इंडोनेशियाः 'या' शहरात पुराचं पाणी अचानक रक्तासारखं लाल कसं झालं?

इंडोनेशिया

फोटो स्रोत, Reuters

इंडोनेशियात एका गावात आलेल्या पुरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अगदी रक्तासारखं लाल रंगाचं पाणी पाहून पहिल्यांदा सर्वच लोक चक्रावून गेले.

त्याचं झालं असं...एका कपडे रंगवणाऱ्या कारखान्यामध्ये पुराचं पाणी घुसलं त्यामुळे पुराच्या सगळ्या पाण्याचा रंग लालभडक झाला. हे पाणी सगळ्या गावात पसरलं होतं. लालभडक रंगामुळे सुरुवातील रक्ताचा पूर आल्यासारखं इथल्या लोकांना वाटलं.

इंडोनेशियाच्या पेकलोंगान भागामध्ये जेंगगॉट नावाचं गाव आहे. तिथं ही घटना घडली आहे. पेकलोंगान भाग हा कपडे रंगवणे आणि वॅक्ससाठी प्रसिद्ध आहे. हे पुराचे फोटो शेकडो लोकांनी शेअर केले आहेत.

हे फोटो खरे असल्याचं एका स्थानिक अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

इंडोनेशियाः 'या' शहरात पुराचं पाणी अचानक रक्तासारखं लाल कसं झालं?

फोटो स्रोत, AFP

स्थानिक अधिकारी दिमास आर्गा युदा यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, "कपडे रंगवण्याच्या रंगामुळे हे पाणी लाल झालं आहे. डाय करण्याच्या कारखान्यात पाणी घुसल्यामुळे असं झालं आहे. पावसानंतर हा लाल रंग हळूहळू कमी होत जाईल."

इंडोनेशियाः 'या' शहरात पुराचं पाणी अचानक रक्तासारखं लाल कसं झालं?

फोटो स्रोत, AFP

रॉयटर्सच्या माहितीनुसार पेकलोंगानमध्ये याआधीही बाटिक डिझाइनसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे नदीचा रंग बदलला आहे. गेल्याच महिन्यात एका गावातील नदीचा रंग हिरवा झाला होता. इंडोनेशियातील अनेक भाग नेहमी पुराच्या तडाख्यात सापडतात. यावर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आलेल्या वादळामुळे सुमारे 43 लोकांचे प्राण गेले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)