दोन्ही पाय गमावले तरी एव्हरेस्ट सर करून इतिहास रचला

हरी बुद्धा मागर, माऊंट एव्हरेस्ट
फोटो कॅप्शन, हरी बुद्धा मागर

ब्रिटिश लष्करातील निवृत्त गोरखा जवान हरी बुद्धा मागर यांनी नवा विक्रम रचलाय.

दोन्ही पाय गमावलेले असताना देखील त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलाय. अफगाणिस्तानात तैनात असताना त्यांनी आपले दोन्ही पाय गमावले होते.

दोन्ही पाय नसताना देखील एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले गिर्यारोहक ठरले आहेत.

43 वर्षीय हरी बुद्धा मागर ब्रिटनमधील कॅंटरबरी शहरात वास्तव्यास आहेत. इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि अपंगत्वाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी हे आव्हान स्वीकारलं.

त्यांच्या टीमने सांगितलं की, मागर यांनी भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री 8.30 च्या दरम्यान एव्हरेस्टचं शिखर गाठलं.

त्यांनी सॅटेलाइट फोनवर बोलताना सांगितलं की, "मला जितकं वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने हे अवघड होतं."

ते पुढे म्हणाले की, "कितीही वेदना झाल्या किंवा कितीही वेळ लागला तरी तुम्हाला शिखराकडे मार्गक्रमण करावं लागतं."

'सर्व काही शक्य आहे'

हरी बुद्धा मागर, माऊंट एव्हरेस्ट
फोटो कॅप्शन, एव्हरेस्ट

2010 मध्ये अफगाणिस्तानात तैनात असताना त्यांचा पाय आयईडीवर पडला आणि स्फोटात त्यांनी आपले पाय गमावले.

मागर यांना तीन मुलं आहेत. ते सांगतात की, स्फोटानंतर शुद्धीवर आल्यावर मला माझं आयुष्य संपल्यासारखं वाटलं होतं. पण स्कीइंग, गोल्फ, सायकलिंग आणि गिर्यारोहणामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला.

त्यांनी 11 दिवसांपूर्वी नेपाळी गिर्यारोहकांच्या टीमसोबत चढाईला सुरुवात केली होती. कृष थापा या टीमचं नेतृत्व करत होते. थापा स्वत: माजी गोरखा सैनिक आणि एसएएस माउंटन ट्रुप लीडर होते.

मागर सांगतात की, जेव्हा परिस्थिती खडतर व्हायची तेव्हा मी कुटुंबीयांची आणि मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आठवण काढायचो. यातून मला पुढे जाण्यासाठी ताकद मिळायची.

ते म्हणतात, "लोकांची अपंगत्वासंबंधीची धारणा बदलणं आणि इतर लोकांना प्रेरणा देणं हे माझं ध्येय होतं."

"तुमची स्वप्न किती मोठी आहेत किंवा तुम्हाला कोणतं अपंगत्व आहे हे महत्वाचं नाही. तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता."

हरी मागर याच आठवड्यात ब्रिटनला परतणार आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)