You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, अनेक इमारती कोसळल्या
ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत, त्यात अनेक इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.
तुर्कस्तान आणि ग्रीसमधल्या एजियन समुद्रकिनारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. 7.9 मॅग्निट्युडचे हे धक्के होते. तुर्कस्तानातील इझमीर प्रांत हा भूकंपाचा केंद्र असल्याचे यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने म्हटले आहे. अथेन्स ते इस्तंबूलपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले.तुर्कस्ताननच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या भूकंपात कुठलीही जीवितहानी झाल्याची अद्याप नोंद नाही. मात्र, इझमीर प्रांतातील सहा इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
भूकंप झाला तेव्हा इझमीरमधील लोक रस्त्यावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. सोशल मीडियावरही या भूकंपाचे काही व्हीडिओ शेअर करण्यात आले. त्यातही लोक इमारतींच्या ढिगाऱ्यांमध्ये शोधाशोध करताना दिसत आहेत.
त्याआधी जुलै 2019 मध्ये ग्रीकची राजधानी अथेन्समध्ये झालेल्या भूकंपामुळे पूर्ण शहराला धक्के जाणवले होते.
तुर्कस्तानात सर्वात मोठा भूकंप 1999 साली झाला होता. इस्तंबूलजवळील इझमीत या शहरात हा भूकंप झाला होता आणि त्यात सुमारे 17 हजार लोकांचा जीव गेला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)