श्रीलंका : 'पेट्रोल मिळवण्यासाठी मला 2 दिवस कारमध्येच मुक्काम करावा लागला'

- Author, रजनी वैद्यनाथन
- Role, बीबीसी दक्षिण आशिया प्रतिनिधी, कोलंबो.
'रांगेत पहिल्या स्थानावर असणे हे सहसा प्रतिष्ठेचे असते, परंतु अजिवन सदाशिवम यांना कल्पना नाही की त्यांना या ठिकाणी किती दिवस अडकून पडावं लागणार आहे.'
"मी गेल्या दोन दिवसांपासून रांगेत उभा आहे," श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील पेट्रोल स्टेशनच्या बाहेर धीराने वाट पाहत असताना ते म्हणतात.
टॅक्सी चालक म्हणून इंधन ही त्याच्यासाठी रक्तवाहिनीप्रमाणे आहे, परंतु श्रीलंकेकडे नवीन पेट्रोलचा पुरवठा नाही.
सदाशिवम आम्हाला त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डवर पेट्रोल गेज दाखवतात, ज्याचा पेट्रोल बाण रिकामा आहे.
"मी या गाडीतच झोपतो आहे. कधी कधी मी जेवण आणायला निघून जातो, मग परत येतो आणि पुन्हा वाट पाहतो आहे… काही दिवस मी अंघोळ केली नाही."
ते सांगतात की, त्याच्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.
"मला माझ्या कुटुंबाची, पत्नी आणि दोन मुलांची काळजी घ्यावी लागेल. जर इंधन असेल तरच मी माझी कॅब चालवू शकेन आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेन."
श्रीलंकेत किमान दोन आठवड्यांपासून इंधनाची कोणतीही आंतरराष्ट्रीय शिपमेंट येत नसल्यामुळे इतर भागातून शिल्लक साठा राजधानीला पाठविला जात आहे. जिथे अजूनही काही साठे आहेत. पण संपूर्ण श्रीलंकेला पुरवठा कमी होत आहे.

सदाशिवम यांना आशा आहे की लवकरच टँकर येईल. ते समोर पंपाकडे पाहत असताना, श्रीलंकेच्या लष्करातले लोक रिकाम्या पंपांवर पहारा देत फिरत होते.
"आज रात्री वाहन पोहोचण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी मला सांगितलंय," ते आशेने सांगतात.
"मला रांगेत एक आठवडा लागला तरी थांबावे लागेल. मी दुसऱ्या रांगेत जाऊ शकत नाही. हे व्यावहारिक नाही."
'गॅस-पेट्रोलशिवाय आम्ही जगू शकत नाही'
सदाशिवम हे क्वचितच एकटे असतात. मुख्य रस्त्याच्या कडेला इंधनासाठीच्या ओळी, समुद्राच्या बाजूने जवळपास 2 किलोमीटरपर्यंत पसरलेल्या लगतच्या रस्त्यांवर पसरल्या आहेत.
हे एक आश्चर्यकारक दृश्य आहे. इंधनासाठी चार समांतर रांगा आहेत. कारसाठी एक, बस आणि ट्रकसाठी एक, मोटारसायकल आणि टुक-टुकसाठी आणखी दोन.
कोणालाही कोणतेही इंधन मिळण्यापूर्वी त्यांना टोकन मिळणे आवश्यक आहे. लोकांना एकूणच दोन्हीकडून त्रास सहन करावा लागत आहे.
आम्ही ज्यांच्याशी बोललो ते म्हणाले की बहुतेक पेट्रोल स्टेशन्स एका वेळी सुमारे 150 टोकन देतात.
रांगेच्या अगदी मागच्या बाजूला, आम्हाला जयंता अथुकोराला भेटतात. जो कोलंबोच्या बाहेरील एका गावातून प्रवास करत आला आहे आणि तेही फक्त अजून पेट्रोल मिळवण्यासाठी. यासाठी त्यांनी किमान 12 लिटर पेट्रोल खर्च केले आहे.

सदाशिवम यांच्या उलट अथुकोराला यांच्याकडे टोकन नाही. त्यांच्या अंदाजानुसार ते जवळपास 300 व्या क्रमांकावर आहेत.
"मला खात्री नाही की, आज मला टोकन मिळेल," ते अत्यंत निराश होऊन सांगतात.
"आम्ही गॅस किंवा पेट्रोलशिवाय जगू शकत नाही. आम्ही गंभीर संकटात आहोत."
काही इंधन केंद्रे केवळ आरोग्यसेवा, अन्न वितरण आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी इंधनाचा पुरवठा करत आहेत. काही लोकांना रेशनिंग योजनेअंतर्गत मिळत आहे.
अथुकोराला म्हणतात, की त्यांनी कारसाठी ठरवलेली जी रक्कम आहे-10,000 श्रीलंकन रुपये ($28; £22) यात केवळ अर्धी टाकी भरेल.
इंधनाचे स्रोत शोधण्यासाठी श्रीलंका सरकारवर दबाव असल्याने सरकारने मदतीसाठी रशियाकडे धाव घेतली आहे. स्वस्त तेलाच्या खरेदीवर चर्चा करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी एक शिष्टमंडळ मॉस्कोला जाणार आहे आणि अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी व्लादिमीर पुतिन यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
'परिस्थिती कठीण आहे, आम्हाला धीर धरावा लागेल'
इंधन स्टेशनच्या जवळून जाताना, आम्ही जगन्नाथन यांना भेटतो, ज्यांनी फिरण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब केला आहे.
चेहऱ्यावर मोठे स्मित घेऊन, ते आम्हाला त्यांची नवीन बाईक दाखवतात. त्यावर अजूनही काही ठिकाणी प्लास्टिकचे आवरण आहे.
"मला अजूनही याची सवय होत आहे," ते पेडल्सवर फिडल करताना सांगतात.
जगन्नाथन देखील ड्रायव्हर म्हणून काम करायचे. पण पेट्रोल किंवा डिझेल नसल्यामुळे त्यांनी काम करणे बंद केले आहे आणि आपली काही बचत बाईकवर खर्च केली आहे.
त्यांनी सांगितलं, की त्याने त्याच्या चाकांसाठी नेहमीच्या किंमतीपेक्षा तिप्पट किंमत दिली - 70,000 श्रीलंकन रूपये.
जगन्नाथन त्यांच्या नवीन खरेदीसाठी निघून जात असताना, आम्ही इतरांनाही भेटलो.
थांबलेल्या टुक-टुक रांगेच्या मागे, खूप लहान रांग आहे. अर्धा डझन लोकांचा समूह लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी वाट पाहत थांबला आहे.
सिरी हे छोटी-मोठी कामं करणारे कामगार... वेगाने पुढे जात त्यांनी त्यातील शिल्लक राहिलेली सर्व 26 तिकिटे विकत घेतली.
सिरी सांगतात की, मी आपल्या कुटुंबासाठी तिकिटे विकत घेतली आहेत.
"माझ्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही, हे कठीण आहे परंतु आम्हाला धीर धरावा लागेल."
इंधनाच्या रांगेतील काहीजण त्यांच्या टुक-टुकमध्ये झोपतात आणि इतर काही गट तयार करतात आणि वेळ काढून गप्पा मारतात. सिरी त्यांच्या हातातल्या तिकिटांच्या ढिगाकडे पाहतात.
"कदाचित कधीतरी मी लॉटरी जिंकेन," मोठ्या आशेने ते म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








