अफगाणिस्तान : भारताने काबुलमधला दूतावास पुन्हा सुरू केला

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानातील आपलं अस्तित्व पुन्हा एकदा ठळक करण्यासाठी गुरूवार 23 जून 2022 रोजी भारताने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भारताने काबूलमधील दूतावासात एक तांत्रिक चमू पाठवला आहे. याबरोबरच अफगाणिस्तानाच्या राजधानीत पुन्हा एकदा आपलं राजनयिक अस्तित्व स्थापन केलं आहे.
बुधवार 22 जून रोजी अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले त्यामुळे भारताने आपल्यातर्फे मदत पाठवली आहे.
10 महिन्यांनी भारताने आपला दूतावास पुन्हा एकदा सुरू केला आहे. तालिबानचं सरकार आल्यावर अनेक सरकारांनी दूतावास बंद केले होते.
2 जून रोजी भारताच्या परराष्ट्र खात्याचे संयुक्त सचिव जे. पी. सिंह यांच्या नेतृत्वामध्ये एक प्रतिनिधीमंडळ काबूलला गेले होते. तालिबान सरकार आल्यानंतर भारतातर्फे झालेला हा पहिला सरकारी दौरा होता.
भारत हा काबूलमध्ये दूतावासा सुरू करणारा 15 वा देश बनला आहे. यापूर्वी रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, तुर्कीये, कतार, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, युरोपीय संघाने आपले दूतावास आधीच सुरू केले आहेत.
वाणिज्य दूतावास बंद केला तेव्हा ....
अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडणं आणि तालिबानचा वाढता प्रभाव याचा मोठा परिणाम भारतावर झाल्याचं दिसतंय.

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानचा वाढता प्रभाव पाहत भारताने अफगाणिस्तानातल्या कंदाहारमधला आपला वाणिज्य दूतावास (Consulate) तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं 'द हिंदू' या इंग्रजी वर्तमानपत्राने रविवारी पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय.
भारतीय वायु सेनेच्या एका विमानाने 50 परराष्ट्र अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना परत आणण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलंय.
भारत सरकारने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं. 1990च्या दशकामध्ये तालिबानचं मुख्यालय कंदाहारमध्ये होतं. आणि पुन्हा एकदा कंदाहार आपल्या ताब्यात घेण्यासाठी तालिबान त्या दिशेने कूच करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
सध्यातरी भारताचा काबुलमधला आणि मजार-ए-शरीफमधला वाणिज्य दूतावास बंद झालेला नाही. पण तालिबान अशाच प्रकारे पुढे सरकत राहिलं तर काबुलमधील भारतीय वाणिज्य दूतावास सुरक्षित ठेवणं सोपं जाणार नसल्याची भीती तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.
भारत आणि अफगाणिस्तानाच्या सीमा एकमेकांना लागून नसल्या तरी भारताने अफगाणिस्तानात चार वाणिज्य दूतावास उघडले असल्याचं नुकतंच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मदमूद कुरेशी यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
याआधी भारत सरकारने जलालाबाद आणि हेरातमधल्या आपल्या वाणिज्य दूतावासांचं काम एप्रिल 2020 मध्ये थांबवत तिथल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं होतं.
परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण
या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी निवेदन प्रसिद्ध केलं. भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलंय,
"अफगाणिस्तानातल्या वाढत्या सुरक्षा प्रश्नावर भारत लक्ष ठेवून आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे. कंदाहारमधला वाणिज्य दूतावास बंद करण्यात आलेला नाही. पण कंदाहार शहराजवळची वाढती हिंसा पाहता भारतीय कर्मचाऱ्यांना परत आणण्यात आलेलं आहे. हे तात्पुरतं पाऊल आहे."
"स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत या वाणिज्य दूतावासचं काम सुरु राहील. अफगाणिस्तान आमचा महत्त्वाचा साथीदार आहे आणि भारत तिथलं सार्वभौमत्व, शांतता आणि लोकशाही यांच्यासाठी कटिबद्ध आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तर 'भारताला वाटणारी काळजी आपण समजू शकत असल्याचं' अफगाणिस्तानातले भारतातले राजदूत फरीद मामुन्दजई यांनी या प्रकरणी बोलताना सांगितलं.
CNN न्यूज18शी बोलताना फरीद मामुन्दजई म्हणाले, "कोणताही वाणिज्य दूतावास बंद व्हावा अशी अफगाणिस्तान सरकारची इच्छा नाही. पण कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेणाऱ्या देशांना वाटणारी काळजीही आम्ही समजू शकतो."
पाकिस्तानातून प्रतिक्रिया
कंदाहारच्या वाणिज्य दूतावासातून भारतीय कर्मचाऱ्यांना परत आणण्यावर पाकिस्तानातूनही मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताला अफगाणिस्तानात लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानातून आपले कर्मचारी परत आणण्याशिवाय भारताकडे दुसरा पर्याय नव्हता, असं त्यांनी म्हटलंय. जोपर्यंत अफगाणिस्तानात स्थैर्य येत नाही तोपर्यंत चीनने तिथे केलेल्या गुंतवणुकीचाही फारसा फायदा होणार नसल्याचं शेख रशीद यांनी म्हटलंय.
तर पाकिस्तानचे यापूर्वी भारतातले राजदूत म्हणून काम केलेल्या अब्दुल बासित यांनी शिवेसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदींचं एक ट्वीट रीट्वीट करत म्हटलंय,
"भारत संवेदनशील असता आणि अफगाणिस्तानचा वापर त्यांनी पाकिस्तान विरोधातल्या दहशवादी कारवायांसाठी केला नसता, तर बरं झालं असतं. सोबतच काश्मिर वादावर तोडगा काढतानाही त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला हवी होती. भारताच्या हेकेखोरपणामुळे या पूर्ण भागात अस्थिरता निर्माण झाली आहे. क्वाड याचंच उदाहरण आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अफगाणिस्तानातल्या वाढत्या तालिबान प्रभावाविषयी प्रियांका चतुर्वेदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "अफगाणिस्तानात तालिबानचा वाढता प्रभाव आणि पाकिस्तानसोबत त्यांची मैत्री आणि चीनसोबतची वाढती जवळीक हे फक्त भारतासाठीच नाही तर इतर देशांसाठीही धोक्याचं आहे. कट्टरपंथीचं या भागातलं वाढतं बळ हे सगळ्याच चांगल्या गोष्टींवर परिणाम करणारं आहे."
पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी पाकिस्तानी चॅनल ARYशी बोलताना भारतावर टीका केली.
ते म्हणाले, "पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानात गुंतवणूक केली. आता अफगाणिस्तानातली परिस्थिती बदलू लागल्यावर भारताला वाटणारी काळजी दिसून येतेय. आता भारत पाकिस्तानावर सगळे आरोप करेल पण त्यांच्या प्रॉपोगांडाचा आता फायदा होणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
कंदाहारमधल्या भारताच्या वाणिज्य दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना परत आणण्यात आल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये छापून आल्या आहेत.
रशियानेही बंद केले वाणिज्य दूतावास
गेल्या आठवड्यात रशियानेही उत्तर अफगाणिस्तानातल्या मजार-ए-शरीफमधला आपला वाणिज्य दूतावास बंद करत असल्याचं जाहीर केलं होतं. या महिन्याच्या सुरुवातीलाच चीननेही अफगाणिस्तानातल्या त्यांच्या 210 नागरिकांना परत बोलवून घेतलं होतं.
अमेरिकेने त्यांच्या 90% सैनिकांना परत बोलावलं असून 31 ऑगस्टपर्यंत हे सगळे सैनिक परततील, असं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानातल्या या मोहिमेमध्ये अमेरिकेला साफ अपयश आल्याचं अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनी 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
अफगाणिस्तानातल्या पायाभूत क्षेत्राच्या निर्मितीमध्ये भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. पण अमेरिकन सैनिकांचं तिथे असणं आणि लोकशाहीवादी सरकार असल्याने हे शक्य होऊ शकलं होतं.
तालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सूत्रं आल्यास भारतासाठी गोष्टी सोप्या नसतील असा अंदाज वर्तवला जातोय. तालिबान आणि पाकिस्तानचे संबंध कायमच वादग्रस्त होते. पण आता तालिबान भारताच्या विरुद्ध असल्याचं जगजाहीर आहे.
अशामध्ये अफगाणिस्तानची सूत्र तालिबानच्या हाती येणं भारतासाठी मोठा झटका असेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








