Miss Universe 2019: 'आज मी मिस युनिव्हर्स आहे, एकेकाळी माझ्यासारखी सावळी मुलगी सुंदरही मानली जात नव्हती'

फोटो स्रोत, Getty Images
"मी अशा जगात वाढले, जिथं माझ्यासारखं रूप असलेली, माझ्यासारखी त्वचा आणि केस असणारी स्त्री कधीच सुंदर मानली गेली नाही."
"मला वाटतं, की आज ते सर्व संपलं आहे."
यंदा 'मिस युनिव्हर्स' ठरलेली झोझिबिनी तुंसी हिने दिलेला हा संदेश आहे. झोझिबिनी ही मूळ दक्षिण आफ्रिकेची आहे.
अमेरिकेतील अॅटलांटा प्रांतात गेल्या रविवारी (8 डिसेंबर) झालेल्या 'मिस युनिव्हर्स' सौंदर्य स्पर्धेत जगभरातील 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
झोझोबिनीने अंतिम फेरीत पोर्टो रिकोची मॅडिसन अँडरसन आणि मेक्सिकोची सोफिया अॅरागॉन या दोघींना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेल्या सौंदर्यवतींना वातावरण बदल, आंदोलनं आणि सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
मुलींसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची?
26 वर्षांच्या झोझीबिनी हिला विचारण्यात आलेला शेवटचा प्रश्न होता, आजच्या मुलींना आपण काय शिकवलं पाहिजे?
तिचं उत्तर होतं 'नेतृत्त्व'.
ती म्हणाली, "प्रदीर्घ काळापासून मुली आणि महिलांमध्ये या गुणाचा अभाव दिसतो. याचं कारण आम्हाला नेतृत्त्व करायचंच नाही, असं नाही. आम्ही काय करायचं, याचे समाजानेच काही निकष ठरवून दिले आहेत."
"मला वाटतं, की आम्ही जगात सर्वांत सक्षम आहोत आणि आम्हाला प्रत्येक संधी मिळायला हवी. आणि हेच आज आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. स्वतःचं स्थान बनवा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
2011 साली लैला लोपेज हिनं 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला होता. त्यानंतर मिस युनिव्हर्स किताब मिळवणारी झोझीबिनी ही पहिली कृष्णवर्णीय आहे.
झोझीबिनीच्या यशाबद्दल लोपेजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचं अभिनंदन केलं आहे. तिनं लिहिलं आहे, "अभिनंदन मुली. तुझ्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून आला आहे."
आपल्या विजयावर झोझिबिनीनं लिहिलं आहे, "आज रात्री एक दार उघडलं आहे आणि या दारातून जाणारी मी एक आहे, याचा मला खूप आनंद आहे."

फोटो स्रोत, EPA
"या क्षणाच्या साक्षीदार झालेल्या सर्व मुलींनी कायम आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी माझ्या चेहऱ्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहावं."
"मी माझं नाव अत्यंत अभिमानाने घेऊ शकते - झोझीबिनी तुंझी, मिस युनिवर्स 2019"
झोझीबिनीच्या विजयानंतर ट्विटरवर #MissUniverse हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि लोकप्रिय चॅट शो होस्ट ऑपरा विन्फ्रे यांनीही ट्विटरवरून तिला शुभेच्छा दिल्या.
अनेकांनी एका कृष्णवर्णीय तरुणीची मिस युनिवर्स म्हणून निवड होणं, किती महत्त्वाचं आहे, हेदेखील सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
गेल्या ऑगस्ट महिन्यातच झोझीबिनीने 'मिस साउथ आफ्रिका' हा किताबही पटकवला होता. 'मिस युनिव्हर्स' संयोजकांनी तिचं वर्णन करताना ती "निसर्गदत्त सौंदर्यवती" असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी पुढे लिहिलं आहे, "ती एक कार्यकर्ती असून लिंग आधारित हिंसाचाऱ्याच्या लढ्यात तिचा सक्रीय सहभाग आहे."
झोझीबिनीला मिळालेली पुरस्काराची रक्कम किती होती, हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी तिला न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये वर्षभर राहण्याची मोफत व्यवस्था आणि एक लाख डॉलर्स इतकं वेतन मिळालं असेल, असा अंदाज आहे.
याव्यतिरिक्त ती मॉडेलिंगसाठी जगभर प्रवासही करू शकणार आहे.
सौंदर्य स्पर्धांची गरज काय?
आजच्या युगात 'मिस युनिव्हर्स' आणि इतर सौंदर्य स्पर्धांना स्थान आहे का, अशी टीकाही सातत्याने होत असते.
याविषयीच बोलताना एकाने ट्विटवर लिहिलं आहे, "स्त्रियांमध्ये कोण सर्वात सुंदर यासाठी स्पर्धा घेणं आता आउटडेटेड झालं आहे."
मात्र, या स्पर्धेतही काळानुरूप बदल झाले आहेत. या स्पर्धांमध्ये आता तरुणींनी मिळवलेलं यश, त्यांच्या कर्तृत्वाला अधिक महत्त्व मिळू लागलंय. शिवाय स्त्रियांना आवाज देणारं व्यासपीठ, अशी ओळख निर्माण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो.

फोटो स्रोत, KEV WISE
'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत आजही 'स्विमवेअर कॉम्पिटिशन' होते. यामध्ये सौंदर्यवती बिकिनीमध्ये पोज देतात. स्पर्धेचा हा भाग टेलिकास्ट करण्यात येत नाही.
या स्पर्धांवर होणाऱ्या टीकेविषयी बोलताना गेल्या वर्षीची ग्रेट ब्रिटनची स्पर्धक डी-अॅनने रेडिओ-1 न्यूजबीटला दिलेल्या मुलाखतीत सौंदर्यस्पर्धांना समाजात आजही स्थान असल्याचं म्हटलं होतं.
तिनं म्हटलं होतं, "21व्या शतकात स्त्रीची सर्वांत मोठी समस्या म्हणजे लोकांनी तिचं म्हणणं ऐकलं पाहिजे. स्वतःचं स्थान निर्माण करताना आम्ही अत्यंत सर्जनशील असायला हवं."
सौंदर्यस्पर्धांवर होणारी टीका आणि सौंदर्याची व्याख्या काय असावी, यावरून असलेला वाद 'समजू शकतो', असंही तिनं म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"मी या व्यवस्थेतून गेलेली आहे. त्यामुळे तरुण मुलींनी यात नक्कीच सहभागी व्हावं, असा सल्ला मी देईन."
'मिस युनिव्हर्स'प्रमाणेच जगातली आणखी एक सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा असलेल्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेमध्ये आई झालेल्या तरुणी भाग घेऊ शकणार नाही, असा नियम करण्यात आला होता. त्यावरूनही बरीच टीका झाली.
2018 साली व्हेरोनिका डिडुसेन्को ही मॉडेल तरुणी 'मिस युक्रेन' किताबाची मानकरी ठरली होती. मात्र, तिला एक मुलगा आहे, हे कळल्यावर आयोजकांनी तिचा किताब परत घेतला होता.
या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय तिने घेतला होता.
न्यूजबिटला दिलेल्या मुलाखतीत तिनं म्हटलं होतं, "मी त्यांना अधिक कालसुसंगत करू इच्छिते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यात योग्य समतोल साधू शकणाऱ्या आजच्या स्त्रीचं वास्तव प्रतिनिधीत्व मला करायचं आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)