You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गॉगल घातलेल्या या कुत्र्याने वाचवला मालकाचा जीव, पण कुत्र्याला गॉगल घालण्याचं कारण काय?
- Author, मॅट वायगोल्ड आणि हेलन पर्सेल
- Role, बीबीसी रेडिओ स्ट्रोक
कुत्रा पाळणाऱ्या एका व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यातून वाचल्यानंतर मात्र त्यांनी आता त्यांच्या या चार पायाच्या मित्राचे आभार मानले आहेत. मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी या पाळीव प्राण्याचा फार फायदा झाल्याचं ते सांगतात.
स्कॉट संबलँड स्टॅफोर्डशायर मध्ये असलेल्या न्यूकॅसल मध्ये राहतात. त्यांची आणि त्यांच्याकडे असणारी कुत्री मिको यांची ही कहाणी आहे.
2022 मध्ये त्यांची नजर एका आजारी आणि योग्य उपचार न मिळालेल्या कुत्र्याच्या पिलावर पडली. त्याआधी ते मानसिक आजाराच्या समस्येचा सामना करत होते.
त्यांच्या या दोन वर्षांच्या जपानी कुत्रीचं नाव मिको आहे. तिचं डोकं शांत ठेवण्यासाठी आणि डोळे चांगले राहण्यासाठी आणि एकूणच ती निरोगी राहण्यासाठी गॉगल वापरते. मालकासाठी ती एक मोठा आधार आहे.
“तिने खरोखर मला वाचवलं आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी तिचा टॅटू काढला आहे,” तिच्या पायाच्या ठशाचा दंडावर काढलेला टॅटू दाखवत त्यांनी सांगितलं.
मिकोच्या पूर्वायुष्यातही अनेक अडचणी होत्या. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना ती प्रचंड घाबरायची.
“सोफा पाहिला तरी ती घाबरायची, टीव्ही दिसला तरी घाबरायची. अगदी सगळ्या गोष्टींना घाबरायची,” असं संबलँड म्हणाले.
डॉक्टरांनी सांगितलं होतं की, मिकोला अतिनील किरणांचा त्रास होतो. त्यामुळे ती तशी वागत असेल.
त्यामुळं संबलँड काळजीत पडले. या त्रासापासून सुटका करण्यासाठी तिला गॉगल लावायचा निर्णय त्यांनी घेतला.
त्यानंतर तिचं वागणं खूपच सुधारलं.
“त्या गॉगलमुळे तिची सगळी भीती पळाली असं मला वाटलं.” असं मिकोचे मालक सांगतात.
गोंधळात पडलेल्या आजूबाजूच्या लोकांनी संबलँड यांना त्यांच्या कुत्र्याला गॉगल घातल्याबद्दल टीका केली. त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम अकाऊंट काढलं.
“याचा फायदा झाला कारण लोक म्हणाले की हे खरंच छान आहे.”
“गॉगलमुळे तिला सामान्यपणे जगता येत आहे.”
संबलँड म्हणाले की, मानसिक आजार असताना ते दिवसभर झोपून असायचे आणि त्यांना काहीही करायची इच्छा नसायची. मात्र मिको ने त्यांना रोज सकाळी उठण्याची आणि काहीतरी करण्याची प्रेरणा दिली.