Matt Hancock : किस केल्यानं आरोग्यमंत्र्यांनी गमावलं मंत्रिपद

मॅट हॅन्कॉक. गीना गोलाडंगेलो

फोटो स्रोत, Getty Images

किस केल्यामुळे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी मंत्रिपद गमावलं आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयात सहकारीला किस केल्याने हॅन्कॉक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना लिहिलेल्या पत्रात हॅन्कॉक लिहितात की, "कोरोना संकटाने असंख्य निरपराध माणसांचं आयुष्य हिरावून घेतलं आहे. हे लक्षात घेता आपल्या हातून काही चूक घडली तर त्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी."

कोरोना नियमावलीचं पालन न केल्याप्रकरणी हॅन्कॉक यांनी माफीही मागितली आहे.

हॅन्कॉक यांचा राजीनामा दु:खद असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. हॅन्कॉक यांनी राजीनामा दिल्याने साजिद जावेद यांच्याकडे आरोग्य खातं सोपवण्यात आलं आहे.

आरोग्यमंत्री आणि आरोग्य मंत्रालयात नॉन एक्झ्युक्युटिव्ह संचालक म्हणून कार्यरत गीना कोलाडंगेलो यांचा एकत्रित फोटो समोर आला होता. हा फोटो 6 मे रोजीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

मॅट हॅन्कॉक. गीना गोलाडंगेलो

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक

ब्रिटनमधील सन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर हॅन्कॉक यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला.

आरोग्य मंत्रालयाच्या परिसरात हा फोटो घेण्यात आल्याचा दावा वर्तमानपत्राने केला होता.

दरम्यान हॅन्कॉक आणि कोलाडंगेलो यांचं लग्न झालं आहे. त्यांच्या पक्षाच्या सदस्यांसह कोरोना संकटात आप्तस्वकीय गमावलेल्या नातेवाईकांच्या समूहाने हॅन्कॉक यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली होती.

बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा क्वेन्सबर्ग यांच्या मते, पंतप्रधान कार्यालयाने हे स्पष्ट केलं आहे की हॅन्कॉक यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान गीना कोलाडंगेलो यांनीही आरोग्य मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यानंतरही विरोधी पक्षांचा राग शांत झालेला नाही. पंतप्रधानांनी हॅन्कॉक यांना आधीच पदावरून बाजूला करायला हवं होतं असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे.

आरोग्य मंत्रालात कोलागंडेलो यांच्या नियुक्तीवरूनही वादाला तोंड फुटलं आहे. सप्टेंबर 2020 मध्ये आरोग्य मंत्रालयात नॉन एक्झ्क्युटिव्ह संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मॅट हॅन्कॉक. गीना गोलाडंगेलो

हॅन्कॉक आणि कोलागंडेलो महाविद्यालयीन काळापासून एकमेकांचे मित्र आहेत. हॅन्कॉक यांनी गीना यांना 15 हजार पौंड वार्षिक पगारावर नियुक्त केलं होतं. त्यांना वर्षातून 15ते 20 दिवसच काम करायचं होतं.

आरोग्यमंत्रांनी पदाचा गैरवापर करत मैत्रीण गीना यांची नियुक्ती केली असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. करदात्यांवर झालेला अन्याय आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

गीना यांच्या नियुक्तीवेळी सर्व नियमांचं पालन करण्यात आलं होतं असं सरकारने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)