You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमान उडत असतानाच इंजिनानं पेट घेतला आणि....
अमेरिकेत बोइंग जेट विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागली आणि इंजिनचे अवशेष रहिवासी भागात कोसळले.
ही घटना डेनवरच्या जवळ घडली. विमानानं उड्डाण केल्यानंतर त्याचं इंजिन फेल झालं होतं.
बोइंग 777 विमानात 231 यात्रेकरू होते आणि 10 क्रू मेंबर्स होते. इंजिनमध्ये आग लागल्यानंतरही हे विमान सुखरूपपणे डेनवर विमानतळावर उतरविण्यात यश आलं.
ब्रूमफिल्ड भागातील पोलिस अधिकाऱ्याने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये इंजिनाची बाहेरची फ्रेम एका घरासमोरच्या बागेत पडल्याचं दिसून येतंय.
हे विमान डेनवरहून होनोलुलुसाठी रवाना झालं होतं.
फ्लाइट 328 च्या उजव्या बाजूच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याचं फेडरल एव्हिएशन प्रशासनाचं म्हणणं आहे.
इंजिनाच्या अवशेषांना हात लावू नका, असं ब्रूमफिल्ड पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना बजावलं आहे.
इंजिनातून धूर निघत असल्याचंही काही फोटोंमधून दिसत आहे. विमानातूनच बनवला गेलेला एक व्हीडिओही समोर आला आहे. खिडकीसमोरच्या इंजिनाला आग लागल्याचं या व्हीडिओतून स्पष्ट दिसत आहे.
आपण इंजिनाचे अवशेष कोसळताना पाहिले आणि मुलांसह सुरक्षित ठिकाणी धाव घेतली, असं एका स्थानिक व्यक्तीनं सीएनएनशी बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)