Tokyo Olympic: कमलप्रीतचं पदकाचं स्वप्न भंगलं

फोटो स्रोत, ANDREJ ISAKOVIC
थाळीफेक प्रकारात देशाला पदक मिळवून देण्याचं कमलप्रीत कौरचं स्वप्न अपुरंच राहिलं. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
कमलप्रीत अंतिम फेरीत अव्वल आठसाठी पात्र झाली. मात्र सहा प्रयत्नांपैकी तीन प्रयत्न फौल अर्थात अवैध गेल्याने पदकाच्या आशा मावळल्या.
कमलप्रीतने पहिल्या प्रयत्नात 61.62 अंतरावर थाळी फेकली. तिसऱ्या प्रयत्नात तिने 63.70 मीटर अंतरावर थाळी फेकत सर्वोत्तम प्रदर्शन केलं. पाचव्या प्रयत्नात तिने 61.37 अंतरावर थाळी फेकली. तिचा दुसरा, चौथा आणि सहावा प्रयत्न अवैध ठरला.
थाळीफेक प्रकारात कमलप्रीत कौर भारताला पदक मिळवून देऊ शकते याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष होतं.
स्पर्धेच्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे खेळाडूंची निराशा झाली. काही स्पर्धक थाळी फेकताना वर्तुळात घसरून पडल्या. पावसाच्या माऱ्यामुळे थाळीवरची पकड सुटून काहींचे प्रयत्न अवैध ठरले.
12 स्पर्धक प्रत्येकी तीनवेळा थाळी फेकतील. अव्वल आठ खेळाडूंना पुन्हा प्रत्येकी तीनवेळा थाळी फेकण्याची संधी मिळेल. त्यातून पदकविजेता स्पष्ट होईल. सर्वाधिक अंतरावर थाळी फेकणं याच्याबरोबरीने खेळाडूंना काही नियमांचं पालन करावं लागेल.
घोडेस्वारी
घोडेस्वारी खेळात इव्हेन्टिंग प्रकारात भारताच्या फौवाद मिर्झाने अंतिम फेरी गाठली आहे. काही क्षणात अंतिम फेरी सुरू होणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघाचा पराक्रम
भारताच्या महिला हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 अशा फरकानं पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघासाठी हा क्षण 'चक दे इंडिया' चित्रपटासारखा होता.
ऑस्ट्रेलियावरील या विजयासोबतच ऑलिंपिकच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करत महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे.
आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पोहोचत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध करण्यात आलेला एकमेव गोल गुरजीत कौर हिने केला.

फोटो स्रोत, Getty Images
विजयी भारतीय संघाची काही क्षणचित्रे:

फोटो स्रोत, CHARLY TRIBALLEAU/AFP via Getty Images

फोटो स्रोत, Buda Mendes/Getty Images

फोटो स्रोत, CHARLY TRIBALLEAU/AFP via Getty Images
Please wait...
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








