अब्राहमी धर्म काय आहे? या नव्या धर्मावरून अरब देशांमध्ये वाद का सुरू आहे?

इजिप्तमध्ये धार्मिक एकतेसाठी सुरू झालेल्या फॅमिली हाऊसच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने अल अजहरचे प्रमुख इमाम अहमद अल् तैय्यब यांनी अब्राहमी धर्मावर जोरदार टीका केली आहे.

त्यांच्या टीकेमुळे अब्राहमी धर्म पुन्हा एकदा चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून या धर्माच्या निमित्ताने अरब देशांमध्ये वैचारिक घुसळण सुरू आहे.

अब्राहमी धर्म काय आहे?

तूर्तास अब्राहमी धर्माच्या स्थापनेची अधिकृत घोषणा झालेली नाही. या धर्माच्या स्थापनेसंदर्भात कोणी घोषणा केलेली नाही. या धर्माचे कोणी अनुयायीही नाहीत. या धर्माचा कोणताही धार्मिक ग्रंथ नाही.

अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की अब्राहमी धर्म काय आहे? धर्मासंदर्भातला एक प्रकल्प असं म्हणू शकतो. या प्रकल्पाअंतर्गत इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या तीन धर्मांमधील सामाईक मुद्यांना धरून मोहम्मद पैगंबर यांच्या नावाने धर्म तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या तीन धर्मांमधल्या श्रद्धा आणि आस्थेसंदर्भात एकसारख्या गोष्टींना एकत्र करणं हा उद्देश आहे. आपापसातील मतभेदाच्या गोष्टींना महत्त्व न देता काम करणं हाही यामागचा हेतू आहे.

मतभेदांचा विचार न करता माणसं आणि देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या विचाराने या धर्माचा प्रचार केला जात आहे.

आताच का?

साधारण वर्षभरापूर्वी या धर्मासंदर्भात पहिल्यांदा चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळी धर्माच्या निमित्ताने वादही पाहायला मिळाला.

इमाम यांनी आताच हा मुद्दा का मांडला हे समजून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी या धर्माबद्दल पहिल्यांदाच ऐकलं आणि तेही अल् तैय्यब यांच्याकडून.

अल् अजहरच्या शेखांनी केलेल्या भाषणात विविध धर्मीयांच्या अनुयायींनी एकत्र येण्याचा उल्लेख आहे.

इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया इथे 2011 झालेल्या क्रांतीनंतर पोप शेनौदा तृतीय आणि अल अजहरचं एक शिष्टमंडळ यांच्यातील चर्चेदरम्यान इजिप्त फॅमिली हाऊसच्या स्थापनेसंदर्भात विचार करण्यात आला.

दोन धर्मांचं एकत्र येणं आणि सहिष्णूता याबाबत बोलणं तर्कशुद्ध आणि अपेक्षितही आहे. शेख अल अजहर यांनी फॅमिली हाऊसकडे अब्राहमी धर्माच्या बोलणं उचित मानलं गेलं.

अल् तैय्यब यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मामधील बंधूभाव नाहीसा करणं तसंच दोन धर्मांचं मिश्रण आणि

ते म्हणाले, इस्लाम-ख्रिश्चन तसंच ज्यू यांचा मिळून एक धर्म करावा असं म्हणणारी माणसं पुढे येतील आणि सगळ्या वाईटाचा नाश करू असं म्हणतील.

तैय्यब यांनी टीका का केली?

अल् तैय्यब यांनी नव्या धर्माच्या स्थापनेचं नियंत्रण धुडकावलं आहे. ज्या धर्माच्या स्थापनेबाबत बोललं जातंय त्याचा कोणताही रंग नाही, कोणताही गंध,स्वाद नाही.

या धर्माच्या माध्यमातून आपापसातील वादविवाद आणि संघर्ष संपवू असं अब्राहमी धर्माचा प्रसार करणारे सांगत आहेत पण हा धर्म म्हणजे स्वेच्छेने धर्माचरण करण्याच्या स्वातंत्र्यावर आलेला घाला आहे.

वेगवेगळ्या धर्मांना एकत्र करण्याचं आवाहन म्हणजे भवताल समजून घेण्याच्या प्रक्रियेतला अडथळा आहे. सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणणं अशक्यप्राय आहे.

अल् तैय्यब म्हणाले की, दुसऱ्या धर्माचं अस्तित्व मानणं, त्याचा सन्मान करणं ही एक गोष्ट आहे आणि त्यांच्या श्रद्धा आपल्या मानणं ही दुसरी गोष्ट आहे.

शेख यांचं कौतुक

अब्राहमी धर्मासंदर्भात अल् तैय्यब यांनी मांडलेल्या गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा आहे. यामध्ये अब्दुला रुश्दी यांचाही समावेश आहे. अल तैय्यब यांनी अब्राहमवादी विचारांना प्राथमिक स्थितीतच ठेचलं आहे.

दुसरीकडे वादविवाद आणि संघर्ष मिटवण्यासाठी प्रयत्नशील अशा या धर्माबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही असंही काहींचं म्हणणं आहे.

धर्माआडून राजकारणाचा आरोप

अल् अजहर शेख यांनी आपल्या बोलण्यादरम्यान अब्राहम धर्माच्या स्थापनेबाबत बोलताना राजकीय आयामाचा उल्लेख केला नाही.

मात्र सोशल मीडियावर काही लोकांनी हा धर्म म्हणजे 'धार्मिक आवरणातील राजकीय साद' असं याचं वर्णन केलं आहे. इजिप्तमधील कॉप्टिक पादरी, हेगोमेन भिक्षु नियामी यांचा यात समावेश आहे. अब्राहम धर्म म्हणजे शोषण आणि धोका यांच्या आडून केलेलं राजकीय आवाहन आहे.

या धर्माला न मानणाऱ्या लोकांमध्ये वैचारिक पातळीवर विविध धर्म एकत्र येणं चूक मानणारेही आहेत. ते याकडे राजकीय नाकेबंदी म्हणूनच पाहतात. अरब देशांमध्ये इस्रायलबरोबरचे संबंध पूर्ववत करणं आणि सौहार्दपूर्ण करणं हा उद्देश असल्याचं म्हणणं आहे.

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीचा याच्याशी असलेला संबंध?

अब्राहमिया शब्दाचा उपयोग आणि त्यासंदर्भातील वादाची सुरुवात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन यांनी इस्रायलशी असलेले संबंध नीट करण्याच्या उद्देशाने केलेल्या करारावर स्वाक्षऱ्या यावेळी झाली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांचे सल्लागार जेरेड कुशनर यांच्याद्वारे प्रायोजित कराराला 'अब्राहमी करार' म्हटलं जातं.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात म्हटलं होतं की, अमेरिका, युएई आणि बहरीन अब्राहमी धर्म तसंच सर्वधर्मीयांमध्ये शांतता नांदावी यासाठी आंतरसांस्कृतिक आणि आंतरधार्मिक संवादासाठी पुढाकार घेणाऱ्यांना प्रोत्साहन देतो.

परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठीच्या सुरुवातीला जे प्रयत्न झाले याचा हा परिच्छेद भाग आहे. इस्रायलशी संबंध पूर्ववत करणं हा केवळ राजकीय किंवा आर्थिक सौदा नव्हता तर त्यामागे सांस्कृतिक उद्देशही होता.

यानंतरच विविध धर्मांच्या एकत्रीकरणातून धार्मिक सहिष्णूता आणि आपापसातील संवादासंदर्भात बोलणं सुरू झालं. यानंतर अब्राहमी एक धर्म म्हणून समोर आला आहे.

इस्रायलशी संबंध नीट करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अब्राहमी धर्माची सूचना ... सामान्य मंडळींना एक निमित्तच मिळालं. नव्या धर्माला विरोध म्हणून संबंध पूर्ववत होऊ नयेत याचाही विरोध करू लागले आहेत.

सोशल मीडियावर अब्राहमी धर्माला पुढे रेटत असल्याचा आरोप संयुक्त अरब अमिरातीवर होतो आहे. संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलशी संबंध पूर्ववत करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यानंतर दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक तसंच अन्य क्षेत्रात सहकार्य, संवाद सुरू झाला आहे.

अनेकांनी अब्राहमी धर्मासंदर्भातील आवाहनाला अब्राहमी फॅमिली हाऊसशी जोडलं आहे. 2019च्या सुरुवातीला दुबईचे शासक मोहम्मद बाम जायद यांनी अबू धाबी इथे पोप फ्रान्सिस आणि शेख अल अजहर अहमद अल तैय्यब यांच्या संयुक्त ऐतिहासिक भेटीच्या स्थापनेचा आदेश दिला होता.

इस्रायलशी संबंध पूर्ववत करण्यासाठी झालेल्या कराराच्या दीड वर्ष आधीच हे झालं. अब्राहमी फॅमिली हाऊसमध्ये एक मशीद, एक चर्च आणि प्रार्थना करण्यासाठी सिनेगॉग उभारण्यात आलं आहे. 2022 मध्ये हे सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्यात येईल.

याला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे शेख सुलतान बिन जायद मशिदीचे मौलवी वसीम युसुफ यांचा समावेश आहे. कुवेतचे प्रसिद्ध धर्मगुरू ओथमान अल खमीस यांनी यावर टीका केली आहे.

जुना वाद

अब्राहमी संदर्भात वाद केवळ अल् अजहर शेख यांच्या मतापुरता मर्यादित नाही.

यंदा मार्च महिन्यात इराकमध्ये सदरवादी आंदोलनाचे नेते मुक्तदा अल-सदर यांचं एक ट्वीट होतं. ज्यानुसार इस्लाम धर्म आणि धर्मांमधील एकता यांच्यादरम्यान कोणताही विरोधाभास नाही.

अब्राहमी करारावर स्वाक्षऱ्या आणि नव्या धर्माच्या चर्चेनंतर इस्लाममधील मौलवी आणि धर्मगुरूंनी याला मान्यता न देण्यासंदर्भात चर्चा सुरू केली. तारिक अल सुवैदान यांनी याची तुलना ईशनिंदेशी केली आहे.

यंदा फेब्रुवारीत मुस्लीम विद्वानांचे आंतरराष्ट्रीय संघ, मुस्लीम विद्वानांची लीग आणि अरब माघरेब लीग आयोजित संमेलनाचं शीर्षक होतं- अब्राहमी धर्मासंदर्भात इस्लामी उलेमांची स्थिती.

या विचाराला पाठिंबा असणारे आणि हा शांततेसाठीचा मार्ग आहे असं मानणारेही बरेच आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)