Hanau Attack: जर्मनीतील हल्ल्यांमागे 'अति उजव्या विचारसरणी'चे लोक, पोलिसांचा संशय

फोटो स्रोत, EPA
जर्मनीच्या हनाऊ शहरात गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 9 जणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. जर्मनीच्या स्थानिक प्रसारमाध्यमांतून ही माहिती मिळाली आहे.
बातम्यांनुसार, एका अज्ञात हल्लेखोराने हनाऊमधील एका बारमध्ये गोळीबार केला. तर शहराजवळच्या केसेल्तोद परिसरातही एका बारमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा हल्ला अति उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक माध्यमांनी सांगितल्यानुसार या एका हल्ल्यातील संशयिताची ओळख पटली आहे. त्या व्यक्तीचं नाव तोबियस आर आहे. त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक होती. हल्ल्यानंतर त्याने आत्महत्या केली.
बंदुकधारी हल्लेखोरांनी स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता हा गोळीबार केला.
पोलीस अधिकारी आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीने दोन्ही परिसरातील गस्त घालण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Reuters
स्थानिक जर्मन प्रसारमाध्यम हेसेनशाऊ यांनी दिलेल्या बातमीनुसार, पहिल्या गोळीबारात तीनजण तर दुसऱ्या गोळीबारात पाचजणांचा मृत्यू झाला आहे.
हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती जर्मन वृत्तपत्र बिल्डनं दिली आहे.
हनाऊ जर्मनीच्या हेसेन राज्यातील एक शहर आहे. हे शहर फ्रँकफर्ट शहरापासून सुमारे 25 किलोमीटरवर आहे.
हल्लेखोरांचा उद्देश अद्याप तरी स्पष्ट होऊ शकला नाही. याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









