कोरोना लस : काही देशांमध्ये कधीच कोरोनाचं लसीकरण होणार नाही का?

जागतिक लसीकरण

कोव्हिड 19साठीची लस द्यायला जगातल्या अनेक देशांत सुरुवात झालीय. पण प्रत्येकाला प्रश्न पडलाय - मला लस कधी मिळणार?

कारण कोव्हिड 19साठीची लस सगळ्या जगाला देणं हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

काही मोजक्या देशांनीच लसीकरणासाठीची नेमकी उद्दिष्टं ठेवली आहेत, पण जगभरात इतरत्र मात्र हे चित्र इतकं स्पष्ट नाही.

लसीकरणाची ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्यात अनेक देशांमधल्या कंपन्यांचा सहभाग आहे, जगभरातल्या सरकारांनी याविषयीची वेगवेगळी वक्तव्यं केलेली आहेत आणि देशांच्या नियामक संस्था आणि अधिकाऱ्यांचा या प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग आहे. म्हणूनच लस उपलब्ध होणं, तिला मान्यता मिळणं आणि जगामध्येच लसीकरण मोहीम राबवली जाणं, ही सरळसोपी प्रक्रिया नाही.

मला लस कधी मिळणार?

भारतामध्ये 16 जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. यामध्ये आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर आता 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरू झाला असून यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येतेय.

सरकारी लसीकरण केंद्रांसोबतच काही खासगी हॉस्पिटल्सनाही लस देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images / INDRANIL MUKHERJEE

सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड लस आणि भारत बायोटेक - ICMR ची कोव्हॅक्सिन या दोन लशी सध्या भारतात दिल्या जात आहेत. खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीच्या प्रत्येक डोससाठी 250 रुपये आकारले जात आहेत.

जगभरात कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम कशी सुरू आहे, ते पहा.

जगभरातील लसीकरण मोहीम

स्क्रोल करा
जग
61
12,12,05,24,547
चीन
87
3,40,36,43,000
भारत
66
1,97,89,18,170
अमेेरिका (USA)
67
59,62,33,489
ब्राझील
79
45,69,03,089
इंडोनेशिया
61
41,75,22,347
जपान
81
28,57,56,540
बांगलादेश
72
27,87,85,812
पाकिस्तान
57
27,33,65,003
व्हिएतनाम
83
23,35,34,502
मेक्सिको
61
20,91,79,257
जर्मनी
76
18,29,26,984
रशिया
51
16,89,92,435
फिलिपीन्स
64
15,38,52,751
इराण
68
14,99,57,751
युनायटेड किंग्डम
73
14,93,97,250
तुर्कस्तान
62
14,78,39,557
फ्रान्स
78
14,61,97,822
थायलंड
76
13,90,99,244
इटली
79
13,83,19,018
दक्षिण कोरिया
87
12,60,15,059
अंर्जेंटिना
82
10,60,75,760
स्पेन
87
9,51,53,556
इजिप्त
36
9,14,47,330
कॅनडा
83
8,62,56,122
कोलंबिया
71
8,57,67,160
पेरू
83
7,78,92,776
मलेशिया
83
7,12,72,417
सौदी अरेबिया
71
6,67,00,629
म्यानमार
49
6,22,59,560
चिली
92
5,96,05,701
तैवान
82
5,82,15,158
ऑस्ट्रेलिया
84
5,79,27,802
उझबेकिस्तान
46
5,57,82,994
मोरोक्को
63
5,48,46,507
पोलंड
60
5,46,05,119
नायजेरिया
10
5,06,19,238
इथिओपिया
32
4,96,87,694
नेपाळ
69
4,68,88,075
कंबोडिया
85
4,09,56,960
श्रीलंका
68
3,95,86,599
क्युबा
88
3,87,25,766
व्हेनेझुएला
50
3,78,60,994
दक्षिण आफ्रिका
32
3,68,61,626
इक्वेडोर
78
3,58,27,364
नेदरलँड
70
3,33,26,378
युक्रेन
35
3,16,68,577
मोझाम्बिक
44
3,16,16,078
बेल्जियम
79
2,56,72,563
संयुक्त अरब अमिराती
98
2,49,22,054
पोर्तुगाल
87
2,46,16,852
रवांडा
65
2,27,15,578
स्वीडन
75
2,26,74,504
युगांडा
24
2,17,56,456
ग्रीस
74
2,11,11,318
कझाकस्तान
49
2,09,18,681
अंगोला
21
2,03,97,115
घाना
23
1,86,43,437
इराक
18
1,86,36,865
केनिया
17
1,85,35,975
ऑस्ट्रिया
73
1,84,18,001
इस्रायल
66
1,81,90,799
ग्वााटेमाला
35
1,79,57,760
हाँगकाँग
86
1,77,31,631
चेक प्रजासत्ताक
64
1,76,76,269
रोमेनिया
42
1,68,27,486
हंगेरी
64
1,65,30,488
डॉमिनिकन प्रजासत्ताक
55
1,57,84,815
स्वित्झर्लंड
69
1,57,59,752
अल्जेरिया
15
1,52,05,854
होंडुरास
53
1,44,44,316
सिंगापूर
92
1,42,25,122
बोलिव्हिया
51
1,38,92,966
ताजिकिस्तान
52
1,37,82,905
अझरबैजान
47
1,37,72,531
डेन्मार्क
82
1,32,27,724
बेलारूस
67
1,32,06,203
ट्युनिशिया
53
1,31,92,714
आयव्हरी कोस्ट
20
1,27,53,769
फिनलंड
78
1,21,68,388
झिम्बाब्वे
31
1,20,06,503
निकाराग्वा
82
1,14,41,278
नॉर्वे
74
1,14,13,904
न्यूझीलंड
80
1,11,65,408
कोस्टा रिका
81
1,10,17,624
आयर्लंड
81
1,09,84,032
एल साल्वाडोर
66
1,09,58,940
लाओस
69
1,08,94,482
जॉर्डन
44
1,00,07,983
पॅराग्वे
48
89,52,310
टांझानिया
7
88,37,371
उरुग्वे
83
86,82,129
सर्बिया
48
85,34,688
पनामा
71
83,66,229
सुदान
10
81,79,010
कुवेत
77
81,20,613
झाम्बिया
24
71,99,179
तुर्कमेनिस्तान
48
71,40,000
स्लोव्हाकिया
51
70,76,057
ओमान
58
70,68,002
कतार
90
69,81,756
अफगाणिस्तान
13
64,45,359
गिनी
20
63,29,141
लेबनॉन
35
56,73,326
मंगोलिया
65
54,92,919
क्रोएशिया
55
52,58,768
लिथुएनिया
70
44,89,177
बल्गेरिया
30
44,13,874
सीरिया
10
42,32,490
पॅलेस्टाईन
34
37,34,270
बेनिन
22
36,81,560
लिबिया
17
35,79,762
नायजर
10
35,30,154
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो
2
35,14,480
सिएरा लिओन
23
34,93,386
बहारीन
70
34,55,214
टोगो
18
32,90,821
किर्गिझस्तान
20
31,54,348
सोमालिया
10
31,43,630
स्लोवेनिया
59
29,96,484
बुर्किना फासो
7
29,47,625
ॲल्बेनिया
43
29,06,126
जॉर्जिया
32
29,02,085
लॅटव्हिया
70
28,93,861
मॉरिटानिया
28
28,72,677
बोट्सवाना
63
27,30,607
लायबेरिया
41
27,16,330
मॉरिशस
74
25,59,789
सेनेगल
6
25,23,856
माली
6
24,06,986
मादागास्कर
4
23,69,775
चॅड
12
23,56,138
मलावी
8
21,66,402
मोल्डोव्हा
26
21,65,600
अर्मेनिया
33
21,50,112
एस्टोनिया
64
19,93,944
बोस्निया आणि हर्जेगोविना
26
19,24,950
भूतान
86
19,10,077
उत्तर मॅसिडोनिया
40
18,50,145
कॅमरून
4
18,38,907
कोसोवो
46
18,30,809
सायप्रस
72
17,88,761
तिमोर-लेस्ते
52
16,38,158
फिजी
70
16,09,748
त्रिनिदाद आणि टोबॅगो
51
15,74,574
जमैका
24
14,59,394
मकाऊ
89
14,41,062
माल्टा
91
13,17,628
लक्झम्बर्ग
73
13,04,777
दक्षिण सुदान
10
12,26,772
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
22
12,17,399
ब्रुनेई
97
11,73,118
गयाना
58
10,11,150
मालदीव
71
9,45,036
लेसोथो
34
9,33,825
येमेन
1
8,64,544
रिपब्लिक ऑफ काँगो
12
8,31,318
नामिबिया
16
8,25,518
गाम्बिया
14
8,12,811
आईसलँड
79
8,05,469
केप व्हर्ड
55
7,73,810
मॉन्टेनिग्रो
45
6,75,285
कमोरोस
34
6,42,320
पापुआ न्यू गिनी
3
6,15,156
गिनी बिसॉ
17
5,72,954
गॅबॉन
11
5,67,575
एस्वाटिनी
29
5,35,393
सुरीनाम
40
5,05,699
समोआ
99
4,94,684
बेलीझ
53
4,89,508
इक्वेटोरियल गिनी
14
4,84,554
सोलोमन बेटे
25
4,63,637
हैती
1
3,42,724
बहामा
40
3,40,866
बार्बाडोस
53
3,16,212
व्हानुआतू
40
3,09,433
टोंगा
91
2,42,634
जर्सी
80
2,36,026
जबूती
16
2,22,387
सेशेल्स
82
2,21,597
साओ टोम आणि प्रिन्सपी
44
2,18,850
आईल ऑफ मॅन
79
1,89,994
गर्नजे
81
1,57,161
अँडोरा
69
1,53,383
किरबाती
50
1,47,497
केयमेन आयलंड्स
90
1,45,906
बर्म्युडा
77
1,31,612
अँटिग्वा आणि बार्बुडा
63
1,26,122
सेंट लुसिया
29
1,21,513
जिब्रोल्टर
123
1,19,855
फॅरो आयलंड्स
83
1,03,894
ग्रेनाडा
34
89,147
ग्रीनलँड
68
79,745
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
28
71,501
लिखटनस्टाईन
69
70,780
टर्क अँड केकॉस आयलंड्स
76
69,803
सान मरीनो
69
69,338
डॉमिनिका
42
66,992
मोनॅको
65
65,140
सेंट किट्स आणि नेव्हिस
49
60,467
ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स
59
41,198
कुक आयलंड्स
84
39,780
अँग्विला
67
23,926
नाऊरू
79
22,976
बुरुंडी
0.12
17,139
टुवालू
52
12,528
सेंट हेलेना
58
7,892
मॉन्तसेरात
38
4,422
फॉकलंड आयलंड्स
50
4,407
न्यूए
88
4,161
टोकलाव
71
1,936
पिटकर्न
100
94
उत्तर कोरिया
0
0
एरिट्रिया
0
0
दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण सँडविच आयलंड
0
0
ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र
0
0
व्हॅटिकन
0
0

संपूर्ण मजकूर नीट पाहण्यासाठी तुमचा ब्राउजर अपडेट करा

आतापर्यंत किती लशी देण्यात आल्या आहेत?

जगभरातल्या 100 देशांत आतापर्यंत कोव्हिड 19साठीच्या विविध लशींचे मिळून 30 कोटींपेक्षा जास्त डोसेस देण्यात आलेले आहेत. जगाच्या इतिहासातली ही आजवरची सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आहे.

चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसचं प्रकरण आढळल्याच्या वर्षभरापेक्षा कमी काळातच लस द्यायला सुरुवात झाली खरी, पण जगभरातल्या लसीकरण मोहीमेत असमानता आहे.

काही देशांनी त्यांच्या लोकसंख्येतल्या बहुतेकांसाठी लागणारे लशीचे डोसेस मिळवले असून ते या लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवातही झालेली आहे. पण त्यापेक्षा अधिक देश अजूनही लशीच्या डोसेसच्या पहिल्या बॅचची वाट पाहतायत.

बहुतेक देश त्यांच्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात या नागरिकांना प्राधान्य देत आहेत :

  • 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले
  • आरोग्यसेवक
  • कोव्हिड होण्याचा धोका जास्त असणारे लोक

इस्रायल आणि युकेसारख्या देशांमध्ये लशीचे परिणाम दिसायला लागले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची आणि मृत्यूंची संख्या घटलीय आणि सोबतच कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे समाजामध्ये पसरणारं संक्रमणही कमी झालंय.

जवळपास सगळा युरोप आणि अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरू झाली असली तरी आफ्रिकेतल्या मोजक्याच देशांत लसीकरण सुरू झालंय.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images /NurPhoto

द इकॉनिमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) मधले ग्लोबल फोरकास्टिंग विभागाचे संचालक अगाथे डेमरैस यांनी याविषयी सखोल संशोधन केलंय.

लशीसाठीची जगातली एकूण उत्पादन क्षमता, ही लस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक आरोग्यव्यवस्था, त्या देशाची एकूण लोकसंख्या आणि या देशाला किती लस परवडणार आहे यांचा अभ्यास करण्यात आला.

या संशोधनातून निष्पन्न झालेल्या गोष्टी या श्रीमंत विरुद्ध गरीब या फरकानुसार काहीशा अपेक्षित आहेत. सध्याच्या घडीला युके आणि अमेरिकेमध्ये लशींचा चांगला पुरवठा आहे. कारण लशीच्या विकास प्रक्रियेमध्ये भरपूर पैसे गुंतवणं या देशांना शक्य होतं आणि परिणामी लस मिळवण्याच्या शर्यतीत हे देश आघाडीवर होते.

कॅनडा आणि युरोपातले काही श्रीमंत देश या दोघांच्या पाठोपाठ आहेत.

कमी उत्पन्न गटामधल्या बहुतांश देशांमध्ये अद्याप लसीकरणाला सुरुवात झालेली नाही. पण याला काही अपवाद आहेत.

जागतिक लसीकरण मोहीम

श्रीमंत देशांनी लशींचा साठा करून ठेवलाय का?

आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या गरजेपेक्षा पाच पटींनी जास्त लशी विकत घेतल्यामुळे 2020च्या अखेरीस कॅनडावर टीका झाली होती. पण त्यांना लशींची प्राधान्याने डिलिव्हरी मिळणार नसल्याचं दिसतंय.

डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना कदाचित अमेरिका लशींच्या निर्यातीवर बंदी घालेल असा विचार करत कॅनडाने युरोपातल्या लस उत्पादक कंपन्यांच्या लशीमध्ये गुंतवणूक केली. पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरलेला दिसतोय.

युरोपातल्या कंपन्या लस पुरवठा सुरळीत ठेवू शकलेल्या नाहीत आणि गेल्या काही काळात युरोपातल्या देशांनीच निर्यातीवर बंदी घालण्याची धमकी दिलेली आहे. ऑस्ट्रेलियाला जाणारे लशीचे काही डोस इटलीने रोखून धरले.

पण अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करणारेही काही देश आहेत.

कोरोना लस

लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना लस देणाऱ्या जगातल्या देशांच्या यादीमध्ये, हा लेख लिहीतेवेळी सर्बिया आठव्या क्रमांकावर होता. युरोपियन युनियनमधल्या कोणत्याही देशापेक्षा हा देश आघाडीवर आहे.

लसीकरण मोहीमेची परिणामकारक अंमलबजावणी हे सर्बियाच्या यशाचं गमक आहेच पण सोबतच लसीसाठी त्यांनी धोरणात्मकरित्या केलेले करारही यासाठी कारणीभूत आहेत. रशिया आणि चीन हे दोन्ही देश पूर्व युरोपात जम बसवण्यासाठी धडपडतायत. रशियाची स्पुटनिक-5 लस आणि चीनची सायनोफार्म लस अशा दोन्ही लशी उपलब्ध असणाऱ्या मोजक्या देशांपैकी सर्बिया एक आहे.

कागदोपत्री सर्बियन नागरिकांना फायझर, स्पुटनिक किंवा सायनोफार्म लस निवडण्याचा पर्याय दिला जात असला, तरी प्रत्यक्षात बहुतेकांना सायनोफार्म लस दिली जातेय.

व्हॅक्सिन डिप्लोमसी म्हणजे काय?

चीनचा या प्रदेशावरचा प्रभाव दीर्घकालीन राहण्याची शक्यता आहे. चीनच्या सायनोफार्म लशीचे दोन्ही डोस वापरणारे देश, भविष्यात गरज पडल्यास पुढच्या बूस्टर डोससाठीही चीनवरच अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

युनायटेड अरब अमिरात - UAE देखील चीनच्या लशीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्या त्यांच्याकडे देण्यात येणाऱ्या एकूण लशींपैकी 80% लशी या सायनोफार्म आहेत. UAE मध्ये सायनोफार्मच्या निर्मितीसाठीचा कारखानाही उभारण्यात येतोय.

"लशीच्या उत्पादनासाठीचे कारखाने, प्रशिक्षित कर्मचारी हे सगळं चीनकडून पुरवण्यात येतंय. त्यामुळेच चीनचा प्रभाव दीर्घकालीन असेल. आणि यामुळेच ही लस घेणाऱ्या देशाच्या सरकारला भविष्यात चीनला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणणं अतिशय कठीण जाईल."

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images / triloks

पण जगाला लशीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणं याचा अर्थ स्वतःच्या देशातल्या लोकसंख्येला सर्वांत आधी लस मिळेलच असं नाही.

जगाला लशींचा सर्वाधिक पुरवठा करणाऱ्या दोन देशांत - चीन आणि भारतात 2022च्या अखेरपर्यंत पुरेशा प्रमाणात लसीकरण होणार नसल्याचा अंदाज EIUच्या संशोधनात व्यक्त करण्यात आलाय. या दोन्ही देशांमधली प्रचंड मोठी लोकसंख्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा यामुळे या दोन्ही देशांतल्या लसीकरणाला वेळ लागणार आहे.

आव्हानं काय आहेत?

कोव्हिडच्या लशीचा जगातला सर्वांत मोठा उत्पादक म्हणून भारताला मिळालेलं यश हे खरंतर, अदर पूनावाला या एका माणसामुळे मिळालेलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पूनावालांची कंपनी जगातली सर्वांत मोठी लस उत्पादक आहे.

पण लशीची परिणामकारकता सिद्ध होण्याआधीच त्यामध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या अदर पूनावालांच्या निर्णयावर त्यांच्या घरच्यांनीच शंका घ्यायला सुरुवात केली होती.

ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनकाने तयार केलेली लस जानेवारी महिन्यामध्ये भारत सरकारने स्वीकारली आणि आता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लशीच्या 24 लाख डोसेसचं दररोज उत्पादन करण्यात येतंय.

अदर पूनावाला सांगतात, "मला वाटलं होतं की उत्पादन तयार झालं की हा तणाव संपेल. पण सगळ्यांना खुश ठेवणं हे सगळ्यांत मोठं आव्हान आहे."

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images /John M Lund Photography Inc

उत्पादनाचं प्रमाण एका रात्रीत वाढवता येणार नसल्याचं ते म्हणतात.

"या गोष्टींना वेळ लागतो. लोकांना वाटतं सिरम इन्स्टिट्यूटकडे जादूची छडी आहे. आम्ही जे काही करतो त्यात चांगले आहोत, पण आमच्याकडे कोणतीही जादूची छडी नाही."

अदर पूनावालांनी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातच उत्पादनासाठीची तयारी सुरू केली आणि ऑगस्टपासून या लशीसाठी आवश्यक काचेच्या कुपी आणि घटकांचा साठा करून ठेवायला सुरुवात केली.

उत्पादनादरम्यान किती लस निर्माण होते याचा आकडा कमी जास्त होऊ शकतो किंवा उत्पादनाच्या अनेक टप्प्यांमध्ये गोष्टी बिघडूही शकतात.

"ही गोष्ट विज्ञानासोबतच सगळं काही जुळवून आणण्याच्या कलेचीही आहे," अगाथे डेमरैस सांगतात.

ज्या उत्पादक कंपन्या आता निर्मितीला सुरुवात करत आहेत, त्यांना प्रत्यक्ष लस उत्पादनासाठी अनेक महिने लागणार आहेत. शिवाय कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूसाठी (व्हेरियंट) जर लशीच्या बूस्टर डोसची गरज लागली, तर त्यासाठीही हेच लागू होईल.

कोव्हॅक्समुळे लशींच्या वितरणाचा वेग वाढेल का?

भारताला लस पुरवठा करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं पूनावाला सांगतात. यासोबतच कोव्हॅक्स योजनेद्वारे ही लस आफ्रिकेलाही पुरवण्यात येणार आहे.

कोणती लस सर्वाधिक वापरली जातेय

WHO, गावी (Gavi) ही लशीसाठीची योजना आणि CEPI - सेंटर फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस या सगळ्यांनी मिळून कोव्हॅक्स ही योजना आखली आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये परवडणाऱ्या दरात लस पोहोचवणं हे याचं उद्दिष्टं आहे.

ज्या देशांना लस घेणं परवडणार नाही, त्यांना एका विशेष निधीच्या मार्फत ही लस पुरवण्यात येईल. उरलेले देश यासाठी पैसे देतील पण या योजनेद्वारे लस घेतल्याने त्यांना ती तुलनेने कमी दरात मिळेल.

लस मिळण्यासाठी पात्र असणाऱ्या देशांच्या 20 टक्क्यांपर्यंतच्या लोकसंख्येला याद्वारे लस पुरवण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारीला लस मिळणारा घाना हा पहिला देश ठरला. या वर्षअखेरपर्यंत जगभरात लशींचे 2 अब्ज डोस पुरवणं हे कोव्हॅक्स योजनेचं उद्दिष्टं आहे.

पण या कोव्हॅक्स योजनेतले अनेक देश वैयक्तिकरित्याही लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आफ्रिका खंडातील जवळपास प्रत्येक देशाच्या नेत्याने आपल्याकडे लशीसाठी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधल्याचं अदर पूनावाला सांगतात.

अगाथे डेमरैस आणि EIU यांना या कोव्हॅक्स योजनेच्या यशाबद्दल फारशा अपेक्षा नाहीत. या योजनेच्या नियोजित गोष्टी पार पडल्या तरी यामुळे देशाच्या 20-27% लोकसंख्येला लस देण्यात येणार आहे.

"यामुळे लहानसा फरक पडेल, पण फार मोठं काही घडणार नाही," डेमरैस सांगतात.

काही देशांमध्ये 2023 पर्यंत संपूर्ण लसीकरण होणार नाही, तर काही देशांमध्ये हे कधीच घडणार नसल्याचं EIUच्या अंदाजात म्हटलंय. लसीकरणाला प्रत्येक देशाचं प्राधान्य नसेल. विशेषतः ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तरूण लोकसंख्या आहे आणि जिथे फार मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत नाहीत, अशा देशांची लसीकरणाला प्राथमिकता नसेल.

पण जोपर्यंत हा विषाणू तग धरून आहे तोपर्यंत तो स्वतःमध्ये बदल घडवून आणेल आणि संसर्ग पुढे पसरत राहील. शिवाय लसीला दाद न देणारा विषाणूही निर्माण होईल.

पण चांगली गोष्ट म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त वेगाने लस उत्पादन होत आहे. पण जगभरातल्या 7.7 अब्ज लोकांना लस देणं हे मोठं आव्हान आहे आणि हे यापूर्वी कधीही करण्यात आलेलं नाही.

सर्व सरकारांनी आपल्या जनतेला खरी माहिती देणं गरजेचं असल्याचं डेमरैस सांगतात. "पुढची काही वर्षं तरी आम्हाला लसीकरण मोहीम सगळ्यांपर्यत पोहोचवता येणं शक्य नाही, असं सांगणं कोणत्याही सरकारसाठी अतिशय कठीण आहे, आणि असं सांगण्याची कोणाचीही इच्छा नसते."

डेटा जर्नलिझम - बेकी डेल आणि नास्सोज स्टिलिआनू

या आकडेवारीबद्दल

अवर वर्ल्ड इन डेटा हा गट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांनी मिळून बनवला असून त्यांनी ही माहिती गोळा करून नकाशे तयार केले आहे.

लोकसंख्येची आकडेवारी युनायटेड नेशन्सच्या 2020च्या मध्यातल्या अंदाजांतून घेण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)