You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पार्संस ग्रीन : लंडन पोलीस म्हणतात स्फोट दहशतवादी हल्ला
- Author, बीबीसी न्यूज मराठी
- Role, _
नैऋत्य लंडनच्या भूमिगत 'ट्यूब' ट्रेनमध्ये शुक्रवारी स्फोट झाला. स्कॉटलंड पोलीस सध्या याकडं उग्रवाद्यांनी केलेला हल्ला म्हणून बघत आहे.
शुक्रवारी सकाळी 8.20 वाजता (लंडन वेळ) लंडन ट्यूबच्या पार्संस ग्रीन स्टेशनवर ही ट्रेन असताना एका डब्यात स्फोट झाला, ज्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी प्रवाश्यांनी आगीच्या ज्वालाही पाहिल्याची माहिती दिली.
काही प्रवाशांनुसार यानंतर एकच गोंधळ उडाला. ट्रेनचे दरवाजे उघडताच प्रवाश्यांनी बाहेर पडण्यासाठी धडपडत केली. यामुळं जिन्यावरही गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीमध्ये काही प्रवासी जख्मी झाले.
18 लोकांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती लंडन अॅम्बुलंस सर्व्हीसने दिली.
घटनास्थळी उपस्थित एका बीबीसी प्रतिनिधीनुसार एका महिलेच्या चेहऱ्यावर आणि पायावर भाजल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिला अॅम्बूलंसने रुग्णालयात नेण्यात आलं.
ट्रांसपोर्ट फॉर लंडनने ट्वीट केलं आहे की, "आम्ही पार्संस ग्रीन येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेची चौकशी करीत आहोत. अधिकची माहिती मिळाल्यावर कळविली जाईल."
बीबीसी लंडनच्या निवेदक रिज लतीफ यांनी सांगितलं की, "याचा आवाज एका मोठ्या स्फोटासारखा एकू आला. लोकं दहशतीत ट्रेनमधून बाहेर पडत होते."
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ट्विट केलं - "पार्संस ग्रीनच्या दुर्घटनेत जख्मी झालेले लोकांप्रती माझी सहानुभूती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यावश्यक सेवा जोमानं काम करत आहेत."
लंडनचे महापौर सादीक खान यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
"हा स्फोट झाला त्यावेळी मी विंबलडन येथून पुर्वेकडं प्रवास करत होतो," असं एका पीटर क्राऊली नामक प्रवाशानं सांगितलं. "डोक्यावरून एक आगीच्या गोळ्यासारखं काहीतरी गेल्यानं माझं डोकं भाजलं. इतर लोकांची अवस्था माझ्यापेक्षाही वाईट होती."
एम्मा स्टीव्ह (27) हीसुध्दा या ट्रेनमध्ये होती. ती म्हणाली "स्फोट झाल्यानंतर चेंगराचेंगरीत मीही सापडले होते. या घटनेनं हादरलेल्या प्रवाशांनी जीन्यावर एकच गर्दी केल्यानं गोंधल उडाला."
ब्रिटनच्या MI5 संस्थेचे शेकडो गुप्तहेर पुढच्या तपासात लागले आहेत, असं लंडनच्या सहायक आयुक्त मार्क रावली यांनी सांगितलं.