मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा की शिवसेनेचा? देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदेंचे पक्ष काय म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा की शिवसेनेचा? देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदेंचे पक्ष काय म्हणतात?

भाजप आणि शिवसेना युतीने मुंबई, ठाणे आणि MMR प्रदेशात इतर निवडणुका एकत्रितपणे लढवल्या, पण आता महापौरपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याचं दिसतंय.

मुंबई महापालिकेत बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर असावा असं शिवसेना नेत्यांकडून बोललं जातंय, तर ठाण्यात २ वर्षं भाजपचा महापौर असावा असं भाजप नेते म्हणतायत.

नेमकं काय घडेल? दीपाली जगताप यांचा रिपोर्ट

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)