You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भीती वाटल्यावर हृदयाची धडधड का वाढते, पोटात गोळा का येतो? समजून घ्या शरीर आणि भावनांचे नाते
- Author, मॅट वॉरेन आणि मिरियम फ्रँकेल
- Role, फीचर्स प्रतिनिधी
कधी कधी आपलं शरीर आपल्याला समजण्यापूर्वीच बाहेरील जगाबाबत आपली प्रतिक्रिया देतं असतं.
मग अशावेळी हृदयाची वेगानं होणारी धडधड किंवा दीर्घ श्वासोच्छ्वासारख्या आंतरिक संकेतांचा आपल्या विचारांवर कसा परिणाम होत असेल?
17 वर्षीय अॅलेक्स मेसेंजर हा प्रवासाला निघाला होता. प्रवासाचा त्याचा 29 वा दिवस होता. त्यानं कॅनडाचं सबआर्क्टिक ओलांडून 600 मैल (966 किमी) प्रवासाचा टप्पा पार केला होता. या प्रवासात अॅलेक्सवर एका अस्वलानं हल्ला केला.
2005 मध्ये त्या दिवशी तो जवळच्या शिखरावर ट्रेकिंगसाठी कॅम्पमधून एकटाच बाहेर पडला. शिखरावर जात असताना तो त्याच्या तंद्रीतच पुढं चालला होता.
त्याच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते. शाळेत असताना तो वाचत असलेल्या द लायर्स क्लब पुस्तकाबाबत, त्यानं सोबत घेतलेल्या कॅमेरा केसचं वजन याचा विचार करत वाटेत येणाऱ्या रंगीबेरंगी छोट्या फुलांचा तो आनंद घेत पुढं निघाला होता.
दिवास्वप्नात मग्न असलेला अॅलेक्स चालत असताना, त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं एक अस्वलही येत होता.
शेवटी जेव्हा ते समोरासमोर आले तेव्हा अॅलेक्सच्या शरीराआधी त्याच्या मनानं प्रतिक्रिया दिली.
तो म्हणाला, "मी जेव्हा त्याकडं पाहिलं, तेव्हा एक तपकिरी रंगाचा गोळा माझ्याकडे येताना मला दिसला. ते काय आहे हे मला समजलं नाही, माझ्या शरीरावर ताण आला. माझ्या श्वासाचा वेग वाढला, डोळे छोटे झाले, माझं हृदय धडधडू लागलं."
'भावना शरीरातून जन्म घेतात'
या घटनेला जवळपास 20 वर्षे झाली आहेत आणि अॅलेक्सनं त्याच्या आठवणी "द ट्वेन्टी-नाइन्थ डे" या आत्मकथेत लिहिल्या आहेत.
अॅलेक्सला अजूनही आठवतं की त्याच्या जागरुक मेंदूला त्याच्या शरीरानं दिलेले संकेत समजून घेण्यासाठी किती वेळ लागला. तो म्हणतो, "ही अवचेतन (Subconscious) शारीरिक प्रतिक्रिया होती. त्यानंतर माझी बौद्धिक आणि भावनिक प्रतिक्रिया आली."
सुरुवातीला, त्याला तो 'तपकिरी गोळा' एक मोठ्या आकाराचा बैल वाटला. पण नंतर जेव्हा त्याला तो प्राणी स्पष्ट दिसू लागला, त्यावेळी त्याच्या शरीरानं समोरचा धोका ओळखून त्याचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार केलं.
एक भयंकर आक्रमक असा 600 पौंड (272 किलो) वजनाचा शिकारी. त्या अस्वलानं त्याच्यावर थेट हल्ला केला. त्याला जोरानं धडक मारुन जमिनीवर फेकलं. भल्यामोठ्या जबड्यानं अॅलेक्सच्या मांडीचा वेध घेतला. ज्यामुळं अॅलेक्सची शुद्ध हरपली. मग तो अस्वल त्याला तिथं तसेच सोडून गेला.
अॅलेक्सचा हा अनुभव फक्त एक चमत्कारीकपणे जगण्याची कथा नाही. ते आपल्या कधीकधी दुर्लक्ष केलेल्या अंतर्गत संवेदनांवर देखील प्रकाश टाकतात.
इंटरोसेप्शन आपल्याला पाच 'बाह्य-संवेदनशील' (exteroceptive) संवेदनांची ओळख करुन देतं. दृष्टी, गंध, ऐकणं, चव आणि स्पर्श हे आपल्या शरीरातून येणाऱ्या संकेतांना (Signals) समजून घेण्याची आणि त्यांचं विश्लेषण करण्याची आपली क्षमता असते.
हे केवळ आपलं शरीर 'होमिओस्टॅसिस' (Homeostasis) किंवा संतुलित कार्यप्रणालीमध्ये ठेवण्यास मदत करत नाही (जसं की रक्तदाब आणि ग्लुकोज स्तरांना नियंत्रित करणं किंवा आपल्याला अन्न किंवा पाणी पिण्यास प्रवृत्त करणं) तर ते आपल्या विचारांवर, भावना आणि मानसिक आरोग्यावर देखील खोल परिणाम करु शकतं.
अॅलेक्स मेंसेजरच्या अस्वलाबरोबरच्या अनुभवाच्या एक शतकापूर्वी, अमेरिकन तत्वज्ञानी आणि मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स आपल्या भावनांना आकार देण्यामध्ये शारीरिक संकेतांची भूमिका शोधत होते.
त्यांनी असा युक्तिवाद केला की, एक बलाढ्य अस्वल अचानक समोर आल्यानंतर आपलं हृदय धडधडतं कारण आपण घाबरलेलो असतो.
ॲलेक्स मेसेंजर यांच्या अनुभवावरून असं दिसतं की, जोखीम पाहून आपलं शरीर अॅड्रेनालाईनने भरतं. त्यामुळं हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास तीव्र होतो आणि त्या धोक्याला प्रतिसाद देतं.
त्यानंतर आपण या शारीरिक संकेतांचा भीती म्हणून अर्थ लावतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं म्हटलं तर भावना शरीरातून जन्म घेतात.
'आपले विचार कल्पनाशक्तीवरही प्रभाव टाकतात'
विल्यम जेम्स यांनी 1884 मध्ये लिहिलेल्या "व्हॉट इज अॅन इमोशन?" या निबंधात म्हटलं आहे की, "आपल्याला वाईट वाटलं की आपण रडतो, मारलं म्हणून आपल्याला राग येतो, आपल्याला भीती वाटली की आपण थरथरतो."
जेम्स-लँज (कार्ल लँज हे समान कल्पनांवर स्वतंत्रपणे काम करणारे तज्ज्ञ होते) यांच्या भावनेच्या सिद्धांतावर जोरदार चर्चा झाली. हा सिद्धांत विकसित झाल्यानंतर "मूल्यांकन सिद्धांत" मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, घटनेतील संदर्भ देखील आपल्या भावनात्मक संकेतांना कसा आकार देतात हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
जर एखाद्या दूरच्या वाळवंटात अस्वलाशी सामना करण्याऐवजी अॅलेक्स मेसेंजरचे हृदय रोलर कोस्टरवर किंवा त्याच्या पहिल्या डेटवर धडधडू लागले असते, तर त्यानं त्याच्या शारीरिक संकेतांचे वेगळ्या पद्धतीनं "मूल्यांकन" केलं असतं. त्यावेळी त्याला भीतीऐवजी उत्साह, उत्तेजना अनुभवता आली असती.
तरीही, जेम्स यांनी मेंदू आणि शरीर यांच्यातील घनिष्ठ नातेसंबंधांबद्दल आपण कसा विचार करतो याचा प्रारंभिक पाया रचला आहे.
दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि न्यूरोलॉजीचे प्राध्यापक अँटोनियो दमासिओ यांच्या मते: "आपले विचार, आपल्या भावना आणि इच्छा केवळ आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या कल्पनाशक्तीवरही प्रभाव टाकतात. आपली सर्व मानसिक क्रिया शरीर आणि मेंदूच्या परस्परसंवादाचा परिणाम आहे."
आमचं अलीकडील पुस्तक, आर यू थिंकिंग क्लिअरली? साठी आम्ही विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकणारे आणि त्याला नियंत्रित करणाऱ्या अनेक गोष्टी तपासून पाहिल्या.
जसं की, आनुवंशिकता, सवयी आणि ह्युरिस्टिकपासून ( प्रश्न सोडवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती) तंत्रज्ञान, वेळ आणि आपल्या आतड्यातील बॅक्टेरियापर्यंत. ही गूढ आंतरिक भावना, वेगानं वाढत असलेल्या संशोधन क्षेत्राचा विषय आहे, हे सर्वात आकर्षक ठरले.
लंडनच्या रॉयल हॉलोवे युनिव्हर्सिटीमध्ये इंटरोसेप्शन आणि त्याच्या अनुभूतीचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो यावर संशोधन करणाऱ्या जेनिफर मर्फी म्हणतात, "इंटरोसेप्शन म्हणजे आतून येणाऱ्या शारीरिक सिग्नल्सची प्रक्रिया आहे. यात तुमच्या हृदयाची धडधड जाणवणं, श्वासोच्छवास आणि तुम्हाला शौचालयात जाण्याची गरज कधी आहे किंवा तुम्ही आजारी आहात, हे जाणून घेण्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो."
भूक आणि परिपूर्णता ही देखील इतर उदाहरणं आहेत.
इंटरोसेप्शनची एक पक्की व्याख्या हा अद्याप वादाचा विषय आहे. परंतु त्यात अंतर्गत संकेतांवर जोर दिला जातो.
मर्फी म्हणतात, "आपण आपल्या श्वासोच्छ्वासाच्या आवाजावरून श्वास घेतोय की नाही हे मोजू शकतो. परंतु हे जाणण्याचा तो एक्सटेरोसेप्टिव्ह मार्ग आहे, इंटरोसेप्टिव्ह नाही."
ओक्लाहोमा येथील लॉरेट इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन रिसर्चमध्ये इंटरोसेप्शनवरील एक प्रमुख संशोधक साहिब खालसा स्वतःचं वर्णन "आतील जागेचा" शोधक म्हणून करतात.
यातील काही शारीरिक सिग्नल्स आपल्या अवयवातून आणि शरीराच्या इतर भागांपासून आपल्या मेंदूपर्यंत गुंतागुंतीच्या "इंटरनेट" द्वारे प्रसारित केले जातात. ज्यात स्पाइनल आणि क्रॅनियल मज्जातंतू आणि रक्तप्रवाहातील रासायनिक घटकांचा समावेश आहे.
ते आपल्या जागरुक मनाला ओळखता येत नाहीत. इतर, जसं की वेगानं धडधडणारं हृदय, चिंता किंवा भूक या अंतर्गत संकेतांबद्दल वेगवेगळ्या प्रमाणात आपण संवेदनशील आहोत आणि आपण सर्वच त्यांचा वेगळ्या पद्धतीनं अर्थ लावू शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो.
खरं तर, शारीरिक सिग्नल्सबद्दलची आपली संवेदनशीलता आणि त्याची जाणीव यातील व्यत्यय ही चिंता आणि नैराश्यापासून अॅनोरेक्सिया नर्वोसापर्यंत असू शकते.
हे आघाडीचे विज्ञान आहे. इंटरोसेप्शन मागील अनेक यंत्रणाचं रहस्य अद्याप कायम आहे. त्यांची चाचणी घेणं कठीण आहे.
'इंटरोसेप्शन संशोधन कठीण'
पण मर्फी, खालसा, सारा गारफिंकेल, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्सचे प्राध्यापक, ससेक्स विद्यापीठातील कॉग्निटिव्ह आणि कम्प्युटेशनल न्यूरोसायन्सचे प्राध्यापक अनिल सेठ आणि ससेक्स येथीलच ह्यूगो क्रिचले यांसारखे संशोधक या विषयावरचा अभ्यास करत एक एक पैलू समोर आणत आहेत. आपण आपल्या मेंदूला कसं समजून घेतो हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.
खालसा म्हणतात, "महासागराच्या तळाशी काय चाललंय याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. तरीही आपल्याला हे माहीत असतं की हवामान कसं आहे. त्याचा तर अंदाज आपण बांधू शकतो. इंटरोसेप्शनच्या बाबतीतही असंच आहे. आपल्या शरीरात काय घडत आहे, याबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. तरीही आपल्याला माहिती आहे की, ते महत्वाचं आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही."
तर मग आपल्या दैनंदिन जीवनात इंटरोसेप्शन कसं लागू होऊ शकतं?
तुमच्या हृदयाचे ठोके घ्या. कदाचित तुम्हाला माहीत असलेल्या शरीराच्या संकेतापैकी एक आहे, ज्याबद्दल तुम्ही जागरुक असता. चिंतेमुळे हृदय गतिमान होऊ शकतं हे सर्वांना मान्य आहे.
परंतु, जेम्स आणि अनेकांनी सुचविल्याप्रमाणं, ही प्रक्रिया देखील उलट झाली आणि हृदयाची गती वाढल्याने चिंता निर्माण होऊ शकते. आपल्याला भीती देखील वाटू शकते?
आपण त्या संकेतांकाचा कसा अर्थ लावतो आणि त्यांना प्रतिसाद कसा देतो याचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
परंतु, अशी गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणं अत्यंत कठीण आहे. प्रा. सेठ म्हणतात, "मला फार पूर्वीपासून काळजी वाटत होती की, अचूक मापन आणि शारीरिक व्हेरिएबल्स किंवा इंटरोसेप्टिव्ह सिग्नल्सच्या हाताळणीच्या अडचणीमुळं इंटरोसेप्शन संशोधन कठीण आहे."
पण मर्फी, खालसा, सारा गारफिंकेल, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्सचे प्राध्यापक, ससेक्स विद्यापीठातील कॉग्निटिव्ह आणि कम्प्युटेशनल न्यूरोसायन्सचे प्राध्यापक अनिल सेठ आणि ससेक्स येथीलच ह्यूगो क्रिचले यांसारखे संशोधक हळूहळू यावरील पडदा मागे घेत आहेत. आपण आपल्या मेंदूला कसं समजून घेतो यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
खालसा म्हणतात, "महासागराच्या तळावर काय चाललंय याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. तरीही आपल्याला हे माहीत आहे की, आपलं हवामान ठरवणं हे महत्त्वाचं आहे.
इंटरोसेप्शनच्या बाबतीतही असंच आहे. आपल्याला आपल्या शरीरात काय घडत आहे, याबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. तरीही आपल्याला माहिती आहे की, ते महत्वाचं आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही."
तर मग आपल्या दैनंदिन जीवनात इंटरोसेप्शन कसं लागू होऊ शकतं?
तुमच्या हृदयाचे ठोके घ्या. कदाचित तुम्हाला माहीत असलेल्या शरीराच्या संकेतापैकी एक आहे, ज्याबद्दल तुम्ही जागरुक असता. चिंतेमुळे हृदय गतिमान होऊ शकतं हे सर्वांना मान्य आहे.
परंतु, जेम्स आणि अनेकांनी सुचविल्याप्रमाणं, ही प्रक्रिया देखील उलट झाली आणि हृदयाची गती वाढल्याने चिंता निर्माण होऊ शकते. आपल्याला भीती देखील वाटू शकते?
आपण त्या संकेतांकाचा कसा अर्थ लावतो आणि त्यांना प्रतिसाद कसा देतो याचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
परंतु, अशी गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणं अत्यंत कठीण आहे. प्रा. सेठ म्हणतात, "मला फार पूर्वीपासून काळजी वाटत होती की, अचूक मापन आणि शारीरिक व्हेरिएबल्स किंवा इंटरोसेप्टिव्ह सिग्नल्सच्या हाताळणीच्या अडचणीमुळं इंटरोसेप्शन संशोधन कठीण आहे."
'विविध संशोधनात काय आढळून आलं?'
तरीही, प्रगती होत आहे. गारफिंकेल यांनी आधीच उघड केलं आहे की, आपल्या भीतीच्या उत्तेजकांचा प्रतिसाद एकाच हृदयाच्या ठोक्यामध्ये बदलू शकतो. अभ्यासात सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या हृदय सिस्टोल (स्नायू आकुंचन पावणे) आणि डायस्टोल (स्नायू शिथिल होणं) अवस्थेत असताना त्यांना भयभीत आणि तटस्थ चेहरे दाखवण्यात आले.
सहभागींनी भयभीत चेहरे अधिक सहजपणे ओळखले. जेव्हा त्यांचे हृदय सिस्टोलमध्ये होते तेव्हा ते अधिक तीव्र वाटले.
त्यांचे अमिग्डालस हे एक भीतीच्या प्रतिसादाशी संबंधित एक प्राथमिक मेंदूचं क्षेत्र आहे. ते देखील अधिक सक्रिय होते. मग मेंदू हृदयाला प्रतिसाद देतो.
पण 2023 मध्ये कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या एका टीमनं यापेक्षा पुढे जाऊन एक अभ्यास प्रकाशित केला. त्यांनी तपासलं की, हृदय गती वाढल्यानं चिंता आणि भीतीची प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते.
संशोधकांनी एक नॉन-इनवेजिव्ह, ऑप्टोजेनेटिक (एक तंत्र जे लाइटचा वापर करून पेशींना नियंत्रित करतं) पेसमेकर वापरून उंदरांच्या हृदयगतीला नेमकेपणानं वाढवलं. त्यानंतर त्यांनी या उंदरांचं निरीक्षण केलं आणि ते चक्रव्यूहाचा आणि पाण्याचा शोध घेण्यासाठी किती इच्छुक होते याचा अभ्यास केला.
याचे परिणाम लक्षवेधक होते. जेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले, तेव्हा उंदीर अधिक चिंताग्रस्त झाले होते. त्यांनी किचकट खुल्या भागाचा शोध घेण्याऐवजी संरक्षित भागात राहण्यास पसंती दिली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा प्रभाव फक्त "जोखमीच्या संदर्भात" आला (उदा. जेव्हा सौम्य धक्का दिला जाण्याचा धोका होता). उंदरांच्या मेंदूचे पूर्ण स्क्रीन वापरुन संशोधकांना या वर्तनाशी संबंधित काही मेंदू क्षेत्र अचूकपणे शोधता आली, ज्यात इन्सुलर कॉर्टेक्स, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि ब्रेनस्टेम यांचा समावेश होता.
"अर्थात, हा उंदरांचा अभ्यास आहे, माणसांचा नाही. त्यामुळं चिंता सारखी वर्तणूक निरीक्षणात येणं याचा अर्थ हा नाही की उंदरांनी खरोखरच चिंता अनुभवली होती," असं प्रा. सेठ सूचित करतात.
"परंतु विशेष निरीक्षण, की ऑप्टोजेनेटिकद्वारे वाढवलेली हृदयगती फक्त जोखमीच्या वातावरणात चिंतेसारखे वर्तन निर्माण करते. हे नेमकं तेच आहे जे क्लासिक अॅप्रेजल थिअरी म्हणजेच मूल्यांकन सिद्धांताद्वारे भाकीत केलं गेलं होतं.
जे जेम्स-लँज यांच्या सिद्धांताला आणखी विस्तारित करतं. यासंदर्भात शरीरविज्ञानाची धारणा भावनांसाठी महत्त्वाची असते."
दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, "मूल्यांकन" किंवा शारीरिक संकेत समजणं आणि त्याचा आपल्या भावनांवरील परिणाम या दोन्हीतील नाते काय आहे हे या अभ्यासातून समजते.
लोक इंटरोसेप्टिव्ह कसं आहेत हे अचूकपणे ओळखायचं, हे या क्षेत्रातील सर्वांत मोठे आव्हान आहे.
मर्फी म्हणतात, "इंटरोसेप्शनमध्ये तुम्हाला आढळणारी पहिली गोष्ट म्हणजे शरीरात नेमकं काय घडत आहे, याकडे लक्ष केंद्रित करणे आणि ते किती गुंतागुंतीचे आहे हे समजून घेणे."
हे संकेत आपल्या शरीराच्या सर्व भागातून म्हणजे आपल्या आतड्यांपासून ते फुफ्फुसांपर्यंत येऊ शकतात. पण इंटरोसेप्टिव्ह क्षमता सामान्यतः सहभागींना त्यांच्या हृदयाचे ठोके मोजायला सांगून नंतर त्यांच्या नोंदवलेल्या परिणामाची तुलना एका उद्देशात्मक मापदंडाशी केली जाते. पण या पद्धतीत अनेक समस्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे सुमारे 40% लोक त्यांच्या हृदयाचे ठोके जाणू शकत नाहीत.
तरीसुद्धा, गारफिंकेल आणि इतरांनी केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, सिटी ऑफ लंडन हेज फंड ट्रेडर्स हे त्यांच्या स्वतःच्या हृदयाचे ठोके अधिक अचूकपणे ओळखू शकतात, ते फायदेशीर निर्णय घेतात आणि दीर्घ करिअरचा आनंद घेतात (हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, अभ्यासाने कारण आणि परिणाम दाखवलेले नाहीत).
'स्त्री आणि पुरुषांच्या क्षमतेत फरक'
दरम्यान, ज्या व्यक्तींना त्यांच्या शारीरिक भावना ओळखण्यात अडचण येते. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करणं आणि त्यांचं नियमन करणे अधिक कठीण होऊ शकतं.
"आमच्याकडे खूप चांगले सिद्धांत आहेत आणि अशी अपेक्षा करण्याचं खूप चांगलं कारण म्हणजे विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या स्थितींमध्ये इंटरोसेप्शनमध्ये गोंधळ होऊ शकतो," असं मर्फी सांगतात.
त्यांनी अलीकडेच विविध पुराव्यांचा आढावा घेतला आहे. या स्थितींमध्ये नैराश्य, चिंता, लठ्ठपणा, अन्नाचे विकार (Anorexia Nervosa) आणि ऑटिझमचा समावेश होतो.
अर्थातच, इंटरोसेप्टिव लोकांची क्षमता कशी असते यामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक आहेत. उदाहरणार्थ, एक सखोल आढावा घेताना मर्फी यांना असं आढळलं की सिसजेंडर पुरुष आणि महिलांमध्ये शारीरिक संकेतांक ओळखण्याच्या क्षमतेत फरक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला त्यांच्या हृदयाचे ठोके समजण्यात कमी सक्षम असल्याचे आढळलं.
याची कारणं अस्पष्ट असली तरी त्यात अनुवांशिकता, हार्मोनल आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश असू शकतो. या निष्कर्षांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना नैराश्य आणि इतर सामान्य मानसिक आरोग्य समस्यांचा अधिक त्रास होतो. मर्फी आता मासिक पाळीत इंटरोसेप्शन आणि मानसिक आरोग्य कसं बदलतं यावर संशोधन करत आहेत.
इंटरोसेप्शन संशोधन विविध स्थितींवरील नवीन संभाव्य उपचारांची देखील माहिती देत आहे. उदा. खालसा यांनी एक कॅप्सूल विकसित केली. यामुळं शास्त्रज्ञांना ॲनोरेक्सिया नर्वोसा असलेल्यांना समजून घेण्यास आणि उपचार करण्यास मदत होऊ शकते.
उदा. जे लोक त्यांच्या शारीरिक संकेतांच्या दृष्टीकोनात अडथळे अनुभवतात आणि ज्यांना अनेकदा थोडंसं खाल्ल्यानंतरही पोट फुगलेलं किंवा पोट भरल्याचं जाणवतं.
गारफिंकेल, क्रिचली आणि सहकाऱ्यांनी, दरम्यानच्या काळात, ऑटिस्टिक प्रौढांमधील चिंतेच्या उपचारांसाठी इंटरसेप्टिव्ह तंत्रज्ञानांचा वापर केला.
ऑटिस्टिक व्यक्ती सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त चिंतेने ग्रस्त असतात. शारीरिक संकेत समजण्यात आणि त्याचा अर्थ लावण्यात आणि भावना समजण्यास ते कमी सक्षम असू शकतात.
एका रँडम नियंत्रित चाचणीमध्ये, ऑटिस्टिक प्रौढांना एकतर नियंत्रण उपचार किंवा "अलाइनिंग डायमेंशन्स ऑफ इंटरोसेप्टिव्ह एक्स्पिरियन्स (Adie)" थेरपी दिली गेली. ज्यात इंटरोसेप्टिव हार्टबीट डिटेक्शन टास्क, त्यांच्या कामगिरीवर अभिप्राय आणि त्यांच्या हृदयाची गती माफक प्रमाणात वाढवण्यासाठी व्यायाम यांचा समावेश होता.
चाचणीनंतर, एडी थेरपीवर असलेल्यांनी नियंत्रण गटाच्या तुलनेत लक्षणीयपणे कमी चिंता नोंदवली. असं दिसतं की, थेरपीनं सहभागींना त्यांच्या शारीरिक सिग्नलचा अधिक अचूकपणे अंदाज आणि त्याचा अर्थ लावला. जसं की हृदय गती वाढणं, ज्यामुळं त्यांना त्यांच्या चिंता नियंत्रित करण्यात मदत झाली.
उल्लेखनीय म्हणजे, आपल्या स्वतःच्या जाणिवेमागे ही आंतरिक भावना देखील असू शकते. शेवटी, प्रा. सेठ स्पष्ट करतात की, आपला सर्वात मूलभूत आत्म्याचा अनुभव "शरीर असणं" आहे.
आपण अनेकदा स्वतःलाच जहाजाचा कॅप्टन मानतो, असं प्रा. सेठ यांनी स्पष्ट करत पुढं म्हटलं की, "कवटीच्या आत एक 'छोटीशी प्रतिकृती' असते. जी पुढं काय करायचं ते ठरवते".
आपण "स्व" म्हणून जे अनुभवतो ती एक प्रक्रिया असते, असं प्रा. सेठ म्हणाले.
बाह्य जगातून आणि कदाचित त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, आपल्या स्वतःच्या शरीरातून येणाऱ्या आंतरिक संकेतांबद्दल मेंदूचा अंदाज आणि त्याच्या प्रत्यक्ष अनुभवांचे एक मिश्रण आहे.
शेवटी, मेंदूचं पहिलं लक्ष्य हे शरीराला आणि म्हणूनच स्वतःला जिवंत ठेवणं हे आहे. पण आपल्या बाह्य परिसराचा नकाशा तयार करणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं आणि शरीरात अनुकूल परिस्थिती राखण्यासाठी (उदा. ग्लुकोजची पातळी जास्त होऊ नये किंवा रक्तदाब खूप कमी होऊ नये म्हणून) सर्वतोपरी प्रयत्न करणं आवश्यक असतं.
'शरीर जे सांगतंय ते ऐका'
मेंदू जगण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषाच्या संपूर्ण श्रेणीवर आधारित शरीराचं मॉडेल तयार करतो. नंतर सतत तो अंदाज बांधतो, ज्याची तो चुकांची तपासणी करतो. त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या संवेदनात्मक संकेतांची दुरुस्ती करतो. ज्यामुळं संपूर्ण प्रणालीचं तो नियमन करू शकेल.
सेठ यांना असा विश्वास आहे की, भावना चांगली किंवा वाईट या थीमवर आधारित असते. शरीराला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी ठेवण्यासाठी "इंटरोसेप्टिव्ह इन्फरन्स" या प्रक्रियेतून बाहेर पडतात.
अॅलेक्स मेसेंजर स्वतः ज्या परिस्थितीत सापडला होता, तिथं पायोनियरिंग सिद्धांत कसा लागू होऊ शकतो?
प्रा. सेठ त्यांचे पुस्तक 'बीइंग यू'मध्ये स्पष्ट करतात की, "अस्वल जवळ येत असताना मला जाणवणारा भीतीचा अनुभव ही माझ्या शरीराची एक नियंत्रण-केंद्रित धारणा आहे. विशेषत: 'जवळ येत असलेल्या अस्वलाच्या उपस्थितीत माझं शरीर' जे माझ्या आवश्यक व्हेरिएबल्सला जिथं असणं आवश्यक आहे, तिथं ठेवण्यासाठी सर्वोत्तम अंदाज घेतात.
महत्त्वाचं म्हणजे, या क्रिया शरीराच्या बाह्य आणि अंतर्गत हालचालींसारख्या दोन्ही क्रिया असू शकतात. जसं हृदय गती वाढवणं आणि रक्तवाहिन्या विस्तारणं."
पण आपण आपली चेतना कुठून सुरू होते हे शोधण्याच्या प्रयत्नात असतो. आपल्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा, आपली चिंता कमी करण्याचा किंवा आपल्या चिंतांना नियंत्रित करण्याचा असतो.
आपण सर्वांनी आपलं शरीर आपल्याला जे सांगत आहे त्याच्याशी अधिक सुसंगत राहिल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो.
प्रा.सेठ यांच्या मते, सुरुवात करण्यासाठी एक चांगली जागा म्हणजे ध्यान. "जेव्हा तुम्ही ध्यान करायला शिकता. तेव्हा आपल्याला आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करायचं असतं. आपल्या शरीरात काय घडत आहे याकडे आपल्याला पाहायचं असतं."
"तुमच्या शरीरात घडत असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त संवेदनशील होऊ शकता. यामुळं एक प्रकारची चिंता देखील निर्माण होऊ शकते," असा इशारा प्रा. सेठ देतात.
जेव्हा इंटरोसेप्शन समजून घेण्याचा विचार केला जातो, तेव्हा बरीच रहस्ये तशीच राहतात. पण जसजसं विज्ञान आणखी खोलात जाईल तेव्हा आपल्या आंतरिक मनाकडं आधी पाहा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.