कोरोना व्हायरसः जगाला हादरवणारे हे 5 रोग तुम्हाला माहिती आहेत का?

People praying for relief from the bubonic plague, circa 1350.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्लेगपासून संरक्षण व्हावे अशी मागणी करणारे लोक

कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. जगण्याची पद्धत बदलून गेली आहे. यातले अनेक बदल हे तात्पुरते असतील. पण रोगाच्या साथींनी वर्षानुवषं आपल्या खाणाखुणा इतिहासात उमटवलेल्या आहेत.

यामुळे राजघराण्यांत उलथापालथ झाली, वसाहतवाद (Colonialism) वाढला आणि अगदी या सगळ्याचा वातावरणावरही परिणाम होतं तापमान काहीसं घसरलं.

14व्या शतकातील मृत्यूसत्र आणि पाश्चिमात्य युरोपाचा उदय

1350च्या सुमारास युरोपात झालेला प्लेगचा उद्रेक भीषण होता. एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश संख्या यावेळी मारली गेली.

पण लाखो लोकांचा जीव गेल्याने युरोपातले अनेक देश आधुनिक व्हायला मदत झाली. आज हे देश जगातल्या श्रीमंत देशांपैकी आहेत.

गाठीच्या प्लेगमुळे युरोपातले लाखो लोक मृत्युमुखी पडले. परिणामी शेतात काम करणाऱ्या कामगारांची संख्या घटली आणि जमिदारांना मजूरांचा तुटवडा भासायला लागला.

याचा परिणाम म्हणून उरलेल्या कामगारांकडे जास्त पैसे मागण्याची शक्ती आली.

यापूर्वी सरंजामशाहीमध्ये या कामगारांना जमिनीदाराच्या जमिनीवर सक्तीने काम करावं लागत असे. पण प्लेगनंतर ही परिस्थिती बदलली.

आणि पश्चिम युरोपात आधुनिक, कमर्शियल म्हणजे व्यापारी आणि पैशांवर आधारित अर्थव्यवस्था उदयाला आली.

People praying for relief from the bubonic plague, circa 1350.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्लेगपासून संरक्षण व्हावे अशी मागणी करणारे लोक

लोकांकडून काम करवून घेणं जसजसं महाग होत गेलं तसतसे उद्योगांनी लोकांना पर्याय देणाऱ्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायला सुरुवात केली.

पण प्लेगच्या या उद्रेकामुळे साम्राज्यवादाला खतपाणी मिळाल्याचंही म्हटलं जातं.

समुद्रमार्गे प्रवास करणं किंवा एकंदरीतच नवख्या वाटा धुंडाळणं तोपर्यंत मोठ्या धोक्याचं मानलं जाई. पण प्लेगमुळे घरातच इतक्या जणांचा मृत्यू झाला की लोक लांबच्या प्रवासाला जायला अधिक इच्छुक झाले. युरोपीय साम्राज्य पसरायला यामुळे मदत झाली.

अर्थव्यवस्था आधुनिक झाली आणि त्यामुळे तंत्रज्ञानातली गुंतवणूक वाढली. इतर देशांवरचं युरोपियन देशांचं वर्चस्व वाढलं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून पश्चिम युरोप हा जगातल्या सर्व शक्तीमान प्रदेशांपैकी एक झाला.

देवीमुळे अमेरिकेत झालेले मृत्यू आणि हवामान बदल

15 व्या शतकात उत्तर आणि दक्षिण अमेरिकन वसाहतींमध्ये इतक्या लोकांचा बळी गेला की त्याचा परिणाम जगाच्या वातावरणावर झाला.

Clothes infected by the Black Death being burnt in medieval Europe

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्लॅक डेथमुळे संक्रमित झालेले कपडे जाळताना

युरोपियन देशांच्या या भागातल्या विस्ताराच्या काळात या भागातली लोकसंख्या 6 कोटी लोकांवरून (त्यावेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 10%) पुढच्या शंभर वर्षांमध्ये केवळ 5० ते 6० लाखांवर आल्याचं युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात आढळलं.

यातल्या अनेकांचा मृत्यू हा त्यांच्यावर राज्यकरणाऱ्यांच्या मार्फत आलेल्या रोगांमुळे झाला होता.

सगळ्यात जास्त बळी घेतले ते देवीच्या साथीने (Smallpox). याशिवाय गोवर, एनफ्लुएन्झा (फ्लू - शीतज्वर), गाठ येऊन होणारा प्लेग, घटसर्प ( diphtheria), संसर्गजन्य साथीचा ताप (Typhus) आणि कॉलरानेही अनेक बळी घेतले.

या रोगांमुळे या भूभागात अनेकांचे जीव गेले आणि जे जगले त्यांचे हाल झालेच. पण या सगळ्याचा परिणाम संपूर्ण जगावरही झाला.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेक्सिको 1520

कमी लोक जिवंत राहिल्याने शेतीखालच्या वा वावर असणाऱ्या भूभागात घट झाली. परिणामी मोठ्या भूभागांचं नैसर्गिकरित्या जंगल वा माळरानात पुन्हा रुपांतर झालं.

अशाप्रकारे तब्बल 5,60,000 किलोमीटरचा भूभाग बदलल्याचा अंदाज आहे. म्हणजे फ्रान्स वा केनिया या देशांच्या आकाराएवढा भूभाग रूपांतरित झाला.

झाडाझुडपांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने कार्बन डाय ऑक्साईड (CO2)ची पातळी घटली. (अंक्टार्टिकाच्या बर्फाच्या नमुन्यांवरून हे प्रमाण मोजलं जातं.) आणि परिणामी जगाच्या बहुतांश भागातलं तापमान घटलं.

यासोबतच मोठ्या ज्वालामुखींचा उद्रेक आणि कमी सौर बदल (Solar Activity) यामुळे जो कालखंड सुरू झाला ज्याला 'लिटील आईस एज' (Little Ice Age) वा 'लहान हिमयुग' म्हणून ओळखलं जातं. या काळात जगातल्या अनेक भागांतलं तापमान घटलं.

Illustration of a meeting between the Spanish Conquistadors and the natives of Peru.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्पॅनिख राज्यकर्ते आणि पेरुमधील मूळ लोकांची बैठक

याचा सगळ्यात मोठा फटका बसला युरोपाला. इथल्या पिकांवर याचा परिणाम झाला आणि दुष्काळी परिस्थिती आली.

पिवळा ताप आणि हैतीचं फ्रान्सविरुद्ध बंड

हैतीमधल्या एका साथीच्या रोगाच्या उद्रेकामुळे उत्तर अमेरिकेतलं फ्रान्सचं साम्राज्य संपुष्टात आलं आणि पाठोपाठ अमेरिकेचा आकार आणि बळ यांच्यात झपाट्याने वाढ झाली.

1801 मध्ये गुलामांनी युरोपियन राजवटीच्या विरोधात बंड केल्यानंतर हैतीवर टुसँ लुव्हेर्टिअर (Toussaint Louverture) याने फ्रान्सच्या मदतीने राज्य केलं.

Slave rebellion on the night of 21 August 1791.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 21 ऑगस्ट 1971 रोजी गुलामांनी केलेला उठाव

आपण या भागाचे कायमस्वरुपी गव्हर्नर वा राज्यकर्ते असल्याचं फ्रेंच योद्धा नेपोलिअन बोनापार्टने जाहीर केलं. या बेटाचा संपूर्ण ताबा घ्यायचं त्याने ठरवलं आणि बळाचा वापर करून सर्व सूत्रं आपल्याकडे घेण्यासाठी त्याने हजारोंचं सैन्य पाठवलं. युद्धभूमीवर ते यशस्वी झाले.

पण पिवळ्या तापाला (Yellow Fever) त्यांना मात देता आली नाही. सैनिक, अधिकारी, डॉक्टर्स आणि खलाशी असे सगळे मिळून तब्बल 50,000 जणांचा बळी गेल्याचा अंदाज आहे. यातून बचावलेले फक्त 3000 जण फ्रान्सला परतू शकले.

आफ्रिकेमध्ये उगम झालेल्या या रोगाचा प्रतिकारक करण्याची नैसर्गिक क्षमता या युरोपियन सैन्यामध्ये नव्हती.

खचलेल्या, पराभूत सैन्याकडे पाहत नेपोलियनने फक्त हैतीच नाही तर उत्तर अमेरिकेवर सत्ता गाजवण्याचे मनसुबेही सोडून दिले.

Napolean Bonaparte, the Emperor of France and King of Italy, on horseback.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नेपोलियन बोनापार्ट

हैतीमधले उठाव मोडून काढण्यासाठीचा असफल प्रयत्न केल्याच्या दोनच वर्षांनंतर या फ्रेंच नेत्याने अमेरिकन सरकारला 2.1 दशलक्ष चौरस किलोमीटर्सचा भूभाग विकला. याला - लुईझियाना खरेदी करार (Louisiana Purchase) म्हणून ओळखलं जातं. यामुळे अमेरिकेच्या भूभागात वाढ होऊन हा देश दुप्पट आकाराचा झाला.

आफ्रिकेतला जनावरांचा प्लेग (Rinderpest) आणि आफ्रिकेतलं युरोपियन साम्राज्य

प्राण्यांमध्ये होणाऱ्या एका साथीच्या भीषण आजारामुळे आफ्रिकेमध्ये युरोपियन साम्राज्यांचा विस्तार झपाट्याने व्हायला मदत झाली.

या साथीच्या उद्रेकामुळे माणसांचा थेट मृत्यू होत नव्हता पण यामुळे प्राणी मरून पडत होते. याला जनावरांचा प्लेग असंही म्हटलं जातं.

1888 ते 1897 या काळात रिंडरपेस्ट व्हायरस (जनावरांच्या प्लेगमुळे) मुळे आफ्रिकेतली 90% गुरढोरं मारली गेली. आफ्रिकेच्या टोकाशी असलेली वस्ती, पश्चिम आफ्रिका आणि नैऋत्य आफ्रिकेला या मोठा तडाखा बसला.

गुरढोरं मेल्याने लोकांची उपासमार झाली, समाजात फूट पडली आणि याचा प्रभाव असणाऱ्या भागांतून निर्वासितांचे लोंढे बाहेर पडू लागले.

Dead oxen, some partly buried, thought to have died from Rinderpest

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेलेले बैल आणि काही अर्धमेले बैल पुरण्याचा प्रयत्न

शेतीवरही याचा परिणाम झाला कारण बहुतेक शेतकरी हे नांगरणीसाठी बैलांवर अवलंबून होते.

या रोगामुळे माजलेल्या हाहाःकारामुळे 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेच्या प्रचंड मोठ्या भागांमध्ये युरोपियन देशांना आपलं साम्राज्य उभारणं सोपं झालं.

रिंडरपेस्ट व्हायरस वा जनावरांच्या प्लेगचा उद्रेक होण्याच्या काही वर्ष आधीच या देशांनी विस्तारासाठीच्या योजना आखायला सुरुवात केली होती.

A drawing of the Berlin conference with a giant map of Africa

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बर्लिन कॉन्फरन्समध्ये आफ्रिकेचा नकाशा

1884-1885मध्ये बर्लिनमध्ये युरोपातल्या 14 देशांची परिषद पार पडली. यामध्ये युके, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल, बेल्जियम आणि इटलीसह इतर देशांचा समावेश होता. या देशांनी आफ्रिकेतल्या विविध भूभागांवर आपला दावा सांगितला आणि त्यासाठीची बोलणी केली. या गोष्टी नक्की करण्यात आल्या आणि त्यांची आखणीही करण्यात आली.

आफ्रिकन भूखंडावर याचा मोठा परिणाम झाला. 1870च्या दशकात एकूण आफ्रिकेचा फक्त 10% भूभाग हा युरोपियन अधिपत्याखाली होता. पण 1900 पर्यंत हे प्रमाण वाढून 90% झालं होतं.

जनावरांच्या प्लेगच्या उद्रेकामुळे जो हाहाःकार माजला त्यामुळे युरोपियनांना जमीन बळकावणं सोपं गेलं.

An engraving of casualties during the fall of the Ming dynasty

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मिंग राजवटीतील घटना

इटलीने खुश्कीच्यामार्गाने इरिट्रियाममध्ये 1890च्या दशकाच्या सुरुवातीला प्रवेश केला. यावेळी इथिओपियाच्या अनेक भागांमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे जवळपास 33टक्के लोकसंख्या मारली गेली होती.

"आर्थिक संकटाला आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरं जाणाऱ्या भागात साम्राज्यवाद कसा आला' याचं वर्णन संयुक्त राष्ट्रसंघांच्या आफ्रिकेच्या इतिहासात आहे.

प्लेग आणि चीनमधली मिंग राजवट

मिंग घराण्याने जवळपास तीनन शतकं चीनवर राज्य केलं. या काळात त्यांचा पूर्व आशियावर मोठा सांस्कृतिक आणि राजकीय प्रभाव होता.

पण राजघराण्याचा अंत ओढावण्यात काही प्रमाणात प्लेगचा हातभार लागला.

An engraving of people passing through a gate in the Great Wall of China

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनच्या भिंतीजवळून जाणारे लोक

1641मध्ये उत्तर चीनमध्ये या प्लेगच्या साथीचा अंत झाला. यामुळे प्रचंड प्रमाणात मृत्यू झाले. काही भागांमधली 20 ते 40टक्के लोकसंख्या या रोगाला बळी पडली. याच काळात दुष्काळही पडला आणि टोळधाडीही आल्या.

शेतांमध्ये पिकं न उरल्याने लोकांजवळ अन्न नव्हतं. असं म्हणतात की काहींनी यामुळे रोगामुळे बळी पडलेल्यांच्या मृतदेहांचं मांस खायला सुरुवात केली होती.

गाठीचा प्लेग आणि मलेरिया एकत्र आल्याने होणाऱ्या आजारामुळे ही भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. कदाचित उत्तरेकडून आलेल्या हल्लेखोरांसोबत हे आजार आले असावेत. पण याचा परिणाम म्हणून ही मिंग राजवट संपुष्टात आली.

लुटारूंच्या हल्ल्यांच्या पाठोपाठ मांचुरियाच्या क्विंग (Qing) राजवटीने सुनियोजित हल्ले केले आणि अखेर मिंग राजवटीची जागा घेतली. त्यांनी स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं आणि पुढची अनेक शतकं चीनवर राज्य केलं.

त्यावेळी मिंग राजघराण्याचं नेतृत्त्वं अनेक अडचणींना सामोरं जात होतं. यामध्ये भ्रष्टाचार आणि दुष्काळ या अडचणी तर होत्याच. पण जीवघेण्या आजारांच्या उद्रेकाने साऱ्या देशाला वेढलं होतं. या सगळ्यामुळेच अखेरीस या मिंग राजवटीचा अंत झाला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)