You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माणसाचे स्पर्म चिंपांझीमध्ये सोडून 'हायब्रिड' माणूस बनवण्याचा प्रयोग कोणी आणि का केलेला?
- Author, दाहिला वेन्टुरा
- Role, बीबीसी मुंडो
1871 मध्ये इंग्रजी वैज्ञानिक चार्ल्स डार्विन यांच्या 'ओरिजिन्स ऑफ मॅन' या पुस्तकाने मोठी क्रांती केली. तेव्हापासून मनुष्यप्राण्याची उत्पत्ती चिंपाझीपासून तयार झाला का विषयावर मोठी चर्चा झाली.
वर्तमानपत्रात या विषयावर अनेक कार्टून्स आले होते.
चाळीस वर्षांनंतर 1910 मध्ये रशियन बायोलॉजिस्ट इलिया इवानोविच यांनी प्राणीशास्त्रज्ञांच्या एका परिषदेत याच विषयावर भाषण केलं. ही परिषद ऑस्ट्रियात भरली होती. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी 'एप-मॅन' निर्माण केला आहे असा दावा केला होता. 'एप-मॅन' हे मनुष्य आणि माकडाचं एकत्रीकरण होतं.
एकदा ते म्हणाले की माकड आणि माणसाचं मिश्रण असलेला मनुष्यप्राणी तयार करणं शक्य आहे.
एप्स या माकडांच्या प्रजातीत माणसाचं वीर्य टाकलं तर या प्रयोगाशी निगडीत असलेल्या नैतिक प्रश्नांचा विशेषत: प्राण्यांबरोबरच्या लैंगिक संबंधांसारख्या विषयाचा निपटारा होऊ शकतो असं त्यांचं मत होतं.
रशियन राज्यक्रांती आणि इव्हानोविच
इव्हानोविच यांच्या भाषणाकडे सुरुवातीला फारसं कोणी लक्ष दिलं नाही. मात्र 1917 मध्ये झालेल्या रशियन राज्यक्रांतीनंतर त्यांची संकल्पना अस्तित्वात येण्यास सुरुवात झाली. त्यांनी असा विचार केल्याचा उल्लेख फ्रेंच लेखक गुस्ताव फ्लॉबर्ट यांनी Quidquid Volures या पुस्तकात केला आहे.
1926 मध्ये इव्हानोविच गिनी या देशात गेले होते. तेव्हा हा भाग पश्चिम आफ्रिकेत होता आणि फ्रान्सच्या ताब्यात होता. तिथे त्यांनी हा प्रयोग केला. जगाच्या इतिहासातला हा अत्यंत वाईट प्रयोग समजला जातो.
बोलशेविक सरकारने या प्रयोगासाठी बराच निधी पुरवला होता. रशियन सरकारने इतका पैसा का दिला याबद्दल रशियन वैज्ञानिक आणि इतिहासकार विचारच करत बसले.
अशा प्रकारचे हायब्रिड जीव तयार करण्यात इव्हानोविच यांचा हातखंडा होता. 1896 मध्ये त्यांनी शरीरविज्ञानशास्त्रात पीएचडी केली होती. त्यानंतर त्यांन जीवाणूविज्ञानात संशोधन केलं. नंतर ते इनाव पावलोव यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली.
इव्हानोविच यांनी प्राण्यांमधून वीर्य काढण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं होतं. या संशोधनामुळे पावलोव यांना नोबेल पारितोषिक मिळालं.
हळूहळू हे संशोधन इतर प्राण्यांमध्येही करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना एकदम आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. सर्व वैज्ञानिक संशोधनाप्रमाणे हा शोधही अडथळ्यांची शर्यत होता. या संशोधनामुळे ते एकटे पडले. या संशोधनाच्या पहिल्या काही वर्षातच त्यांचे मार्गदर्शक त्यांना सोडून गेले आणि पुढे काय करायचं असा एक मोठा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला.
ऑस्ट्रियामध्ये मांडलेली संकल्पना 1924 च्या सुमारास आकार घेऊ लागली होती.
चिंपाझीं आणि पैसा
इव्हानोविच यांनी पाश्चर इन्स्टिट्यूट यांनी स्पर्म डिसइन्फेक्शन वर प्रयोग केले होते. त्यामुळे त्यांना गिनी मधील किंडिआ भागात अनेक चिंपांझीवर प्रयोग करण्याची संधी मिळाली. ही संधी मौल्यवान होती. कारण एका प्रतिष्ठित संस्थेचा पाठिंबा तर होताच पण रशियाकडे तेव्हा दोन पायावर चालणाऱ्या प्राण्यांची वानवा होती.
प्रयोग करण्यासाठी प्रवासभत्ता आणि इतर भत्ते त्यांना मिळाले नाही. त्यांनी रशियन सरकारमधील एका संस्थेकडे पंधरा हजार डॉलर्स मागितले. मात्र या संस्थेने फारसा रस दाखवला नाही.
एक वर्षानंतर निकोलय गोर्बुनव या विज्ञान क्षेत्रातील एका थोर व्यक्तीची रशियन सरकारच्या वैज्ञानिक संस्थांवर नेमणूक झाली आणि इव्हानोविच यांचं नशीब फळफळायला सुरुवात झाली. त्यांनी सरकारकडे या प्रयोगासंदर्भात एक प्रस्ताव मांडला आणि 10,000 डॉलर इतक्या निधीची मागणी केली.
आता इव्हानोविच यांच्याकडे पैसा, प्राणी आणि ज्ञान सगळं होतं. आता प्रयोग करण्याची वेळ आली होती.
असाध्य ते करिता साध्य
तुम्हाला आतापर्यंत हे लक्षात आलं असेलच की हा प्रयोग यशस्वी झाला नाही. कारण तो झाला असता तर आतापर्यंत जगभर त्यांचं नाव झालं असतं.
कारण पहिल्यांदा त्या जेव्हा किंडियाला गेले तेव्हा माकडं प्रजननक्षम वयात नव्हते. मग ते पॅरिसला आले आणि या प्रयोगाचा आणखी अभ्यास करायला सुरुवात केली. इव्हानोविच यांनी सर्जोई वॉरनॉफ या शल्यचिकित्सकाबरोबर काम करायला सुरुवात केली.
आफ्रिकेत परत आल्यावर इव्हानोविच यांनी तीन चिंपांझींमध्ये मानवी वीर्य टाकण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही.
त्याचवेळी ऑर्र्गॅनुटस नावाच्या माकडाचे वीर्य एका आफ्रिकन बाईच्या गर्भाशयात टाकण्याचा तिच्या नकळत प्रयत्न केला. मात्र फ्रान्सच्या प्रशासनाने त्यांना रोखलं.
हे सगळे प्रकार झाल्यामुळे त्यांना रशियाला परत येण्यावाचून पर्याय नव्हता. त्यांनी रशियाच्या काही स्वयंसेवकांना त्यांच्या शरीरात चिंपांझीचं वीर्य घालण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र ते वीर्य त्या माणसांच्या शरीरात जाण्याधीच त्या चिंपांझींचा मृत्यू झाला
एकीकडे विज्ञान, एकीकडे संस्कृती
सोव्हिएत रशियात एकेकाळी सांस्कृतिक क्रांती होत होती. त्यावेळी इव्हानोविच यांनी त्यांच्या प्रयोगावर लक्ष केंद्रित केलं होतं.
1930 च्या सुमारास त्यांना गुप्तचर पोलिसांनी अटक केली. सरकारविरुद्ध कारस्थान रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. काही काळानंतर त्यांची रवानगी कझाकस्तान मध्ये करण्यात आली.
1931 मध्ये जोसेफ स्टालिन ने त्यांची सुटका केली. मात्र तुरुंगवासाचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला होता. पक्षाघाताने त्यांचा अल्मा आटा येथे मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूनंतरही या प्रयोगाची चर्चा थांबली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्याविषयी अनेक कागदपत्रं उपलब्ध होती मात्र त्यांनी हा प्रयोग का केलं याचं ठोस उत्तर मिळालं नाही.
इव्हानोविच यांनी सुरुवात केली असली तर त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतरही संकल्पना अस्तित्वात होती. 19 व्या शतकात फ्रान्समध्ये अनेकांनी या प्रयोगाचं समर्थन केलं नव्हतं.
1971 मध्ये येल विद्यापीठाचे जीवशास्त्राचे प्राध्यापक चार्ल्स रेमिंग्टन यांनीही या संशोधनाचं समर्थन केलं होतं.
इव्हानोविच यांच्या समकालीन शास्त्रज्ञांनीही हा विचार केला होता.
धर्म आणि विज्ञानाच्या पातळीवरही त्यांच्या या संशोधनाबद्दल अनेक मत मतांतरं होती.
इव्हानोव्हिच त्यांच्या प्रयोगात यशस्वी झाले असते तर डार्विनच्या सिद्धांताला आणखी बळ मिळालं असतं. माणसं आणि माकडं यांचं नातं जुनं आहे असं डार्विन यांचं मत होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)