कोरोना लस : कोरोनाच्या लशीमुळे किती दिवसांपर्यंत संरक्षण मिळेल? WHO ने दिलं हे उत्तर

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

कोव्हिड-19 च्या जागतिक महामारीच्या संकटामध्ये सर्वच देशांचं प्राधान्य सध्या लसीकरणाला आहे. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील सर्व देश जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं कामाला लागले आहेत.

जगभरात विविध कंपन्यांच्या लशींना मान्यताही मिळाली आहे. पण अनेकदा या लशींच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच WHOनं यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)कोव्हिड-19 च्या लशीच्या सुरक्षिततेविषयी केलेलं हे वक्तव्य आहे. त्यानुसार सध्या उपलब्ध असलेल्या लशी या प्रामुख्यानं कोरोनामुळं होणारे मृत्यू आणि उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यापासून बचाव करत आहेत.

लशींच्या सुरक्षिततेविषयी WHO ला विचारण्यात आलेला आणखी एक प्रश्न असाही होता की, या लशींमुळे किती काळापर्यंत संरक्षण प्राप्त होतं. मात्र याबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर WHO कडून देण्यात आलं आहे.

"सध्या जगभरात ज्या लशी उपलब्ध आहेत, त्या व्यक्तीला नेमक्या किती दिवसांपर्यंत कोव्हिड-19 पासून संरक्षण देऊ शकतात, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र पुढच्या वर्षभरामध्ये याबाबत नेमकी माहिती हाती येईल," असं WHO नं स्पष्ट केलं आहे.

WHO नं याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, ''प्रत्येक लस ही वेगवेगळ्या पद्धतीनं संरक्षण प्रदान करत असते. उदाहरण द्यायचं झाल्यास, सिझनल इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन ही दरवर्षी दिली जाते. त्याचं कारण म्हणजे विषाणू हा सातत्यानं त्याचं रुप बदलत असतो आणि शिवाय अनेक महिन्यांनी लशीद्वारे मिळणारं संरक्षणही कमी होत असतं.''

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत WHO नं असंही म्हटलं की, "गोवर आणि कांजण्यांसाठीच्या लशी या अनेक वर्षांपर्यंत किंवा आयुष्यभरासाठी आपल्याला या आजारांपासून संरक्षण देतात. सार्स-सीओव्ही-2-कोरोना व्हायरस मध्ये रुपांतरीत होतो आणि त्याची अनेक रुपं (व्हेरिएंट) तयार करतो.

"जगातील अनेक देशांमध्ये ते पाहायला मिळालं आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्था सध्या उपलब्ध असलेल्या लशी, विषाणूच्या या नव्या रुपापासून दीर्घकाळ सुरक्षा देऊ शकतील का, याचा अभ्यास करत आहे, असंही सांगण्यात आलं आहे."

''अनेक लस निर्माते हे सध्या विविध प्रकारच्या व्हेरिएंटसाठी लशींची निर्मिती करत आहेत. तसंच या लशींबरोबरच त्या व्हेरिएंटपासून संरक्षण देणारे बूस्टर शॉट्सदेखील असतील अशीही आशा आहे,'' असं मतही जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)