स्त्रियांच्या ऑरगॅझमचा अल्गोरिदम देणाऱ्या कंपनीवर टीका

महिला

फोटो स्रोत, Thinkstock

    • Author, जोई क्लाइनमॅन,
    • Role, टेक्नोलॉजी रिपोर्टर, बीबीसी न्यूज

महिलांना ऑरगॅझम प्राप्त झाला किंवा नाही हे अगदी आम्ही खात्रीलायक सांगू शकतो. असा दावा एका कंपनीने केला होता. या दाव्यानंतर त्यांच्या कंपनीवर टीकेचा भडिमार झाला. यावर त्या कंपनीने सफाई दिली आहे.

स्त्रियांचा ऑरगॅझम म्हणजे परमोच्च सुखबिंदूची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अल्गोरिदमबद्दल एका कंपनीने सारवासारव करण्याची भूमिका घेतली आहे.

या अल्गोरिदमवर सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर कंपनीने अल्गोरिदमचा बचाव केला आहे आणि त्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

ही कंपनी सायप्रसमध्ये असून तिचं नाव रेलिडा लिमिटेड असं आहे. या कंपनीचा दावा होता की महिलेला ऑरगॅझम मिळाला किंवा नाही हे सांगता येण्याची शक्यता 86 टक्के आहे. त्यासाठी कंपनीने एक प्रोग्रॅम तयार केला आहे असं सांगण्यात आलं होतं.

त्याच्या प्रेझेंटेशनच्या स्लाइडस ट्वीटरवर शेअर केल्या गेल्या तेव्हा ती हजारो लोकांनी रिट्विट केली. याद्वारे आपल्याला सेक्स टेक उत्पादनं डेव्हलप करणाऱ्यांना मदत करायची होती मात्र लोकांनी ती भलत्याच गोष्टीला जोडली असं कंपनीचं म्हणणं आहे.

कोरोना
लाईन

हे प्रेझेंटेशन ट्वीटरवर लिलो नावाच्या सेक्स टॉय तयार करणाऱ्या कंपनीच्या ब्रँड मॅनेजर स्टू नुगेंट यांनी शेअर केलं होतं. त्यांच्या कंपनीला हे प्रेझेंटेशन पाठवण्यात आलं होतं.

महिलांना परमोच्च सुखाची प्राप्ती होते हे जाणून घेण्याचा कोणताही विश्वसनीय मार्ग नाही असं या स्लाइडसमध्ये लिहिल्याची खात्री बीबीसीनं केली आहे.

अमूक टक्के स्त्रिया परमोच्च सुखाच्या बिंदूपर्यंत आपण पोहोचलं असं नाटक करतात असंही प्रेझेंटेशनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

कंपनीची भूमिका

रेलिडा कंपनीनं आपलं एका प्रकल्पावर काम चालू असल्याचं सांगितलं. हे प्रेझेंटेशन प्रकाशित करण्यासाठी नव्हतं असं त्यांनी सांगितलं आहे.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

हृदयाच्या ठोक्यांमध्ये होणाऱ्या परिवर्तनावर अल्गोरिदमचा सुरुवातीचा भर होता.

बीबीसीने कंपनीशी पत्रव्यवहार करून त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला.

बीबीसीला कंपनीने पाठवलेल्या इमेलमध्ये कंपनीने सांगितलं आहे की ऑरगॅझम हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर ओळखला जाऊ शकतो. तो होत असताना हृदयाच्या गतीमध्ये बदल होतो. पण अल्गोरिदम अजून सापडलेला नाही असंही त्यात लिहिलं आहे.

एका महिलेने इतर महिलांच्या भल्यासाठी हे केल्याचं त्यात म्हटलं आहे. या कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगला थेट कोणत्याही स्त्री पुरुषाला विकणार नसल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. अशी माहिती महिलांचा तणाव वाढवू शकते असंही त्यात म्हटलं आहे.

त्यांनी नुगेंट यांचं ट्वीट अनैतिक असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)