सौदी अरेबियामध्ये मशिदींच्या भोंग्यांवर निर्बंध

फोटो स्रोत, AFP
सौदी अरेबियामध्ये मशिदीवरील लाउडस्पीकर्सच्या आवाजावर मर्यादा आणण्यात आल्या आहे. सौदी सरकारनं या बंधनांचं समर्थन केलं आहे.
देशातील इस्लामिक अफेअर्स मंत्र्यांनी मशिदीवरील सर्व लाउडस्पीकर्सच्या आवाजाची मर्यादा कमाल ध्वनिक्षमतेच्या एक तृतीयांश इतकीच ठेवायला हवी, अशी घोषणा गेल्या आठवड्यात केली होती.
मंत्री अब्दुललतीफ अल-शेख यांनी म्हटलं होतं की, लोकांकडून आलेल्या तक्रारींना प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र परंपरागत मुस्लिम देश असलेल्या सौदीमध्ये सोशल मीडियावरून या निर्णयावर टीका केली जात आहे.
रेस्टॉरंट आणि कॅफेमध्येही मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या संगीतावर बंदी घाला अशी मागणी करणारा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
तक्रार करणाऱ्यांमध्ये अनेक पालकांचा समावेश होता. लाऊडस्पीकर्सच्या आवाजामुळे आपल्या मुलांच्या झोपेवर परिणाम होत असल्याचं पालकांचं म्हणणं असल्याचं अब्दुललतीफ अल-शेख यांनी म्हटलंय.
Please wait...
सरकारी टेलिव्हिजन चॅनेलवरून प्रसारित केलेल्या व्हीडिओमध्ये शेख म्हणतात की, ज्यांना प्रार्थना करायची आहे ते इमामांच्या हाकेची वाट पाहत थांबत नाहीत.
जे लोक या निर्णयावर टीका करत आहेत, त्यांना शेख यांनी 'देशाचे शत्रू' म्हणून संबोधलं आहे. ते लोक जनमताचा सूर बदलू पाहत आहेत, असंही शेख यांनी म्हटलं आहे.
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे सौदीला अधिक उदारमतवादी बनवू पाहत आहेत. सार्वजनिक आयुष्यातली धर्माची भूमिका ते कमी करू इच्छितात. त्यांच्या या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जातंय.
सौदीमध्ये आता महिलांच्या ड्रायव्हिंगवर असलेले निर्बंधही हटविण्यात आले आहेत. दुसरीकडे मोहम्मद बिन सलमान हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतानाही दिसत आहेत. अनेक टीकाकारांना त्यांनी अटक केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








