जो बायडनः कॅपिटल इमारतीवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये डोनाल्ड ट्रंप समर्थकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन कॉँग्रेसचे सदस्य बसतात. या ठिकाणी अमेरिकन कॉँग्रेस आणि सरकारचे दोन सभागृहं आहेत. यांना हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह आणि सीनेट असं ओळखलं जातं.

सहा जानेवारीला अमेरिकन कॉँग्रेसमध्ये जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सत्र सरू होतं. गेल्यावर्षी तीन नोव्हेंबरला जो बायडेन यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय प्राप्त झाला होता.

सत्र सुरू असतानाच रिपब्लिकन सदस्यांनी निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जो बायडन यांना सर्टिफिकेट देण्यात येऊ नये असा दबाव त्यांनी उपराष्ट्रपती माइक पेंस यांच्या टाकण्यास सुरूवात केली.

या पूर्ण प्रकरणावर बायडन यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

विलमिन्गटनमध्ये बोलताना जो बायडेन म्हणाले, 'लोकशाही अप्रत्यक्षरित्या धोक्यात सापडली आहे. मी राष्ट्रपती ट्रंप यांना अपील करतो, त्यांनी टीव्हीवर जाऊन आपल्या शपथेचं पालन करत लोकशाहीचं रक्षण केली पाहिजे. कॅपिटलमध्ये जबरदस्तीने घुसून खिडक्या तोडणं, प्लोअरवर येणं आणि गोंधळ करणं याला विरोध नाही हिंसाचार म्हणतात.'

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अमेरिकेत बुधवारी कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला. अमेरिकन काँग्रेसचं सत्र सुरू असताना ट्रंप समर्थकांनी बॅरिकेड तोडून आत घुसखोरी केली. पोलिसांबरोबर त्यांची झटापटही झाली.

या हल्ला प्रकरणी 13 लोकांना अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसी मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये हँडगन आणि लाँग गनचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेले लोक डीसीमध्ये राहात नसल्याचे पोलीसप्रमुख रॉबर्ट कॉन्टी यांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या अधिकाऱ्यांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या निदर्शकांना कॅपिटलपासून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून बुधवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)