अमेरिका निवडणूक निकाल : पोस्टल मतदानामध्ये घोटाळा होऊ शकतो का?

अमेरिका निवडणूक

फोटो स्रोत, Reuters

    • Author, रिअॅलिटी चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणावर पोस्टल व्होटिंग म्हणजेच टपालाने मतदान झालं. मात्र, 'यामुळे मतदानात मोठ्या प्रमाणावर घोटाळा' होऊ शकतो, असं म्हणत डोनाल्ड ट्रंप यांनी या पोस्टल व्होटिंगवर टीका केली. ट्रंप यांच्या आरोपांना काही पुरावे आहेत का?

अध्यक्षीय निवडणूक बघता अमेरिकेत सध्या अभूतपूर्व परिस्थिती आहे, असं म्हणता येईल. कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदा अमेरिकेत मोठ्या संख्येने मतदारांनी पोस्टल व्होटिंगचा पर्याय निवडला.

ट्रंप यांनी अनेकदा मतदान घोटाळ्याचा विषय काढला. मात्र, रिपब्लिकन पक्षाने कधीही कुठल्याही प्रकारचा फेरफार, घोटाळ्याविषयी म्हटलं नाही. डोनाल्ड ट्रंप यांना मात्र पोस्टल व्होटिंगमुळे निवडणूक निकालात गडबड होऊ शकते, असं वाटतं. पोस्टल व्होटिंग धोकादायक असल्याचं ते म्हणतात.

आणि म्हणूनच अमेरिकेचे निवडणूक अधिकारी आणि टपाल सेवेतल्या अधिकाऱ्यांवर मोठा दबाव आहे.

अमेरिका निवडणूक

फोटो स्रोत, EPA

गेल्या निवडणुकीत अडचणी आाल्या होत्या का?

काही किरकोळ अपवाद वगळता निवडणुकीत फ्रॉड होण्याची शक्यता नसल्याचं अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनांमध्ये आढळून आलं आहे. काही प्रकरणांवर तर प्रसारमाध्यमांनी बरंच वार्तांकन केलं.

2018 साली नॉर्थ कॅरोलिनामधल्या प्रायमरीमध्येही असाच एक प्रकार घडला होता. त्यावेळी रिपब्लिकन उमेदवाराच्या एका कन्सल्टंटने मतपत्रिकांमध्ये छेडछाड केली होती. मीडियाने या बातमीला प्राधान्याने प्रसिद्धी दिल्यानंतर पुन्हा मतदान घेण्यात आलं होतं.

मात्र, 2017 साली ब्रेनन सेंटर फॉर जस्टिस या संस्थेने केलेल्या अभ्यासात अमेरिकेत निवडणूक घोटाळ्याचा दर 0.0009% इतका असल्याचं आढळून आलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अमेरिकेच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख एलन वेईनट्रॉब म्हणतात,"पोस्टल व्होटिंगमुळे घोटाळा होतो, या कॉन्स्पिरसी थिअरीला कुठलाच आधार नाही."

मात्र, या प्रक्रियेत काही ठिकाणी निवडणूक घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय.

व्हर्जिनिया

ऑक्टोबर महिन्यात "व्हर्जिनियामध्ये पाच लाख अर्ज भरण्यात आले. मात्र, ते खोटे होते", असं डोनाल्ड ट्रंप यांनी एका सभेत म्हटलं होतं, अॅबसेंटी बॅलेट म्हणजे पोस्टाद्वारे मतदान करण्यासाठी हे अर्ज करण्यात आले होते, पण यावरचा उत्तर देण्यासाठीचा पत्ता चूक होता.

मात्र, हा घोटाळा नव्हे तर चूक होती आणि ही चूक नंतर दुरुस्त करण्यात आली, असं स्पष्टीकरण व्हर्जिनियातल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं होतं.

व्हर्जिनिया सेंटर फॉर व्होटर इन्फोर्मेशनचं म्हणणं आहे, "प्रिटिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे मतदाराला अडचण येऊ नये, यासाठी आम्ही अनेक आठवडे राबलो."

19 ऑक्टोबरपर्यंत 3 लाख नोंदणीकृत मतदारांनी हा अर्ज परत पाठवला होता.

Reuters

फोटो स्रोत, Reuters

ओहयो

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी ट्वीट केलं होतं, "ओहयोमध्ये 50 हजार मतं फ्रॉड होती."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ओहयोमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला फ्रँकलिन काउंटीमध्ये जवळपास 50 हजार मतदारांना पोस्टाने चुकीच्या मतपत्रिका मिळाल्या होत्या.

मात्र, स्थानिक निवडणूक बोर्डाने या प्रकरणात घोटाळा झाल्याचे पुरावे नाहीत आणि मतदारांना योग्य व्होटर स्लीप पाठवून कुणीही दोनदा मतदान करू नये, यासाठीचे सर्व उपाय केल्याचं म्हटलं.

मतपत्रिकांमध्ये त्रुटी एक 'गंभीर चूक' होती, असं निवडणूक बोर्डाचं म्हणणं आहे.

मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या ट्वीटला उत्तर देताना, "बोर्ड द्वीपक्षीय आहे आणि निवडणूक निष्पक्ष आहे. सर्व मतांची गणना होईल", असं उत्तर बोर्डाने दिलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

न्यूयॉर्कमध्ये नाव आणि प्रिटिंगमध्ये त्रुटी आढळल्याने जवळपास 1 लाख मतदारांना नव्याने मतपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या.

मिशिगनमध्ये 400 पोस्टल बॅलेटवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपसोबत उपाध्यक्ष पदासाठीचे माईक पेन्स यांच्याऐवजी लिबर्टेरियन पक्षाच्या जेरेमी कोहेन यांचं नाव छापण्यात आलं होतं. जाणीवपूर्वक हे करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी ट्रंप यांनी केला होता. मात्र, ही चूक होती आणि "मतदारांना तात्काळ सुधारित मतपत्रिका आणि सूचना पाठवण्यात आल्या," असं स्पष्टीकरण मिशिगनच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटकडून देण्यात आलं होतं.

विस्कॉन्सिनमध्ये ग्रीनविलेजवळ एका खड्ड्यात काही अबसेंटी मतपत्रिका सापडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास होऊनही, हे कसं घडलं हे अजून कळू शकलेलं नाही. मात्र, हा घोटाळा असल्याचा आरोप व्हाईट हाऊसकडून करण्यात आला आहे.

पेन्सलव्हेनियामध्ये सैन्यासाठीच्या 9 मतपत्रिका फेकलेल्या सापडल्या होत्या. यापैकी सात मतं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना देण्यात आली होती, असं न्याय विभागाने म्हटलं होतं.

न्यू जर्सीमध्ये टपाल पाठवणाऱ्या एका एजन्सीवर शेकडो पत्रं कचऱ्यात फेकल्याचा आरोप करण्यात आाला. यापैकी 100 मतपत्रिका होत्या. मात्र, नंतर या मतपत्रिका संबंधित मतदारांना पाठवण्यात आल्या.

ही काही मोजकी प्रकरणं आहेत. शिवाय, पोस्टल व्होटिंग एक सुरक्षित पर्याय असल्याचेही ठोस पुरावे आहेत.

मतपत्रिका चोरण्यापासून ते बनावट मतदान रोखण्यासाठी अनेक उपाय योजले जातात.

उदाहरणार्थ मतपत्रिका मतदारांच्या नोंदणीकृत पत्त्यावरून आल्या आहेत का आणि त्यावर मतदाराची स्वाक्षरी आहे का, हे तपासण्यात येतं.

अमेरिका निवडणूक

फोटो स्रोत, Reuters

बॅलट हार्वेस्टिंग म्हणजे काय?

अमेरिकेतल्या 26 राज्यांमध्ये एक विशेष नियम आहे. या नियमानुसार एखाद्या समूहात आजारी किंवा अशक्त व्यक्ती असल्यास एखादी व्यक्ती त्यांची मतं एकत्र करून जमा करू शकते.

मात्र, एखादी व्यक्ती समूहातली किती मतं गोळा करू शकते, यावर मर्यादा आहेत.

उदाहरणार्थ मिनिसोटामध्ये एक व्यक्ती केवळ तीन मतपत्रिका गोळा करू शकते.

मात्र, हेच काम व्यापक स्वरुपात बेकायदेशीरपणे केल्यास त्याला बॅलट हार्वेस्टिंग (Ballot Harvesting) म्हणतात.

टेक्सस आणि मिनिसोटामध्ये बॅलेट हार्वेस्टिंग घोटाळ्याचे आरोप यापूर्वी झाले होते. मात्र, ते सिद्ध करता आले नव्हते.

मतदान प्रक्रियेत घोटाळ्याचे पुरावे अत्यंत कमी असले तरी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झालेलं पोस्टल मतदान बघता येणाऱ्या काळात मतमोजणीच्या क्षमतेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)