक्कर दिली.

न्यूझीलंडकडून सॅम लॅनने 28व्या मिनिटाला तर केन रसेलने 43व्या मिनिटाला गोल केला. तिसरा आणि निर्णायक गोल सीन फिंडलेने केला आणि न्यूझीलंडने बरोबरी केली.

क्वार्टरफायलनमध्ये प्रवेशासाठी भारतीय संघाला ही लढत जिंकणं अनिवार्य होतं. भारतीय संघ 2010 नंतर वर्ल्डकप स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारु शकलेला नाही. 24 जानेवारीला न्यूझीलंड-बेल्जियम मुकाबला होईल.

याआधीच्या क्रॉसओव्हर लढतीत स्पेनने मलेशियाला नमवलं.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 44 सामने झाले असून भारताने 24मध्ये विजय मिळवला आहे तर न्यूझीलंडला 15च सामन्यात विजय मिळवता आला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)