हंता व्हायरस काय आहे? त्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत?

हंता वायरस

फोटो स्रोत, Smith Collection/Gado/Getty Images

हंता व्हायरस; कोरोना व्हायरसच्या सावटात आता हे काय आलं?

जगभरात कोरोना व्हायरसमुळे लाखो लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत अनेक देश संपूर्ण सध्या लॉकडाऊनमध्ये आहे.

त्यातच मंगळवारी आणखी एका व्हायरसचं नाव सोशल मीडियावर, बातम्यांमधून चर्चेत येऊ लागलं - हंता व्हायरस.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

चीनमधल्या ग्लोबल टाइम्सच्या एका वृत्तानुसार या हंता व्हायरसमुळे 23 मार्चला एका जणाचा मृत्यू झाला आहे. या वृत्तानुसार मरण पावलेली व्यक्ती एका बसमध्ये प्रवास करत होती, त्यामुळे त्या बसमधल्या सहप्रवाशांची चाचणी घेतली जात आहे.

ही बातमी येताच आधीच कोव्हिड-19च्या दहशतीत असलेल्या लोकांनी ट्विटरवर #HantaVirus हा हॅशटॅग वापरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे हा हॅशटॅग मंगळवारी ट्रेंड होऊ लागला.

पण काय आहे हा हंता व्हायरस? आणि तो कसा पसरतो?

कोरोना
लाईन

हंता वायरसचा प्रसार कसा होतो?

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीजच्या रिपोर्टनुसार हंता व्हायरस हा उंदरांमुळे पसरतो. जर कुणाचा उंदराच्या विष्ठा, लाळेशी संपर्क आला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने तोच हात आपल्या चेहऱ्याला लावला तर त्याला या व्हायरसची बाधा होऊ शकते. या व्हायरसचं संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. एखाद्या व्यक्तीलाहंताची बाधा झाली आहे की नाही हे कळण्यासाठी एक ते आठ आठवड्याचा वेळ लागतो.

हंता व्हायरसची लक्षणं काय?

जर एखाद्या व्यक्तीला हंताची बाधा झाली असेल तर त्या व्यक्तीला ताप, अंगदुखी, सर्दी, उल्टी सारखी लक्षण दिसू शकतात. हंताची बाधा झालेली व्यक्ती अतीगंभीर झाली असेल तर त्या व्यक्तीच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरून श्वास घेण्यासाठी त्रास होतो. २०१९ मध्ये लॅटिन अमेरिकेतील एक प्रदेश पेटोगोनिया या ठिकाणी हंताच्या संक्रमणामुळे ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी जाऊ नका अशी सूचना पर्यटकांना देण्यात आली होती.असं सांगितलं जातं की त्यावेळी हंता व्हायरसच्या ६० केसेस समोर आल्या होत्या आणि पन्नास जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. सीडीसीने सांगितल्यानुसार हंता व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण ३८ टक्के आहे आणि अद्याप या आजारावर ठराविक औषध पद्धती उपलब्ध नाही.

कसा पसरतो हंता व्हायरस?

अमेरिकेची केंद्रीय आरोग्य व्यवस्था CDCच्या एका अहवालानुसार हंता व्हायरस हा उंदरांपासून होणारा रोग आहे. जर एखाद्या व्यक्तीने उंदराच्या विष्ठेला किंवा लाळेला हात लावून नंतर चेहऱ्याला स्पर्श केला तर त्याला या रोगाची लागण होण्याची शक्यता असते.

पण हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे संक्रमित होण्याची शक्यता नाही. या रोगाची स्पष्ट लक्षणं दिसायला एक ते आठ आठवडे एवढा वेळ लागतो.

जर एखाद्या व्यक्तीला या व्हायरसची बाधा झाली असेल तर त्याला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, मळमळ जाणवू शकते. शिवाय, प्रकृती आणखी गंभीर झाल्यास फुप्फुसात पाणी भरण्याची किंवा श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते.

हंता वायरस

फोटो स्रोत, BSIP/UIG Via Getty Images

जानेवारी 2019 मध्ये हंता व्हायरसची बाधा होऊन पेंटागोनियामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिथल्या पर्यटकांनाही याची कल्पना देऊन खबरदारीचा इशारा देण्यात आला होता.

तेव्हाच्या एका अंदाजानुसार हंता व्हायरसची लागण झालेले 60 रुग्ण आढळले होते, ज्यापैकी 50 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

CDC अनुसार हंता व्हायरसची लागण झाली तर त्यावर कोणताही 'विशिष्ट उपचार' नाही, आणि यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे 38 टक्के आहे.

हंता वायरस

फोटो स्रोत, BSIP/UIG Via Getty Images

भारतात ट्विटरवर आला व्हायरस

जेव्हा हंता व्हायरसची बातमी आली, तेव्हा आधीच कोरोना व्हायरसमुळे धास्तावलेले लोक ट्विटरवर व्यक्त होऊ लागले.

चीनने काय स्पर्धा लावलीये का व्हायरस शोधण्याची, अशी प्रतिक्रिया @istanBIG_ ने दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तर ऑस्टिन तुनोई लिहितात, 'कोरोना व्हायरसला आता वाटत असेल - अरे, माझं अजून संपलं नाहीये आणि तू आला ही?'

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

हॅरिस नावाच्या एका युजरने त्याची भीती व्यक्त केली आहे - हे जग संपतंय का?

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

तर डॉ. विहांग पटेल यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे -

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

हंता व्हायरस याच्या नावावरून याचा भारतात जन्म झाला असावा, असं इब्न मुहमंद यांना वाटतं.

या व्हायरसची लागण कुणाला होऊ शकते?

शेतात काम करत असाल किंवा तुमच्या घरात उंदीर असतील तर त्यामुळे या व्हायरसची बाधा होऊ शकते. मुंबईतल्या अनेक जुन्या इमारतींमध्ये उंदीर आहेत, पण घाबरून जायचं कारण नाही. कारण मुळात तुमच्या शहरातल्या उंदरांना हंताची बाधा झाली असेल तरच तुम्हाला धोका आहे. आणि उंदीर चीनमधून भारतात माणसांप्रमाणे प्रवास करत नाहीत. त्यामुळे सध्या काही टेन्शन घेऊ नका.

मुळात ज्या ठिकाणी भरपूर उंदीर असतील किंवा उंदरांच्या संपर्कात येऊन काही काम करावं लागत असेल तर त्याच लोकांना या आजाराचा धोका आहे.

अमेरिकेत 1993 पासून ते 2018 पर्यंत HPSच्या रुग्णांची संख्या 728 इतकी आहे. या 25 वर्षांत अमेरिकेत 262 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका, कॅनडा, चिली, अर्जेंटिना, ब्राझिल, बोलिव्हिया, उरुग्वे, पेरू आणि आता चीनमध्ये या व्हायरसच्या केसेस आढळल्या आहेत.

आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या आजाराचा नेमका प्रसार कसा होतो? आता आपण ते पाहू

चीनमध्ये मृत्यू नेमका कशामुळे?

हंता व्हायरसमुळे आणखी एक आजार होतो. या आजाराला HFRS असं म्हणतात. याचा फुलफॉर्म आहे हेमोरेजिक फिव्हर विथ रेनल सिंड्रोम.

हा आजार चीन, दक्षिण कोरिया या भागात आढळतो. चीनमध्ये जो आता मृत्यू झालाय, तो या HFRS ने झाल्याची शक्यता आहे. या आजारात किडन्यांजवळ इन्फेक्शन तयार होऊन पेशंटला ताप येतो आणि आतमधल्या नसांमधून रक्तस्राव होतो त्यामुळे त्याचा मृत्यू होतो.

HFRS या आजारात पेशंटला मळमळणं, उलटी होणं, पोटात दुखणं असा त्रास होतो. त्या व्यक्तीला खूप ताप येतो. लो ब्लड प्रेशर, जळजळ होणं अशी लक्षणं दिसतात. यामध्ये किडनी निकामी देखील होऊ शकते.

या आजाराची लागण झाल्यावर मृत्यू होण्याचं प्रमाण 5 ते 10 टक्के आहे.

भारतात हा आजार कुणाला झाला आहे?

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायलॉजीने जून 2015 मध्ये एक रिसर्च पेपर प्रकाशित केला होता. त्यात भारतात हंता व्हायरसच्या स्थितीबद्दल सांगण्यात आलं होतं. आंध्रप्रदेशातल्या कडप्पा जिल्ह्यात 2007 मध्ये एका व्यक्तीमध्ये हंता व्हायरसची लक्षणं आढळली होती. त्या रुग्णाच्या विविध टेस्ट घेऊन, निदान करून योग्य उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्याआधी 1996 मध्ये अशा प्रकारची एक केस आढळली होती असा उल्लेख या पेपरमध्ये आहे.

या व्हायरसची भीती बाळगण्याची काही एक गरज नाही, असं विषाणूतज्ज्ञ डॉ. आनंद देशपांडे सांगतात. ते मराठवाडा कृषी विद्यापीठात व्हेटरनरी सायन्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक आहेत.

"या व्हायरसची लागण इन्फेक्टेड उंदराच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीलाच होते. मॅन टू मॅन व्हायरसचा प्रसार होतो, असं संशोधन अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे जसं कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला तसं होण्याची शक्यता नाही. आपल्यालाच नाही तर चीनमधल्या लोकांना देखील या व्हायरसची भीती बाळगण्याचं काही कारण नाही," असं डॉ. देशपांडे सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)