बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. कोव्हिड पुन्हा फोफावतोय का? तुमच्या 6 प्रश्नांची उत्तरं

देशात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 13 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागच्या 24 तासांत 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले तर देशातल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे.

त्यातच काही तज्ज्ञांनी भारतात कोव्हिड आता एंडेमिक झाला असल्याचा अंदाज मांडला आहे. पण म्हणजे नेमकं काय?

कोव्हिडच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ ही किती चिंतेची बाब आहे, त्यावर सरकार काय करतंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी काय काळजी घ्यायला हवी? तुमच्या मनातल्या सहा प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

2. अमूल-नंदिनी वाद काय आहे? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं?

अमूल विरुद्ध नंदिनी. दुधाच्या या दोन ब्रँड्सवरून कर्नाटकात वातावरण तापलं आहे आणि त्यात सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकजण उतरल्याचं दिसतंय.

सोशल मीडियावर सेव्ह नंदिनी, अमूल गोबॅक असे हॅशटॅग्ज ट्रेंड होतायत आणि कन्नड रक्षण वेदिकेसारख्या काही संस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केलंय.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला राजकीय रंगही पेटला आहे. तर काहीजण या आंदोलनाची महाराष्ट्रातल्या सहकारी दुग्ध संस्थांच्या परिस्थितीशी तुलना करतायत.

3. पुष्पा-2: अल्लू अर्जुनच्या नव्या 'लुक'चे रहस्य काय, कांताराचा प्रभाव की आणखी काही..

पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझे क्या?… फायर है मैं, फायर !

2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा द राईज' अर्थात पुष्पा पार्ट 1 मधलं हे वाक्य ऐकलं नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मीळ आहे. सोशल मीडियावर तर हे वाक्य तुम्ही हजार वेळा ऐकलं असेल.

त्याची क्रेझ संपते न संपते तोच पुष्पा 2 म्हणजेच 'पुष्प द रुल'चा टीझर प्रदर्शित झाला.

'पुष्पा द राईज' मधला पुष्पाचा तो लूक आणि त्या पात्रांची स्टाईल लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता पुढच्या पार्टमध्ये काय असेल याची उत्सुकता शिगेला असताना पुष्पा-2चा टीझर आला आहे.

4. IPL 2023: महेंद्रसिंग धोनीला रोखणारा किमयागार संदीप शर्मा तुम्हाला माहितेय का?

शेवटचं षटक. 21 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी पण समोर सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा.

नाट्यमय घडामोडींनंतर समीकरण 1 चेंडू 5 धावा असं झालं. धोनी विरुद्ध संदीप अशा थेट मुकाबल्यात संदीपने बाजी मारली.

बुंध्यात यॉर्कर टाकत संदीपने धोनीला केवळ एकच धाव घेऊ दिली आणि राजस्थानने 3 धावांनी दिमाखदार विजय मिळवला.

शेवटच्या षटकात चेन्नईला 21 धावांची आवश्यकता होती.

शेवटचं षटक टाकण्यासाठी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडे दोन पर्याय होते- संदीप शर्मा आणि कुलदीप सेन. संजूने अनुभवी संदीप शर्माच्या हातात चेंडू सोपवला.

5. रुपयामध्ये व्यापार : भारत-मलेशियातील करार आहे काय? नेमका फायदा कोणाला?

जागतिक बाजारपेठेत भारतीय रुपयाची परिस्थिती चांगली नाही. मात्र भारताचा प्रयत्न आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थानिक चलनाचा प्रभाव वाढावा यासाठीभारत आणि मलेशियाने डॉलर ऐवजी त्यांच्या चलनात व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मलेशियाशिवाय 18 देशांनी रुपयामध्ये व्यापार करण्यास परवानगी दिली आहे.

मलेशिया दक्षिण पूर्व आशियातल्या सगळ्यात महत्त्वपूर्ण केंद्रांपैकी एक आहे.

आतापर्यंत भारत आणि मलेशियात व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होत असे. आता या नवीन कराराचं काय महत्त्व असेल?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)