अफगाणिस्तान : तालिबानी राजवटीत महिलांविरोधात एकामागून एक फतवे

- Author, सिकंदर किरमानी
- Role, बीबीसी न्यूज काबूल
अफगाणिस्तानात लांब पांढरा गाऊन घातलेले धार्मिक प्रकरणांचे निरीक्षक एखाद्या नैतिक पोलिसांच्या तुलनेत सेफ्टी इन्स्पेक्टर सारखे दिसतात.
ते तालिबानच्या कट्टर विचारांनी प्रेरित असलेल्या अफगाणिस्तानची इस्लामी ओळख तयार करण्याच्या प्रयत्नात सगळ्यात पुढे आहेत. सरकारमध्ये त्यांची भूमिका फक्त इतकीच नाही.
राजधानी काबूलमधले काही दुकानदार एका प्रसंगाची आठवण काढतात. हे निरीक्षक एका उंच इमारतीत गेले तेव्हा ते प्रत्येक वस्तू हातात घेऊन पाहत होते. त्या वस्तूंची एक्स्पायरी डेट गेली की नाही हे तपासून पाहत होते. याशिवाय महिलांचे पोस्टर हटवण्याची ताकीद देत होते.
आतापर्यंत सगळेच पोस्टर हलवले गेले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला हे निरीक्षक जेव्हा दौऱ्यावर गेले तेव्हा बीबीसीची टीम त्यांच्याबरोबर होती.
या गटाचं नेतृत्व 25 वर्षीय मौलवी महमूद फातेह करत होते. त्यांचा चेहरा गोल होता आणि त्याने चष्मा घातला होता. निरीक्षकांच्या समूहात ते सगळ्यात लहान होते आणि ते एका मदरशात विद्यार्थी होते.
त्यांनी दुकानदारांना संबोधित केलं, प्रार्थना केली आणि मोठी दाढी करण्याचं महत्त्वावर एक लांबसडक व्याख्यान दिलं. त्यांनी सल्ला दिला, "दाढी ठेवण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मोहम्मद पैगंबरांना मानता."
याचे 'आणखी' काही फायदे आहेत असं ते हसून म्हणाले.
त्यानंतर आपल्या इतर निरीक्षकांकडे इशारा केला आणि म्हणाले, "या मौलवींच्या दोन तीन पत्नी आहेत. ते उर्जेचे स्रोत आहेत."
मौलवी महमूद फातेह यांनी त्यांच्या चार सहकाऱ्यांनी येणाऱ्या काळात लोकांची शक्य तितकी मदत करण्याचं आवाहन केलं.
या दरम्यान एका दुकानदाराने या मौलवींकडे तक्रार केली. स्वत:ला तालिबानी म्हणवून घेणाऱ्या एका माणसाने मला फुकटात मोबाईल मागितला असं तो म्हणाला. मौलवींनी तातडीने त्याचा नंबर सेव्ह केला आणि प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन दिलं.
महिलांसाठी फर्मान
या मंत्रालयाने महिलांसाठी एक फर्मान काढलं आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्यावर खूप टीकाही होत आहे.
महिलांनी सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण चेहरा झाकून जावं असं फर्मान काढलं आहे. तालिबानच्या आदेशानुसार अफगाणिस्तानमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना त्यांचा चेहरा झाकून ठेवावा लागेल. जर या नियमाचा भंग केला तर तिच्या जोडीदाराला तुरुंगात किंवा कोर्टात जावं लागेल.

फोटो स्रोत, BBC
जेव्हा मोहम्मद फातेह या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये होते तेव्हा हा चर्चेचा विषय नव्हता. जेव्हा त्यांना या मुद्द्यावर प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की आपण आत्ता फक्त पुरुषांच्या मुद्द्यावर बोलत आहोत.
नव्या ड्रेस कोडविषयी बोलताना ते म्हणाले की आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या प्रमुखांशी बोललो आहोत आणि तसे पोस्टरही लावले आहेत.
याच शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर एक प्रिंटआऊट लावलं होतं. त्यावर दोन फोटो आहेत. त्यात महिलांनी समोरून कसे कपडे घालायला हवे, हे सांगितलं आहे. त्यात एक फोटोत एकात एका महिलेने बुरखा घातला होता. तर दुसऱ्यात एका महिलेने काळा बुरखा घातला आहे.
त्यात प्रिंटआऊटवर फोटोबरोबर एक संदेश लिहिला होता, "मुस्लिम महिलांना बुरखा घालायला पाहिजे हा शरियाचा आदेश आहे."
अफगाणिस्तान हा रुढीवादी मान्यतांचा देश मानला जातो. तिथे आधीपासूनच अनेक बायका बुरखा घालतात. काबूलमध्ये अनेक महिला डोकं झाकण्यासाठी ओढणीचा वापर करतात. काही महिलांना स्कार्फचा वापर करतात.
फतव्यावर टीका
देश विदेशात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी तालिबानच्या या फतव्यावर टीका केली आहे. हा फतवा निराशाजनक आहे असं त्यांचं मत आहे.
तालिबानने या आधीही मुलींना शाळेत जायला, महिलांना काम करायला आणि प्रवास करण्याबाबत आदेश दिले होते. त्यावरून जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तानने महिलांच्या बाबतीत एक दोन पावलं पुढे घेतले होते. तालिबानच्या आदेशामुळे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होण्याची शक्यता आहे.
मात्र हिजाबबाबत जे नवीन नियम आहेत त्याचं इतकं पालन होताना दिसत नाहीये. मात्र येणाऱ्या काळात हे नियम सक्तीचे होऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली जात आहे. महिला टीव्ही अँकर्सला बुलेटिन देताना चेहरा झाकण्यास सांगितलं आहे.
काबुल शहरात अजुनही अनेक महिला चेहरा न झाकता वावरतात. जेव्हा मोहम्मद फातेह आणि इतर लोक या शॉपिंग कॉम्पलेक्स मध्ये फिरत होते त्यावेळी काही महिला बुरखा न घालताच फिरत होता. त्यामुळे अनेकांना त्यांची चिंताही वाटली.
मौलवी फातिह बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कोणत्या महिलेकडे हिजाब आहे हे आम्ही तपासून पाहू शकतो. जर एखादी महिला तिच्या मर्यादेचं उल्लंघन करत असतील तर आम्ही तिच्या जोडीदाराला किंवा पालकांना बोलावू."
मात्र आतापर्यंत अशी परिस्थिती आलेली नाही. तसंच मर्यादेचं उल्लंघन म्हणजे नेमकं काय हेही त्यांना सांगता आलं नाही.
महिला काय घालू शकतात किंवा काय नाही हे मंत्रालय कसं ठरवू शकतं असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की हा मंत्रालयाचा नाही तर ईश्वराचा आदेश आहे.
"नैतिक भ्रष्टाचाराचं खरं कारण चेहरा आहे. जर चेहरा झाकला नाही तर हिजाबला काय अर्थ आहे."
महिलांना त्यांचा चेहरा झाकण्याची गरज आहे असंच बहुतांश महिलांना वाटतं.
तालिबानचं आणखी एक रुप
यानंतर धार्मिक मंत्रालयाचे निरीक्षक पिक अप च्या ट्रकच्या मागे बसून बस स्टॉपवर पोहोचले. यादरम्यान ते प्रत्येक गाडीला थांबवून महिला पुरुषांच्या फार जवळ तर बसल्या नाहीत ना हे तपासून पाहत होते. किंवा महिला उभ्याने प्रवास तर करत नाही ना हे तपासत होते.

1990 च्या दरम्यान तालिबान प्रशासनाच्या पहिल्या कार्यकाळात नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जायची. त्यांना सार्वजनिक रीत्या मारहाण केली जायची.
मौलवी फातेह सांगतात की आता असं होत नाही, आता जर कोणी बस ड्रायव्हर नियमांचं उल्लंघन करत असेल आणि वारंवार करत असेल तर त्याला एक दिवस आमच्या कार्यालयात आणतो. त्याला आम्ही सल्ला देतो आणि त्याला सांगतो की हा अल्लाहचा आदे हे. यापुढे ते आदेश मानतील असं आम्ही त्यांच्याकडून वदवून घेतो आणि त्यांना सोडून देतो.
"आमच्यासमोर हे निरीक्षक सामान्य लोकांबरोबर सलोख्याने बोलत होते. निरीक्षक गेल्यावर आम्ही तिथल्या लोकांना तालिबानच्या टीमविषयी विचारलं होतं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की त्यांना तालिबान्यांशी कोणतीही तक्रार नाही.
मात्र ज्या पद्धतीने तालिबान आदेश देत आहेत त्यावरून आधीच्याच शासनकाळाची पुनरावृत्ती करणार आहे," असं त्यांना वाटतं.
तालिबान 20 वर्षांपूर्वी सारखंच वागत आहे का?
हिजाबचा आदेश पारित झाल्यानंतर स्त्रीहक्क कार्यकर्ता लीला बसिम बसमध्ये प्रवास करत होत्या. तेव्हाच हे निरीक्षक बसमध्ये घुसले. तेव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिलांनी बुरखा घातला होता. याकडे वसीम यांनी लक्ष वेधताच निरीक्षक भडकले.
बीबीसीने अन्य काही चालकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की तंग कपडे घातलेल्या महिलांना बस मध्ये चढू देऊ नका.
मागच्या वर्षी जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल तेव्हा मागच्या वेळेसपेक्षा चांगली शासनव्यवस्था असेल असं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही.
आर्थिक संकट
अफगाणिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र सरकार त्यासाठी काही करताना दिसत नाही. त्यांना फक्त सामाजिक सुधारणा करायच्या आहेत.
आता अफगाणिस्तान ने जे आदेश दिले आहेत त्या नुसार महिलांना दुरवरच्या अंतराच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. बागेत जाण्याचे दिवसही वेगवेगळे केले आहेत. त्यामुळे तिथले सामाजिक कार्यकर्ते चिंतेत आहेत.
1990 च्या परिस्थितीचीच पुनरावृत्ती होणार आहे असं एका व्यापाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
बसीम यांनाही हे आदेश मान्य नाहीत. त्या म्हणतात की मला विश्वास आहे की एक दिवस ते अस कायदा आणतील ज्याने महिलांना घराबाहेर पडायलाही परवानगी नसेल.
तालिबान मात्र या आदेशांचं समर्थन करत आहे. जगाच्या कोणत्याही भागात अशा प्रकारचे कायदे नाहीत हेही तितकंच खरं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana61566568, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








