You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भौतिकशास्त्र नोबेल : कृष्णविवराबाबत महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या तिघांचा होणार गौरव
यंदाचं भौतिकशास्त्राचं नोबेल रॉबर पॅनरोस, रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रेआ गेझ यांना जाहीर झालं आहे.
पॅनरोस यांना कृष्णविवराच्या शोधासाठी तर आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या भक्कम वस्तूच्या शोधासाठी गेन्झेल-गेझ यांना गौरवण्यात येणार आहे.
अंतराळविश्वातल्या कृष्णविवराच्या महत्त्वपूर्ण संशोधनाकरता भौतिकशास्त्राचं नोबेल या त्रयीला देण्यात येणार असल्याचं नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केलं.
कृष्णविवर हे अंतराळविश्वातील अशी जागा आहे जिथे गुरुत्वाकर्षण प्रचंड असते आणि तिथून प्रकाशही परावर्तित होऊन परत येत नाही.
11 लाख डॉलर्स बक्षीस रक्कमेने या त्रिकुटाला गौरवण्यात येईल.
ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्त्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोघांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेलं अतिविशाल कृष्णविवर शोधून काढलं.
त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
लॉस एंजेलिस इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत गेझ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "नोबेल पुरस्काराच्या घोषणेने मला खूप आनंद झाला आहे. भौतिकशास्त्राचं नोबेल पटकावणारी मी चौथी महिला शास्त्रज्ञ आहे याचं महत्त्व मी जाणते. पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)