You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय का? पृथ्वीवरचा दिवस मोठा होतोय?
चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी 3.78 सेंटीमिटर दूर जात आहे. ही बाब नुकतीच लक्षात आलेली आहे.
चंद्राचं असं दूर जाण्यामागे काय कारण असेल, तो पृथ्वीपासून दूर गेल्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो, याचीच थोडी माहिती येथे घेऊ.
आतापर्यंत पृथ्वीवरुन चंद्रावर अनेक यान गेलेली आहेत. सोव्हिएट रशियाची लुना, अमेरिकेची अपोलो मोहिमेंतर्गत अंतराळयानं चंद्रावर गेलेली आहेत.
अमेरिकन अंतराळवीरांनी चंद्रावर पायही ठेवला आहे. अशा मोहिमांत चंद्राच्या पृष्ठावर रेट्रोफ्लेक्टर बसवण्यात आले होते. शास्त्रज्ञ त्याच्यावरुन चंद्र आणि पृथ्वीचं अंतर मोजतात.
चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर कसं मोजतात?
1969 साली अपोलो-11, 1970 साली लुना-17 आणि अपोलो 17, 1971 साली अपोलो 15, 1973 साली अपोलो 21 या सर्व मोहिमांनी चंद्रावर लेझर रिफ्लेक्टर बसवले.
हे उपकरण एखाद्या आरशासारखंच असतं. आता याद्वारे चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर कसं मोजतात ते पाहू. पृथ्वीवरुन त्यावर एक लेसर झोत टाकला जातो, तो त्यावर आदळून पुन्हा पृथ्वीवर येतो.
हा लेसर झोत तिथं जाऊन परत पृथ्वीवर येण्याचा वेळ मोजला जातो. हा झोत पाठवणाऱ्यांना त्या झोताचा वेग माहिती असतो. त्यामुळे तो परत यायला किती वेळ लागतो आणि त्याचा वेग याच्यावरुन पृथ्वी आणि चंद्रातलं अंतर शोधून काढतात.
चंद्र पृथ्वीपासून दूर कसा जातोय?
चंद्र पृथ्वीभोवती अर्धवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे या दोघांतलं अंतर दररोज बदलत राहातं.
हे दोघे एकमेकांपासून सर्वात लांब असतात तेव्हा त्यांच्यात 4,06,731 किमी इतकं अंतर असतं तर ते सर्वात जवळ असतात तेव्हा त्यांच्यामधलं अंतर 3,64,397 किमी असतं. या दोघांमधलं सरासरी अंतर 3,84,748 किमी इतकं असतं.
तुम्ही दररोज त्या रिफ्लेक्टरवर लेझर झोत पाठवून गणन करत राहिलात तर दररोजचं अंतर तुम्हाला मोजता येईल. अशी वर्षानुवर्षे आकडेवारी काढली आणि त्यांची सरासरी काढली तर चंद्र आणि पृथ्वी यांचं अंतर वाढतंय की नाही ते पाहाणं शक्य आहे.
पृथ्वीवरचा दिवस मोठा होत चालला आहे का?
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरच्या महासागरांवर होतो. त्यामुळेच समुद्राचं पाणी खवळलेलं दिसतं. समुद्राच्या पाण्यात वाढ दिसून येते.
पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती किंवा परिवलन गती चंद्रामुळे नियंत्रित होते.
पण चंद्र पृथ्वीपासून दूर जाण्याने पृथ्वीवरचा दिवस मोठा होतो. शास्त्रज्ञांच्या मते वर्ष 1600 पासून आतापर्यंतच्या काळात दिवसाचा सरासरी काळ 1.09 मिलीसेकंदांनी वाढला आहे. म्हणजे याआधी पृथ्वी आतापेक्षा थोडी वेगानं फिरत होती आणि तेव्हा दिवसही 24 तासांचा नव्हता. तो त्याहून कमा कमी काळाचा होता.
चंद्राचा आणि प्रवाळाचा काय संबंध?
चंद्रामुळे समुद्राची पातळी एका दररोज वरखाली होत असते. इथं समुद्राच्या दोन भरतीमधील पाण्याच्या पातळीचा विचार केला जातो. कारण या दोन पातळ्यांमधला काळ हा पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास लागणाऱ्या काळाइतका असतो. पृथ्वीवरच्या अनेक प्रजाती या समुद्राच्या पातळीवर अवलंबून असतात.
निरीक्षण करायचं झालं तर झाडांचा विचार करू. त्यांच्या खोडात जितकी वलयं असतात तितकं त्याचं वय असतं. तसंच समुद्राची पातळी वर-खाली गेली की प्रवाळांवर म्हणजे कोरल रिफ्सवर एक पाण्याची रेष दिसून येते.
या रेषा पाहून आपण पृथ्वीला परिवलनासाठी किती वेळ लागला असावा हे मोजू शकतो. प्रत्येक 24 तासांनी एक रेष उमटलेली आपण पाहू शकतो.
पण आपण कोरलचे जीवाष्म म्हणजे फॉसिल्स पाहिले तर ते वेगळे दिसून येतात. त्यांचा अभ्यास केला तर 14 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी म्हणजे परिवलनासाठी 18 तास लागत असल्याचं दिसतं.
त्याचप्रमाणे 32 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर एकच पँजिया नावाचा खंड होता तेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये फक्त 2,70,000 किमी होतं. तेव्हा पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग सर्वात जास्त होता. त्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती फक्त 13 तासात एक प्रदक्षिणा करत असे.
चंद्र पृथ्वीपासून दूर गेला तर काय होईल?
45 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 8 तास लागायचे म्हणजे तेव्हा 8 तासांचा दिवस होता. पृथ्वीच्या सुरुवातीच्या दिवसांत म्हणजे 45 कोटी वर्षांपूर्वी ती एखाद्या आगीसारख्या द्रव्याच्या मिश्रणासारखी दिसायची. त्यानंतर तिच्यावर मंगळासारखा दिसणारा एक ग्रह आदळला.
चंद्राची निर्मिती अशा आदळण्यानेच झाली आहे. चंद्राच्या निर्मितीनंतरच पृथ्वीची गती मंदावली आणि आज जो 24 तासांचा दिवस झाला आहे तो त्यामुळेच दिसतो.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वी मंदावते. 8.5 कोटी वर्षांपूर्वी दिवस 21 तासांचा होता. त्याला पुरातत्वशास्त्रीय पुरावेही आहेत.
4 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी स्वतःभोवती 22 तासांत प्रदक्षिणा घालत असे या पुराव्यांवरुन दिसतं.
हा विचार केला तर 50 कोटी वर्षांनी पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 50 दिवस लागतील. त्यावेळेस 25 दिवस दिवस असेल आणि 25 दिवस रात्र असेल. पण ही स्थिती अशाचप्रकारे असेल असं नाही.
शास्त्रज्ञही तसाच विचार करत आहेत. कारण त्यावेळेस सूर्य तेव्हा त्याच्या रेड रॅडसन स्थितीला पोहोचेल. तो इतका विशाल होईल की तो बुध आणि शुक्र यांना जवळपास गिळून टाकेल.
त्यानंतर तो पृथ्वीला गिळेल की नाही माहिती नाही. अशी काहीशी चंद्र आणि पृथ्वी यांची भविष्यातली स्थिती असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)