आमीर खानच्या तुर्कस्तान भेटीवरून वाद का?

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेता आमीर खान तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसप तय्यब अर्दोगान यांच्या पत्नी एमीन अर्दोगान यांची भेट घेतल्यामुळे चर्चेत आहे.
आमीरसोबतच्या भेटीचे फोटो एमीन यांनी 15 ऑगस्टला ट्विटरवर शेअर केले. त्यासोबत एमीन यांनी लिहिलं आहे, "प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, फिल्ममेकर आमीर खानशी इस्तंबूलमध्ये भेट झाली. आमीरनं आपला नवीन चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'चं शूटिंग तुर्कस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अर्थात, आमीरनं एमीन यांची घेतलेली भेट भारतात काही लोकांच्या पचनी पडलेली नाहीये.
भाजप नेते आणि दिल्ली दंगलींच्या आधीच्या आपल्या भाषणामुळे चर्चेत आलेल्या कपिल मिश्रांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींपर्यंत अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमीरच्या दौऱ्यावर कोणी काय म्हटलंय?
कपिल मिश्रांनी ट्वीट करून म्हटलं, "यांना भारतात भीती वाटते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"आमीर खान तीन खानांपैकीच एक आहे, हा माझा मुद्दा सिद्ध झाला," असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामींनी केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी ट्वीट करून म्हटलं, "भारताचा मित्र असलेल्या इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटायला आमीर खाननं नकार दिला होता. मात्र भारताचा शत्रू देश असलेल्या तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीचं आमंत्रण स्वीकारण्यात त्यांना संकोच वाटला नाही."
अभिनव खरे यांनी लिहिलं आहे, "यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस हा फोटो आठवा. आपल्या पैशांचा आपल्या विरुद्ध वापर होऊ देऊ नका."
काही लोकांनी आमीर खान यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशरफ़ हुसैन यांनी लिहिलं आहे की, आमीर खान यांना भक्त ट्रोल करत आहेत. म्हणजे आता सेलिब्रिटींनी यांच्या हिशोबानं वागायचं? यांना इस्रायल आवडतो...पण तुर्की आवडत नाही. त्यामुळेच त्यांना आमीर पसंत नाही.
जयमीन श्रीमाली यांनी म्हटलं आहे, "आमीर खाननं सर्वात जास्त नापसंती मिळवलेल्या सडक-2 च्या ट्रेलरला आव्हान द्यायचं ठरवलंय असं दिसतंय."
तुर्कस्तानबद्दल आकस का?
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविण्याला तुर्कस्ताननं विरोध दर्शवला होता.
तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळी म्हटलं होतं, "आमचे काश्मिरी बंधू-भगिनी अनेक दशकांपासून पीडित आहेत. काश्मीर मुद्द्यावर आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच सोबत आहोत. आम्ही हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही मांडला होता. काश्मिरचा प्रश्न संघर्षानं सुटणार नाही. तो न्याय्य आणि निष्पक्ष मार्गानंच सोडवला जाऊ शकतो. तुर्कस्तान अशाच शांतता आणि संवादाचं समर्थन करतो."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

भारतानं त्यावेळी तुर्कस्तानच्या भूमिकेवर कठोर टीका केली होती.
नुकतंच हाया सोफिया म्युझियमचं रुपांतर पुन्हा एकदा मशिदीमध्ये करून तुर्कस्ताननं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
ज्या एमीन अर्दोगान यांची भेट आमीरनं घेतली त्या नेहमी हिजाब परिधान करतात. तुर्कस्तानात हिजाबवर निर्बंध होते. हिजाब घालून मुली विद्यापीठात जाऊ शकत नव्हत्या. अर्दोगान यांच्या पत्नी एमीनही हिजाबमुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जायच्या नाहीत.
काहीजण आमीरला या विचारधारेशी जोडून ट्रोल करत आहेत.
आमीरचे चित्रपट आणि वक्तव्यं
भारतातील असहिष्णुतेबद्दल वक्तव्य केल्यामुळेही आमीर खान अनेकदा ट्रोल झाला आहे.

फोटो स्रोत, YRF
पीके चित्रपटात हिंदूंच्या भावनांची चेष्टा केल्याचा आरोपही आमीरवर करण्यात आला होता.
सध्या आमीर आपल्या 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गम्प चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाल होता.
तुर्कस्तानात कोणतं शूटिंग होईल?
चित्रपटातला एक महत्त्वाचा सीन आणि संवाद आहे, 'रन फॉरेस्ट रन'. या सीनमध्ये अभिनेत्री फॉरेस्ट गम्पच्या व्यक्तिरेखेला धावायला सांगत असते.

फोटो स्रोत, AMAZON PRIME
या इंग्लिश चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा फॉरेस्ट गम्प सतत पळत असतो. तो चालतच अनेक ठिकाणी जातो आणि शेवटी त्याला आपण थांबायला हवं हे जाणवतं.
अशाच एखाद्या दृश्याचं चित्रीकरण करण्यासाठी आमीर खान तुर्कस्तानला गेला असेल. आमीरचा हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)