You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘डॉक्टर म्हणाले मी कधीच चालू शकणार नाही’, लाफिंग गॅसचं व्यसन लागलेल्या मुलीची गोष्ट
25 वर्षांच्या एका मुलीला लाफिंग गॅसचं व्यसन लागलं. हे व्यसन एका मर्यादेपलिक़डे गेल्यावर तीला आता चालणंच शक्य राहिलेलं नाही. तसंच तिला रुग्णालयात 6 आठवडे उपचार घ्यावे लागले.
लाफिंग गॅस म्हणजे नायट्रस ऑक्साईड. या वायूमुळे केअरफिली येथे राहाणाऱ्या मोली नावाच्या मुलीला हा त्रास झाला. ती सांगते लाफिंग गॅसमुळे तिच्या मज्जारज्जूचा दाह झाला आणि मेंदूचीही हानी झाली.
नायट्रस ऑक्साईड हा धातूच्या पात्रात बंद करुन विकला जातो. अनेक देशांमधील तरुणाई त्याच्या व्यसनाला बळी पडली आहे.
लाफिंग गॅस आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्यामुळे होणाऱ्या तोट्यांवरही सर्वांचं लक्ष गेलं आहे.
गेल्याच महिन्यात यावर बंदी आणण्याची घोषणा युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली.
परंतु बंदी घालणं ही योग्य गोष्ट नसल्याचं मॉलीचं मत आहे.
कोव्हिडच्या साथीत एकटं पडल्यामुळे आणि खालावलेल्या मानसिक आरोग्यावर उतारा म्हणून मी हा वायू खरेदी करायला सुरुवात केली असं ती सांगते.
“एका आठवड्याला मी दहा बॉक्सेस खरेदी करायचे. एका बॉक्समध्ये 24 लहान कॅन्स असायचे.”
काही महिन्यांनी कामावर जाण्यासाठी निघाली असता मॉलीला आपल्याला चालताच येत नसल्याचं लक्षात आलं.
रुग्णालयात गेल्यावर तिच्या मज्जारज्जूचा दाह झाल्याचं आणि नसांचं नुकसान झाल्याचं लक्षात आलं. हे सगळं मेंदूला ऑक्सिजन कमी पुरवल्याने झालं होतं.
तेव्हा एका डॉक्टरांनी तिला तू लाफिंग गॅस वापरतेस का विचारलं तेव्हा मी हो सतत वापरते असं उत्तर दिलं होतं.
तेव्हा डॉक्टरांनी ती कदाचित पुन्हा कधीच चालू शकणार नाही असं तिच्या पालकांना सांगितलं. त्यामुळे ती चांगलीच भयभित झाली होती.
व्हीटॅमिन बी 12 च्या चयापचयात हस्तक्षेप करुन या पदार्थामुळे मज्जासंस्था बिघडू शकते. तसेच त्यामुळे मज्जातंतूंवरील संरक्षक आवरण खराब होऊ शकतं
मोलीने सहा आठवडे उपचार घेतले. ती बसं झाली तरिही तिला हाता पायात कंप जाणवतो.
“मी एक चांगली धावपटू होते, मी नाच करायचे पण आता काहीच करू शकत नाही”, असं ती सांगते.
या सगळ्या अनुभवामुळे नर्स होण्याची प्रेरणा तिला मिळाली.
“मी रुग्णालयात असताना मी कोणाशी तरी बोलत होते. तेव्हा त्यांनी तुझ्यात नर्स होण्याचे चांगले गुण आहेत असं सांगितलं.”
“यासगळ्या अनुभवातून ही एकमेव चांगली गोष्ट म्हणजे नर्स होण्याची प्रेरणा मिळणं हीच म्हणावी लागेल”, असं मॉली सांगते.
लाफिंग गॅसमुळे काय होतं?
लाफिंग गॅस हे धातुच्या बुधलीवजा कॅनमधून विकतात. तो मनोरंजनासाठी म्हणजे रिक्रिएशनल पर्पजसाठी वापरला जातो. आणि तो शोषून घेताना फुग्यांचा वापर करतात.
- यामुळे लोकांना रिलॅक्स झाल्यासारखं किंवा डोकं रिकामं झाल्यासारखं किंवा गरगरल्यासारखं वाटतं.
- त्यामुळे डोकं दुखू शकतं, चिंता वाटू लागते किंवा ती व्यक्ती शंकेखोर होते. त्याचा वापर जास्त केल्यास चक्क येऊ शकते किंवा भान हरपू शकतं.
- सततच्या वापरामुळे बी 12 ची कमतरता निर्माण होते आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो.
- याच्या त्रासाचं मुख्य साधारण लक्षण म्हणजे हाता-पायांत बधिरपण येणं, थरथर वाढणं.
- त्याच्यामुळे गुदमरल्यासारखं, श्वास कोंडल्यासारखं वाटू शकतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)