ऑस्कर 2021: क्लोई चाओ ठरल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; ऑस्कर पुरस्कारांची घोषणा

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार क्लोई चाओ यांनी पटकावला आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या 93 वर्षांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार पटकावणाऱ्या चाओ केवळ दुसऱ्याच महिला दिग्दर्शक आहेत.
चाओ यांना नोमॅडलँड चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलं.
अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस इथे डॉल्बी थिएटर आणि युनियन स्टेशन या दोन ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 2001 पासून डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्करचं आयोजन झालं आहे.
ब्रिटनमधील कलाकारांसाठी लंडनमध्ये एक विशिष्ट ठिकाण निश्चित करण्यात आलं. कोरोना संकट असतानाही आयोजकांनी हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला नाही.
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी द फादर, जुडाज अँड ब्लॅक मसीहा, मँक, मिनारी, नोमॅडलँड, प्रॉमिसिंग यंग वुमन, साऊंड ऑफ मेटल आणि द ट्रायल ऑफ शिकागो यांना मानांकन मिळालं आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार फ्रान्सेस मॅकडरमॉटला नोमॅडलॅंडसाठी मिळाला तर अॅंथनी हॉपकिन्सला द फादर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभेनेत्याचा पुरस्कार मिळाला.
सोल हा सर्वोत्कृष्ट अनिमेशन चित्रपट ठरला आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी मँक चित्रपटाला गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट संकलनासाठी साऊंड ऑफ मेटल या चित्रपटाचे संकलक मिकेल एजी नेल्सन यांना सन्मानित करण्यात आलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








