चीनमध्ये एका जोडप्याला आता 2 ऐवजी 3 अपत्यांना जन्म देण्यास परवानगी

फोटो स्रोत, Getty Images
चीननं दोन अपत्यांच्या मर्यादेचं धोरणं रद्द केलं आहे आणि एका जोडप्याला तीन अपत्यांची परवानगी दिली आहे.
शिनुआ या चीनमधील सरकारी माध्यमाच्या माहितीनुसार, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पॉलिट ब्युरोच्या बैठकीत अपत्यांसदर्भातील धोरणातल्या बदलाला मान्यता दिली.
तीन अपत्यांपर्यंत परवानगीचा निर्णय अशावेळी आलाय, जेव्हा चीनमधील लोकसंख्येचा आलेख उतरता दिसून आलाय. चीनमध्ये दशकातून एकदा जनगणना होते. या जनगणनेनंतरच चीननं तीन अपत्यांपर्यंत परवानगीचा निर्णय घेतलाय.
या नुकत्याच झालेल्या जनगणनेमुळे चिनी सरकारवर लोकसंख्येच्या बाबतीत एक प्रकारचा दबाव वाढला होता. त्यातूनच हा निर्णय झाल्याचं मानलं जातंय.
चीनच्या जनगणनेची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली, त्यानुसार गेल्या वर्षभरात म्हणजेच 2020 या वर्षात जवळपास 1 कोटी 20 लाख मुलांचा जन्म झाला. हीच आकडेवारी 2016 साली जास्त होती. म्हणजेच, 2016 या वर्षात जवळपास 1 कोटी 80 लाख मुलांचा जन्म झाला होता. 2020 या वर्षात जन्म झालेल्या मुलांची आकडेवारी ही चीनमधील 1960 पासूनच्या कुठल्याही वर्षातील सर्वांत कमी होती.
चीनच्य जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अपत्य मर्यादेबाबत काहीतरी निर्णयाचा अंदाज व्यक्त केला जातच होता. चीनमध्ये कुटुंब नियोजनाच्या धोरणात काही बदल होतील, अशी चर्चा सुरू झालीच होती. त्यानुसार, आता हा निर्णय शी जिनपिंग यांनी पॉलिटब्युरोच्या बैठकीत घेतला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








