Oscar Awards 2020: 'पॅरासाईट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

फोटो स्रोत, Getty Images
हॉलिवुडमध्ये सर्वाधिक मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कार हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये संपन्न झाला.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर दक्षिण कोरिअन सिनेमा पॅरासाईटला मिळाला आहे. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेशी भाषेतील चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला.
त्याच बरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे एकूण चार पुरस्कार पॅरासाईटला मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे मी खूप आनंदी आहे असं बाँग जून हो म्हणाले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार वॉकिन फिनिक्सला जोकरच्या भूमिकेसाठी मिळाला.
तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी झेलवेगरला ज्युडी या चित्रपटासाठी मिळाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार वन्स अपॉन टाइम इन हॉलिवुडसाठी ब्रॅड पिटला मिळाला आहे. या पुरस्कारासाठी जोई पेस्की, अॅंथनी हॉपकिन्स, अल पचिनो, टॉम हॅंक्स हे स्पर्धेत होते. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्नला मिळाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्मचा पुरस्कार टॉय स्टोरी 4 ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार अमेरिकन फॅक्टरीला मिळाला.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









