कोरोना साहित्य: या लेखकांनी भयंकर साथीबद्दल शतकांपूर्वी लिहून ठेवलं होतं

The year of the flood

फोटो स्रोत, The year of the flood

    • Author, जेन सियाबेटारी
    • Role, बीबीसी कल्चर

आज आपण अशा परिस्थितीतून जातोय जिथे उद्या काय होईल हे कुणालाच सांगता येणार नाही. आपल्या मनात सध्या प्रचंड भीती आहे. आपण सगळेच आपल्या घरी बंद खोलीत राहतोय. बाहेरच्या जगाशी आपला संपर्क होत नाही.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आपण लॉकडाऊन पाळतोय. अशा वातावरणात कला, साहित्य आपल्या एकटेपणाला दूर करतं. आपल्याला वास्तवापासून थोडं बाजूला करत दिलासा देतं. बंद खोलीत आपली मैत्री साहित्याशी होते, म्हणूनच जागतिक आरोग्य संकटावर आधारीत असलेल्या पुस्तकांची मागणी वाढली आहे.

अशा अनेक कांदबरी आहेत ज्या जागतिक आरोग्य संकटाचं वास्तव मांडतात. एखाद्या डायरीप्रमाणे या पुस्तकांमध्ये माहिती आहे. या संकटाला धीरानं कसं सामोरं जायचं हे ती पुस्तकं सांगतात.

ब्रिटिश लेखक डेनियल डेफो यांनी 1722 साली पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव होतं 'ए जर्नल ऑफ द प्लेग इअर'. डेफो यांनी या पुस्तकात 1665 साली ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीबाबत विस्तृत लिहिलं आहे.

तेव्हाचे भायवह चित्रण या पुस्तकात केलं गेलंय. प्लेगच्या साथीमुळे जे आरोग्य संकट आलं त्याचा संपूर्ण लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आलाय. त्यामुळे सद्यपरिस्थितीशी मिळतं जुळतं हे पुस्तक आहे.

डेफो यांच्या पुस्तकाची सुरुवात सप्टेंबर 1664 पासून होते. ताऊन इथल्या वबाने हॉंलंडवर हल्ला केल्याची अफवा पसरते. तीन महिन्यानंतर म्हणजेच डिसेंबरमध्ये लंडन येथे पहिल्या संशयित मृत्यूची बातमी मिळते. आणि काही महिन्यातच लंडनमध्ये हाहाकार उडतो. मृत्यूंची संख्या प्रचंड वाढते आणि याची माहिती लंडनच्या सर्व चर्चवर नोटीस लाऊन देण्यात येते.

जुलै 1665 येईपर्यंत लंडनमध्ये नवीन नियम लागू होतात. हे नियम तसेच होते, जसे आत्ता लॉकाडाऊनच्या काळात आपण सगळे पाळतोय. तेव्हा लंडनमध्येही सार्वजनिक कार्यक्रम, बार, ढाबे अशा सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली होती. मैदानं, स्टेडियम्स सर्वकाही बंद होतं.

डेनियल डेफो यांनी पुस्तकात म्हटलंय, "लंडनचे नागरिक हे नियम काटेकोरपणे पाळत नव्हते. ते बेफिकिर होते आणि लंडनसाठी हेच सर्वाधिक घातक ठरत होतं. सामान खरेदी करण्यासाठी गर्दी करायचे. काही नागरिक मात्र प्रामाणिकपणे घरीच थांबायचे."

ऑगस्ट महिना सुरू झाला आणि बघता बघता "प्लेगने हिंसक वळण घेतलं. संपूर्ण कुटुंब, वस्तीतले रहिवासी सगळ्यांचा प्लेगनं मृत्यू होत होता." डेफो यांच्यानुसार, "डिसेंबर 1665 पर्यंत प्लेगच्या साथीची तीव्रता कमी झाली होती. शुद्ध हवा येत होती आणि थंडीला सुरुवात झाली."

कोरोना
लाईन

आजारी रुग्ण बरे होऊ लागले. जेव्हा सर्वात शेवटची वसाहतसुद्धा यातून बाहेर पडली तेव्हा लंडनचे नागरिक घराबाहेर पडले आणि त्यांनी देवाचे आभार मानले."

आज वर्तमानातल्या परिस्थितीशी 400 वर्षांपूर्वी लंडनमध्ये उद्भवलेली परिस्थिती किती मिळती जुळती आहे हे वेगळं सांगायला नको.

डॅनियल डेफो

फोटो स्रोत, Alamy

डेनियल डेफो यांच्याप्रमाणेच अल्बर्ट कामू यांनी आरोग्य संकटाचं विश्लेषण केलंय.

कामू यांनी 'दि प्लेग' या आपल्या पुस्तकात अल्जिरियातील ओरां शहरात आलेल्या प्लेगच्या साथीचे वर्णन केलंय. 19 व्या शतकात प्लेगच्या साथीमुळे ओरां शहर उद्धवस्त झालं.

कामू यांनी त्यावेळच्या परिस्थितीचे वर्णन केलेल्या पुस्तकात आपल्याला आजच्या परिस्थितीशी अनुरुप माहिती मिळते. त्यावेळी सुरुवातीला राजकीय नेते हे संकट स्विकारत नाहीत. कामू यांनी पुस्तकात म्हटल्यानुसार, " शहराच्या गल्लोगल्लीत मेलेल्या उंदरांचा ढिग पडलेला असायचा."

यावर वृत्तपत्राचा एक पत्रकार प्रश्नही उपस्थित करतो."आपल्या सरकारला याची जाणीव कशी नाही की हे उंदीर नागरिकांसाठी किती धोकादायक आहेत?"

या पुस्तकातील एक पात्र डॉक्टर बनार्ड, आरोग्य कर्मचा-यांच्या धाडसाचं कौतुक करतात. "मला कल्पना नाही माझा मृत्यू कोणत्या क्षणी होईल, पण आत्ता खूप लोकं आजारी आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे." आजारपणातून बाहेर पडलेल्या जनतेलाही यातून धडा मिळतो आहे. "लोकांना आता कळून चुकलंय अशा संकट प्रसंगी लोकांवर प्रेम करणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे."

पुस्तक

फोटो स्रोत, Alamy

1918 साली स्पॅनिश फ्लू या आजाराने जगाचं चीत्र बदललं होतं. या आरोग्य संकटात जगभरात पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. याआधी नुकतेच पहिले विश्व युद्ध झाले ज्यात 1 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. पण युद्धाच्या नाट्यमय घडामोडींमुळे इतक्या मोठ्या आरोग्य संकटाचा प्रभाव झाकला गेला.

पहिल्या विश्व युद्धावर आधारीत अगणित कांदबऱ्या लिहील्या गेल्या. स्पॅनिश फ्लू यावरही अनेक पुस्तकं लिहिली गेली होती. आज नागरिक घरात बंद आहेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत.

1939 साली ब्रिटिश लेखिका कॅथरीन एन पोर्टर यांनी 'Pale Horse, Pale Rider' या आपल्या कादंबरीत स्पॅनिश फ्लूच्या आरोग्य संकटाचे वर्णन केले आहे.

या कादंबरीतलं पात्र मिरांडा जेव्हा आजारी पडते. तेव्हा तिचा मित्र एडम तिला सांगतो, " हे दिवस अत्यंत वाईट आहेत. सर्व थिएटर्स, दुकानं, रेस्टॉरंट्स बंद आहेत. गल्लीतून दररोज अंत्ययात्रा नीघालेल्या दिसतात आणि रात्री सतत रुग्णवाहिकेचा आवाज अस्वस्थ करतो."

मिरांडाचा आजार, ताप, औषधं हे सगळं काही आठवडे सुरु असल्याबद्दल कादंबरीत लिहिलं आहे. जेव्हा मिरांडा बरी होते आणि बाहेर पडते तेव्हा तिला जाणवतं युद्ध आणि आरोग्य संकटानंतर जग किती बदललंय. कॅथरीन यासुद्धा स्पॅनिश फ्लूमुळे मरता मरता वाचल्या आहेत.

मार्गारेट एडवूड

फोटो स्रोत, Alamy

1963 मध्ये द पॅरीस रिव्ह्यूला दिलेल्या मुलाखतीत कॅथरीन पॉर्टर सांगतात, "माझ्यात प्रचंड बदल झालेले मला जाणवत होता. घरातून बाहेर पडून लोकांना भेटणं, त्यांच्यात मिसळणं मला आव्हानात्मक वाटत होतं. सार्वजनिक जगापासून मी लांब गेले होते."

21व्या शतकातही जगाने अशाच काही आरोग्य संकटांना तोंड दिलं. 2002 मध्ये सार्स, 2012 मध्ये मर्स आणि 2014 साली इबोला व्हायरसचा प्रकोप इतका प्रभावशाली होता की या काळात अनेक शहरं उद्धवस्त झाली. लोकांचं जगणं कठीण होतं आणि आर्थिक संकटालाही सामोरं जावं लागलं.

2009 साली मार्गरेट अॅटवुड यांची The Year of the Flood ही कादंबरी प्रकाशीत झाली. या कादंबरीत अशा एका जगाची कल्पना केली गेलीय ज्यात माणूस आरोग्य संकटानंतर किती खचून जातो. पाणी नसलेला पूर आल्याप्रमाणे ही आरोग्य संकटं येतात आणि हवेत पोहून शहरच्या शहरं जाळतात असं वर्णन मार्गरेट यांनी केलंय.

अशा संकटातून जी लोकं वाचतात ती किती एकटी असतात याचंही वर्णन करण्यात आलंय. कांदबरीत उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे टोबी नावाची एक माळीण आहे, जी आकाशाकडे बघत विचार करतेय की, "या जगात माझ्यासारखे इतरही लोकं असतील जे वाचले असतील. पण ते मित्र असतील की वैरी? जर असं कुणी भेटलं तर त्यांना काय मानायचं?"

यात आणखी एक पात्र आहे, ज्याचं नाव आहे रेन. रेन एक नर्तकी आहे. रेन यातून सुखरूप बाहेर पडते कारण एका ग्राहकामुळे आलेल्या आजारासाठी तिला क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं. ती घरात बसून वारंवार स्वत:चं नाव लिहिते. रेन सांगते, "आपण जर खूप दिवस एकटे राहिलो तर आपण विसरून जातो की आपण कोण आहोत."

पुस्तक

फोटो स्रोत, Alamy

अॅटवुड यांची ही कांदबरी फ्लॅशबॅकमध्येही जाते. यात वर्णन करण्यात आलं आहे की मानव आणि निसर्ग यांच्यातलं संतुलन कसं बिघडत गेलं. सत्ताधा-यांच्या कंपन्यांनी बायो इंजिनिअरींगच्या माध्यमातून नीसर्गाशी छेडछाड केली. टोबीसारख्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कसा विरोध केला.

अशा जागतिक आरोग्य संकटाच्या कहाण्या आपल्याला आकर्षित करतात, कारण माणसांनी एकत्र मिळून याचा सामना केलेला असतो. जेव्हा जगात चांगलं वाईट यातला फरक मिटतो. प्रत्येक पात्राकडे सुखरूप राहण्याची समान संधी असते. एकप्रकारे हे जग समाजवादी होऊन जातं.

मुळच्या चीनच्या असलेल्या अमेरिकन लेखिका लिंग मा यांनी 2018 मध्ये 'Severence' नावाची कादंबरी लिहिली. यात जगभरातून आलेल्या अमेरिकेत स्थायीक झालेल्या नागरिकांची गोष्ट आहे. यात कॅडेन्स चेन नावाची एक तरुणी गोष्ट पुढे घेऊन जाते. ती बायबल छापणाऱ्या एका संस्थेत नोकरी करत असते.

2011 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये काल्पनिक Shane Fever नावाचा आजार पसरतो ज्यात केवळ 9 रहिवाशांचा जीव वाचतो. कॅडेन्स ही यापैकी एक तरुणी. लिंग मा लिहितात, "या आरोग्य संकटामुळे संपूर्ण शहर धोक्यात आलंय. इंटरनेट बंद झालंय. वीजेचा पुरवठा खंडीत झालाय."

अशा परिस्थितीत कैडेंस चेन आणि वाचलेले काही लोक शिकागो येथील उपनगरातल्या एका मॉलच्या दिशेने रवाना होतात. आत मॉलमध्येच थांबायचं ते ठरवतात. हे लोक ज्या-ज्या ठिकाणाहून प्रवास करतात त्यांना केवळ आजार आणि तापाने फणफणलेले रुग्ण दिसतात. कॅडेन्स आणि तिचे सहप्रवासी विचार करतात आपण कसे वाचलो? आपली प्रतिकारक्षमता जास्त आहे की हा दैवी चमत्कार आहे."

अगदी किंग मा यांनी वर्णन केल्याप्रमाणे आजची परिस्थिती नसली तरी एखाद्या जागतिक आरोग्य संकटानंतर समाजात कसा बदल होतो आणि पुन्हा एकदा समाज उभा करण्याचे आव्हान कसे असते हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आगे.

एका संस्कृतीच्या विकासाचा प्रश्न उभा रहतो. जे लोक वाचले आहेत त्यांच्यापैकी सत्ता कुणाच्या हातात राहील? कोणता धर्म पाळला जाईल? हे सर्व कोण ठरवेल? असे प्रश्न उभे राहतात.

2014 मध्ये एमिली सेंट ही जॉन मंडेल यांची कांदबरी 'Station 11' कहाणी सांगते. एक संसर्गजन्य आजार जॉर्जियापासून सुरु होतो. अगदी न्यूट्रॉन बाँब फुटल्याप्रमाणे या आजारामुळे जगातली 99 टक्के लोकसंख्या मरण पावते. या आजाराची सुरुवात तेव्हा होते जेव्हा व्यासपीठावर एक कलाकर शेक्सपीयरचं पात्र साकारत असतो आणि त्याला झटका येतो.

यानंतरची कहाणी थेट 20 वर्षांनंतरची आहे. जेव्हा या कलाकाराची पत्नी स्टेशन 11 नावाच्या जागेवर पोहचते. या कहाणीचे बाकी पात्र रिकामे झालेले मॉल्स आणि छोट्या शहरांमध्ये नाटकाचे प्रयोग करतात.

स्टेशन 11ची काहाणी 14व्या शतकातील ब्रिटिश कवी चौसर यांच्या कैंटरबरी टेल्सशी मिळतीजुळती आहे. चौसर यांचे हे शेवटचे पुस्तक. 14व्या शतकात प्लेगमुळे यूरोप उद्ध्वस्त झालं यावर आधारीत पुस्तकाची कहाणी आहे.

कला काय आहे? हे कोण ठरवणार असा प्रश्न एमिली सेंट जॉन मंडेल उपस्थित करतात. जेव्हा व्हायरस संपूर्ण मानवजातीला संक्रमित करतो. तेव्हा नव्याने संस्कृतीचे निर्माण कशाच्या आधारावर होणार ? इतिहासातील कला आणि संस्कृतीत काय बदल होतील ?

आत्ताच्या बिकट परिस्थितीचे वर्णन करण्याची तयारीही साहित्यिकांनी सुरु केली असेल यात काहीच शंका नाही. या जागतिक आरोग्य संकटाचे वर्णन ते कसे करतील? लोकांची सामुदायीक भावना ते कसे व्यक्त करतील? आपल्यातील अगणित धाडसी लोकांविषयी ते काय लिहितील?

असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न तेव्हा उपस्थित होतील जेव्हा आपण आणखी वाचू, या जागतिक आरोग्य संकटातून बाहेर आल्यावर नवीन जग उभं करण्यासाठी स्वत:ला सज्ज करू.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)