ढाक्यातला शेख मुजीबुर रेहमान यांचा पुतळा पाडला, जगभरात 'हे' पुतळे सत्तांतरामुळे जमीनदोस्त

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यावर आणि देश सोडल्यानंतर जमावानं बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्याला निशाणा बनवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यावर आणि देश सोडल्यानंतर जमावानं बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्याला निशाणा बनवण्यात आलं.
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील जनतेत असंतोष निर्माण झाला, हिंसक निदर्शनं झाली आणि शेख हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लोक पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानात शिरले आणि त्यांनी तिथे नासधूस देखील केली.

त्याचवेळेस बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान यांचा पुतळा पाडण्यात आला. त्या पुतळ्याला चपला-बुटांचा हार घालण्यात आला. ही दृश्यं सर्व जगानं पाहिली.

महत्त्वाची बाब म्हणजे शेख मुजीबुर रेहमान यांच्या नेतृत्वाखालीच बांगलादेश मुक्ती संग्राम झाला होता. त्यांच्यामुळेच पाकिस्तानपासून वेगळं होत स्वंतत्र बांगलादेशची निर्मिती झाली होती.

त्यामुळे बांगलादेशातच शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्याची अशाप्रकारे मोडतोड करण्यात येणं ही खूपच धक्कादायक बाब होती. कारण बंगबंधू या नावानं ओळखल्या जाणाऱ्या शेख मुजीबुर रेहमान यांना बांगलादेशचा राष्ट्रपिता मानलं जातं.

मात्र, असं जगात पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधीही अशा घटना घडल्या आहेत, ज्यात त्या देशातील नेत्यांच्या पुतळ्यांना पाडण्यात आलं आहे, त्यांची विटंबना करण्यात आली आणि जनतेनं त्या पुतळ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, हे पुतळे ज्या नेत्यांचे होते, ते त्या देशातील सर्वोच्च नेते होते. कधीकाळी जनतेनं त्यांना डोक्यावर घेतलं होतं.

बगदादमध्ये सद्दाम हुसैन यांचा पुतळा पाडण्यात आला

2003 मध्ये अमेरिकन सैन्य, रणगाडे बगदादमध्ये शिरले आणि त्यांनी सद्दाम हुसैन यांचं सरकार बरखास्त केलं होतं. त्यावेळेस इराकमध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं.

त्यावेळेस इराकी लोकांनी फिरदौस स्क्वेयरमध्ये असलेला सद्दाम हुसैन यांचा भव्य पुतळा पाडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, यामध्ये त्यांना यश आलं नाही. तेव्हा तिथे पोहोचलेल्या अमेरिकन सैनिकांनी पुतळा पाडण्यासाठी त्यांना मदत केली होती.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकन सैनिकांच्या मदतीनं बगदादमध्ये इराकचे तत्कालीन राज्यकर्ते सद्दाम हुसैन यांचा पुतळा पाडण्यात आला

सद्दाम हुसैन यांचा हा 12 मीटर उंचीचा पुतळा एप्रिल 2002 मध्ये तयार करण्यात आला होता. अमेरिकन सैनिकांनी पुतळ्याच्या गळ्यात लोखंडी साखळ्या बांधल्या आणि त्याला एम 88 चिलखती वाहनानं खेचलं होतं.

पुतळा पडताच इराकी लोकांनी त्याचे तुकडे गोळा केले आणि त्या तुकड्यांना जोड्यांनी मारत ते बगदादच्या रस्त्यांवरून फिरवले होते. हे दृश्य जगातील सर्वच टीव्ही चॅनलवर लाईव्ह दाखवण्यात आलं होतं.

सद्दाम हुसैन यांची सत्ता संपल्याचं प्रतीक म्हणून या दृश्यांचं प्रसारण करण्यात आलं होतं.

1956 मध्ये हंगेरीत क्रांतीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळेस तिथे स्टॅलिनचा पुतळा पाडण्यात आला होता. त्या घटनेशी सद्दाम हुसैनचा पुतळा पाडण्याच्या घटनेची तुलना करण्यात आली होती.

कर्नल गद्दाफींच्या पुतळ्याचं डोकं तोडण्यात आलं

याचप्रकारे 2011 मध्ये लिबियाचे हुकूमशहा कर्नल गद्दाफी यांच्या विरोधात बंड झालं होतं. त्यावेळेस लोकांनी त्रिपोलीमधील बाब अल अजीजीया कंम्पाउंडमध्ये शिरून गद्दाफी यांच्या पुतळ्याचा डोकं तोडून त्याला पायदळी तुडवलं होतं.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिबियाची राजधानी असलेल्या त्रिपोलीमध्ये 23 ऑगस्ट 2011 ला कर्नल गद्दाफींचा पुतळा पाडण्यात आला होता

23 ऑगस्टला कंपाऊंडच्या गार्ड्सनी बंडखोरांसमोर शरणागती पत्करली होती.

गद्दाफी मारले गेल्यानंतर हे कंपाउंड किंवा परिसर एक प्रकारचं पर्यटन स्थळ बनलं होतं. ते पाहण्यासाठी इथे हजारो लोक येऊ लागले होते.

युक्रेनमध्ये लेनिनचा पुतळा केला होता जमीनदोस्त

28 सप्टेंबर 2014 ला युक्रेनच्या खारकीव शहरात जवळपास पाच हजार निदर्शकांनी रशियाचे जगप्रसिद्ध क्रांतीकारक नेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा पाडला होता. निदर्शकांनी हातोड्यांनी दणके घालून हा पुतळा जमीनदोस्त केला होता.

पुतळा पाडण्यास चार तास लागले होते. 1963 मध्ये हा पुतळा बनवण्यात आला होता. या पुतळ्याचं डिझाइन अॅलेक्झांडर सिदोरेंको यांनी तयार केलं होतं.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

पुतळा पाडल्यानंतर लोकांनी एक आठवण म्हणून त्याचे तुकडे गोळा केले होते.

लोकांनी तिथे युक्रेनचा झेंडा फडकावला होता. यानंतर संपूर्ण देशभरात लेनिनचे पुतळे पाडण्यात आले होते.

केजीबीचे संस्थापक झेरझिंस्की यांचा पुतळा हटवला

अशाच प्रकारे 1991 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यावेळेस मॉस्कोच्या लुब्याँका स्क्वेयरमध्ये असलेला फेलिक्स झेरझिंस्की यांचा पुतळा हटवण्यात आला होता. सोव्हिएत रशियातील अंतर्गत सुरक्षेसाठी असलेल्या चेका या यंत्रणेचे झेरझिंस्की हे संस्थापक होते.

केजीबी ही रशियाची जगप्रसिद्ध गुप्तहेर संस्था होती. केजीबीचंच जुनं स्वरुप आणि नाव म्हणजे 'चेका'. हजारो लोकांचं अपहरण करणं, त्यांच्यावर अत्याचार करणं आणि त्यांना ठार करणं यासारखे आरोप चेकावर होते.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर 22 ऑगस्ट 1991 ला केजीबीचे संस्थापक फेलिक्स झेरझिंस्की यांचा मॉस्कोतील लुबियांस्काया स्क्वेयरमध्ये असलेल्या पुतळ्याला हटवण्यात आलं होतं

22 ऑगस्ट 1991 च्या संध्याकाळी हजारो लोक लुब्याँका स्क्वेयरमध्ये असलेल्या केजीबीच्या इमारतीसमोर गोळा झाले होते.

त्यांनी झेरझिंस्की यांच्या पुतळ्यावर 'खूनी' असं लिहिलं. पुतळ्यावर चढल्यानंतर तो दोरीने बांधण्यात आला. या दोऱ्या ट्रकला बांधून ट्रकद्वारे खेचून तो पुतळा पाडण्याची त्यांची इच्छा होती.

मात्र पुतळा पाडल्यास त्यामुळे शेजारीच असणाऱ्या लुब्याँका मेट्रो स्टेशनच्या इमारतीला धोका निर्माण होणार होता.

त्यावेळेस मॉस्को सिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष सरजेई स्टानकेविच यांनी तिथे जमलेल्या लोकांना उद्देशून म्हटलं होतं की ते स्वत: तो पुतळा हटवण्यासाठी कटिबद्ध आहेत.

यानंतर या पुतळ्याला क्रेनच्या मदतीनं तिथून हटवण्यात आलं आणि 'फॉलन मॉन्युमेंट पार्क' मध्ये ठेवण्यात आलं.

जॉर्ज तृतीय यांचा लोखंडी पुतळा तोडून त्याच्या गोळ्या बनवल्या

अमेरिकेच्या स्वांतत्र्ययुद्धाच्या वेळेस न्यूयॉर्कमध्ये ब्रिटनचे राजे जॉर्ज (तृतीय) यांचा लोखंडी पुतळा देखील पाडण्यात आला.

स्वातंत्र्ययुद्ध लढणाऱ्या अमेरिकन लोकांच्या दृष्टीनं हा पुतळा म्हणजे ब्रिटिश अत्याचाराचं प्रतीक होता.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

पुतळा पाडल्यानंतरच्या काळात तो वितळवण्यात आला. त्यापासून 42 हजार गोळ्या बनवण्यात आल्या होत्या आणि त्या गोळ्यांचा वापर ब्रिटिश सैन्याविरोधात लढताना करण्यात आला होता.

ब्रिटनशी एकनिष्ठ असलेल्या काही लोकांनी त्या पुतळ्याचे काही भाग वाचवण्यासाठी त्यांना जमिनीत पुरले होते. आजदेखील खोदकाम केल्यास कधी कधी त्या पुतळ्याचे काही भाग किंवा अवशेष सापडतात.

मुसोलिनीच्या पुतळ्यांची मोडतोड

1945 मध्ये इटलीचे हुकूमशहा मुसोलिनी यांची सत्ता गेली. तेव्हा मुसोलिनी, त्यांचे काही समर्थक आणि त्यांची मैत्रीण क्लारा पिटाची यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

त्यांचा मृतदेह एका व्हॅनमध्ये ठेवून मिलान शहरात नेण्यात आला. तिथे एका खांबाला तो मृतदेह उलटा टांगण्यात आला होता.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

यानंतर कित्येक महिने, मुसोलिनी आणि त्यांच्या हुकूमशाहीचे प्रतीक असलेली स्मारकं, इमारती आणि पुतळे पाडण्यात येत होते किंवा त्यांची तोडफोड केली जात होती.

किंग जॉर्ज पाचवा यांचा पुतळा इंडिया गेटवरून हटवण्यात आला

ब्रिटिश काळात दिल्लीत अनेक ठिकाणी ब्रिटिश साम्राज्याशी संबंधित लोकांचे पुतळे होते. 1947 मध्ये भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर त्यातील काही पुतळे ब्रिटनमध्ये परत पाठवण्यात आले. तर काही पुतळ्यांना दिल्लीतील कोरोनेशन पार्कमध्ये हलवण्यात आलं होतं.

अनेक पुतळे हटवण्यात आले. त्यामध्ये इंडिया गेटवर असलेला किंग जॉर्ज पाचवा यांचा 70 फूट उंचीचा पुतळा हा सर्वात मुख्य पुतळा होता.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंडिया गेटवर असलेल्या जॉर्ज पाचवा याच्या 70 फूट उंच पुतळ्याला 1960 च्या दशकात हटवण्यात आलं होतं

1968 पर्यंत हा पुतळा आपल्या आधीच्या ठिकाणीच होता. मग मात्र असा विचार करण्यात आला की दिल्लीत इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी हा पुतळा राहणं योग्य ठरणार नाही.

मात्र, हा पुतळा तोडण्यात आला नाही तर त्याला दुसऱ्या जागी हलवण्यात आलं. हे ठिकाण म्हणजे 1911 मध्ये जॉर्ज पाचवा यांनी दिल्ली दरबारात जिथे हजेरी लावली होती ती जागा.

कधीकाळी इंडिया गेटजवळ जॉर्ज पाचवा यांचा पुतळा ज्या जागी होता, त्या जागी 2022 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात आला.

हैतीचे हुकूमशहा डुवैलियर यांचा पुतळा देखील तोडला गेला

1971 मध्ये हैतीचा हुकूमशहा फ्राँसुआ डुवैलियर याचं निधन झालं. त्यावेळेस त्याला काळा कोट घालून काचेचा टॉप असलेल्या शवपेटीत दफन करण्यात आलं होतं.

त्याचा मृतदेह आधी राष्ट्रीय कब्रस्तानात दफन करण्यात आला. नंतर तिथून हलवण्यात आला आणि त्याच्याच मुलानं बनवलेल्या ग्रॅनडियोस संग्रहालयात त्याचं दफन करण्यात आलं.

मृत्यूपूर्वी त्याने आपल्या 19 वर्षांच्या मुलाला म्हणजे ज्यां क्लाउड डुवैलियर याला आपला वारसदार म्हणून घोषित केलं होतं. 1986 मध्ये त्याच्या मुलाला सत्ता सोडावी लागली. तेव्हा संतापलेल्या जमावानं डुवैलियरचा पुतळा आणि कबर यांची मोडतोड केली होती.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

डुवैलियरची कबर खोदण्यात आली, तेव्हा त्यात असलेली त्याची शवपेटी गायब झालेली होती.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये यासंदर्भात बातमी छापून आली होती की, देश सोडण्यापूर्वी त्याच्या मुलानं आपल्या वडिलांची शवपेटी तिथून इतरत्र हलवली होती.

इथिओपियाची राजधानी असलेल्या आदिस अबाबा शहरात तेथील नगरपालिकेच्या गॅरेजमध्ये लेनिन यांचा पुतळा जमिनीवर पडलेला आहे. पुतळ्याच्या अवतीभोवती कोळ्यांची अगणित जाळी आणि पेट्रोलचे रिकामे पिंप पडले आहेत.

फार थोडे लोक तो पुतळा पाहण्यासाठी जातात. त्यातही जे तिथे जातात त्यांना तिथे असलेले कर्मचारी इशारा देतात की लेनिन यांना उठवण्यात येऊ नये.

ढाक्यात शेख मुजीब यांचा पुतळा पाडण्यात आला; जगभरात यापूर्वी असं कधी घडलं आहे?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हैतीचे हुकूमशहा फ्राँसुआ डुवैलियर यांच्या मृत्यूनंतर काचेचा टॉप असलेल्या शीतपेटीत दफन त्यांचं करण्यात आलं होतं.

लेनिन यांचा तो पुतळा फक्त मोठाच नाही तर खूप जड देखील आहे. हा पुतळा खाली पाडणं हे खूपच मेहनतीचं काम होतं. दोऱ्यांमुळे तो पुतळा हलत देखील नव्हता. त्यामुळे तो पुतळा जागेवरून हटवण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात आला होता.

नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि जर्मनीचं एकीकरण झालं. त्यानंतर जगभरात असणाऱ्या लेनिनच्या पुतळ्यांना अनेकदा पाडण्यात आलं आहे.

याचप्रकारे अल्बानियामध्ये 40 वर्षे सत्तेवर असणाऱ्या एनवर होक्सा यांच्या अनेक पुतळ्यांना देखील जमीनदोस्त करण्यात आलं होतं.