Whatsapp: व्हॉट्सअॅपवर लवकरच करता येणार 8 जणांसोबत व्हीडिओ कॉल

व्हॉट्सअॅप

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात विविध देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. याचाच अर्थ लोक आपापल्या घरांमध्ये कैद आहेत.

तुम्हीसुद्धा काम करत असाल किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असाल, पण व्हीडिओ कॉल्स हे आता तुमच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनले असावेत.

व्हीडिओ कॉल्सच्या वापराचं हे वाढलेलं प्रमाण लक्षात घेत फेसबुकने व्हॉट्सअॅप, मेसेंजर आणि त्यांच्या मुख्य अॅप्समध्ये अनेक नवीन फीचर्स आणली आहेत.

व्हॉट्सअॅप या मेसेंजर अॅपमध्ये आता 4 ऐवजी 8 जण एकदाच व्हॉईस आणि व्हीडिओ कॉल करू शकतात. व्हॉट्सअपची कंपनी असलेल्या फेसबुकनं यासंदर्भात माहिती दिली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तसंच, फेसबुकने आणलेल्या 'मेसेंजर रूम्स'च्या माध्यमातून आता तब्बल 50 जणांना ग्रुप व्हीडिओ चॅट्स सुरू करता येतील, त्यात सहभागी होता येईल. मात्र अनोळखी वा अनपेक्षित लोकांनी या व्हीडिओ चॅट्समध्ये येऊ नये, यासाठी आपण क्रिप्टोग्राफर्ससोबतही काम केल्याचं फेसबुकने म्हटलंय.

Facebook video chat

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, 'मेसेंजर रूम्स'मध्ये आता तब्बल 50 जणांना ग्रुप व्हीडिओ चॅट्स सुरू करता येतील

सध्या युकेमधल्या काही युजर्ससाठी ही फीचर्स उपलब्ध करण्यात येत असून पुढच्या काही आठवड्यांत सगळ्या फेसबुक युजर्सना हा अपडेट देण्यात येईल. कोरोना व्हायरसमुळे जगभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे आपण ही फीचर्स लवकरच उपलब्ध करून देऊ, असं फेसबुकने बीबीसीला सांगितलं.

गेल्या वर्षभरापासून मेसेंजरवरचं व्हिडिओ कॉलिंगचं प्रमाण दुप्पट झाल्याचं फेसबुकने म्हटलंय. कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भागांत हे प्रमाण जास्त आहे.

फेसबुकचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या झूम अॅपचे एप्रिल महिन्यात 30 कोटी युजर्स झाले आहेत. मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये लोकांना घरी राहण्याची सूचना देण्यात आल्यानंतर हे अॅप तब्बल 20 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आलं होतं.

मायक्रोसॉफ्ट टीम्ससारख्या अॅप्सनीही आपली काही प्रिमियम फीचर्स या साथीच्या काळात मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

नवीन फीचर्स

मार्क झुकरबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टच्या मार्फत फेसबुकच्या या नवीन मेसेंजर रूम्सची माहिती दिली आहे. एखादी मेसेंजर रूम सुरू असे पर्यंत लोकांना या व्हिडिओ चॅटमध्ये जॉईन होता येईल वा बाहेर पडता येईल.

फेसबुक किंवा मेसेंजरच्या माध्यमातून या रूम्स तयार करता येतील. लवकरच ही फीचर्स इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरही आणण्याचा आपला विचार असल्याचंही कंपनीने म्हटलंय.

या मेसेंजर रूम्स तयार करणाऱ्यांना त्या प्रायव्हेट ठेवण्याचा पर्याय असेल, म्हणजे या व्हिडिओ चॅट्समध्ये फक्त अपेक्षित लोकं सहभागी होऊ शकतील आणि फेसबुकवर नसणाऱ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेता येईल.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

शिवाय या गप्पांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना ऑगमेंटेड रिएलिटीच्या मदतीने त्यांची बॅकग्राऊंडही बदलता येईल. ज्या मेसेंजर रूम्स 'पब्लिक डिस्कव्हरेबल' म्हणजे सर्वांसाठी खुल्या असतील त्या फेसबुक युजर्सना न्यूज फीडच्या वर दिसतील.

फेसबुक मेसेंजर मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या अर्जेंटिना आणि पोलंडमध्ये या सेवेसाठीचं टेस्टिंग करण्यात आलं. यावेळी एका चॅटदरम्यान 17 ते २० जणांना परवानगी देण्यात आली होती, पण काही दिवसांत ही संख्या वाढवून 50 करण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलंय.

ही सेवा विकसित करण्यात येत असताना आपण प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांमधूनही शिकल्याचं फेसबुकने म्हटलंय. अनपेक्षित व्यक्ती व्हिडिओ कॉल्समध्ये येऊ नयेत - म्हणजेच 'झूम बॉम्बिंग' होऊ नये म्हणून झूम अॅपचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.

Messenger Rooms

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, 'हाऊसपार्टी' या प्रतिस्पर्धी अॅपप्रमाणेच लोक फेसबुकच्या मेसेंजर रूमला सहज भेट देऊन बाहेर पडू शकतात

म्हणूनच मेसेंजर रूम्समध्ये कुणी हॅक करून येऊ नये म्हणून आपण क्रिप्टोग्राफर्ससोबत काम केल्याचं फेसबुकने म्हटलंय.

शिवाय आपण या व्हिडिओ कॉल्सवरही हेरगिरी करणार नसल्याचं फेसबुकने म्हटलंय.

कोरोना
लाईन
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)