UFO : अमेरिकेत दिसल्या उडत्या तबकड्या, पेंटागॉनलाही उकललं नाही गूढ

आकाशातल्या या घटनांचं गूढ सोडवण्यासाठी पेंटागॉनने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन लष्कराच्या पायलट्सना वेळोवेळी दिसलेल्या डझनभरापेक्षा जास्त उडत्या तबकड्या म्हणजे UFO चं गूढ अजूनही उकललं नसल्याचं अमेरिकन सरकारने म्हटलंय.

2004 पासून वेळोवेळी पायलट्सना अशा तबकड्या दिसल्याच्या एकूण 144 नोंदी आहेत. याविषयीचा एक अहवाल पेंटागॉनने शुक्रवारी (25 जून) रोजी प्रसिद्ध केला. यातलं एक प्रकरण वगळता इतर सगळ्या प्रकरणाचं गूढ कायम असल्याचं पेंटागॉनच्या अहवालात म्हटलंय.

ही वस्तू परग्रहावरची वा पृथ्वीबाहेरची असल्याची शक्यता या अहवालात नाकारण्यात आलेली नाही.

आकाशामध्ये अनेक अनोळखी गोष्टी उडताना दिसल्याचं अमेरिकन सैन्याने अनेकवेळा नोंदवलं होतं. यानंतर याविषयीचा अहवाल तयार करण्याची मागणी अमेरिकन काँग्रेसने केली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

यानंतर पेंटागॉन म्हणजे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांच्या मुख्यालयाने ऑगस्ट 2020 मध्ये या सगळ्या घटनांच्या नोंदींचा तपास करण्यासाठी एक 'अनआयडेंटिफाईड एरियल फिनॉमेना टास्क फोर्स' म्हणजेच आकाशात आढळलेल्या अनोळखी हालचालींसाठीचं तपास पथक स्थापन केलं.

या घटनांचा शोध घेऊन, त्याचा सखोल तपास करून वर्गीकरण करण्याचं काम या गटाने केलं. यासोबतच UFO - Unidentified Flying Objects म्हणजेच उडत्या तबकड्यांविषयीची अधिक माहिती आणि त्यांचं स्वरूप, उगम शोधण्याचा प्रयत्न केल्याचं पेंटागॉनने म्हटलंय.

या अहवालातून काही नवीन समोर आलं का?

शुक्रवारी याविषयीचा अंतरिम अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आकाशात अनोळखी गोष्ट दिसण्याच्या एकूण 144 घटनांपैकी बहुतेक गेल्या 2 वर्षांत घडल्याच्या नोंदी आहेत. अमेरिकन नेव्हीने अशाप्रकारच्या घटना वा दृश्यांची नोंद करण्यासाठीची एक ठराविक पद्धती आखल्यानंतर या नोंदी करण्यात आलेल्या आहेत.

एकूण 144 पैकी 143 घटनांमध्ये "या घटनांचा संबंध कशासोबत जोडण्यासाठी वा त्याविषयी विस्ताराने सांगण्यासाठीची पुरेशी माहिती आमच्याकडे नाही," असं या अहवालात म्हटलंय.

यासोबतच 'या गोष्टींचा परग्रहाशी काही संबंध आहे का, यासाठीच्याही कोणत्याही स्पष्ट खुणा नसल्याचं' या अहवालात म्हटलं असलं, तरी ही शक्यता या अहवालाने फेटाळूनही लावलेली नाही.

"या घटनांबद्दल एकसमान स्पष्टीकरण देता येणार नाही. ही रशिया किंवा चीनसारख्या इतर देशांची टेक्नॉलॉजी असू शकते किंवा रडार यंत्रणांवर दिसू शकणाऱ्या बर्फाच्या क्रिस्टल्ससारखी नैसर्गिक घटना असू शकते. तसंच अमेरिकेतल्या संस्था वा व्यक्तींनी चालवलेले प्रयोग वा गुप्त योजना असू शकतात," असं या अहवालात म्हटलंय.

UFO हा विषय अमेरिकनांसाठी कायमच कुतुहलाचा विषय राहिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, UFO हा विषय अमेरिकनांसाठी कायमच कुतुहलाचा विषय राहिला आहे.

यातल्या एका घटनेबद्दल आपण ठामपणे सांगू शकतो, असं या अहवालात म्हटलंय. हा एक मोठा, हवा काढता येण्याजोगा फुगा होता, असं अहवालात म्हटलंय.

आकाशात वस्तू आढळण्याच्या या घटना म्हणजे, "हवाई उड्डाणांसाठी धोका असून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीही हे आव्हान असल्याचं," या अहवालात पुढे म्हटलंय.

अशा घटनांबद्दल आता आणखी माहिती कशी गोळा करता येईल यासाठी पर्याय शोधण्यात येत असल्याचं टास्कफोर्सने म्हटलंय. शिवाय यासाठी अधिक निधी मिळाल्यास आणखी सखोल अभ्यास करता येणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

काय पुरावे आहेत?

एप्रिल 2020मध्ये अमेरिकेच्या संरक्षण खात्याने आकाशातल्या या घटनांचे काही व्हिडिओज प्रसिद्ध केले. अमेरिकन नेव्हीने हे चित्रण केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

अमेरिकेच्या CBS न्यूज चॅनलवरच्या एका 60 मिनिटांच्या कार्यक्रमात 2 माजी नेव्ही पायलट सहभागी झाले होते. पॅसिफिक महासागरावरून उडत असताना त्यांच्या हालचालींप्रमाणेच हलणारी एक वस्तू आपल्याला दिसल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

ही लहानशी वस्तू टिक-टॅकच्या गोळ्यांप्रमाणे दिसणारी असल्याचं एका पायलटने सांगितलं.

व्हीडिओ कॅप्शन, याबद्दल लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हे व्हीडियो प्रसिद्ध केल्याचं पेंटॅगॉनने म्हटलं आहे.

"ती वस्तू अगदी तशीच होती, फक्त ती अतिशय वेगाने, वेडीवाकडी फिरत होती आणि ती नेमकी कोणत्या बाजूला वळेल याचा अंदाज आम्हाला लावता येत नव्हता. नेमकी ही वस्तू कशी कंट्रोल करण्यात येत होती, ती पुढे कशी जात होती हे देखील समजत नव्हतं," अमेरिकन नेव्हीचे माजी पायलट आणि या घटनेचे साक्षीदार असणाऱ्या अॅलेक्स डायट्रिच यांनी बीबीसीला सांगितलं.

"त्या वस्तूच्या मागून कोणताही धूर येताना दिसत नव्हता किंवा ती वस्तू पुढे ढकलेल असा प्रॉपेलर - म्हणजे पंखाही नव्हता. त्याच्या पृष्ठभागावर कोणतेही कंट्रोल्स किंवा दिशा बदलण्यासाठीची यंत्रणा दिसत नव्हती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)