ब्रेक्झिट: युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय 31 जानेवारीपर्यंत लांबला

फोटो स्रोत, Getty Images
युरोपियन महासंघानं ब्रेक्झिटला 31 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांच्या ट्वीटमधून ही बाब समोर आली आहे.
डोनाल्ड टस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की आम्ही ब्रेक्झिटला मुदतवाढ देत आहोत. ही मुदतवाढ लवचिक आहे. जर संसदेनं या कराराला मान्यता दिली तर युके 31 जानेवारीपूर्वीही युरोपियन महासंघातून बाहेर पडू शकतो.
सर्वसाधारण निवडणुका मुदतीआधी घेण्याच्या बोरीस जॉन्सन यांच्या प्रस्तावावर खासदार 12 डिसेंबरला मतदान करतील, अशी शक्यता आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
युरोपियन महासंघाच्या 27 राजदूतांनी तयार केलेला कराराचा मसुदा बीबीसीनंही पाहिला आहे. युरोपियन महासंघातून युकेनं बाहेर पडण्याच्या मुदतीबाबत भविष्यात कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असं या मसुद्यामध्ये स्पष्ट केलं होतं.
नियोजित वेळापत्रकानुसार युके 31 ऑक्टोबरपर्यंत युरोपियन महासंघातून बाहेर पडणार होतं. मात्र ब्रेक्झिट कराराला मुदतवाढ मिळविण्यासाठी बोरिस जॉन्सन यांना संसदेची सहमती घेणं आवश्यक होतं. मात्र संसदेत ब्रेक्झिट प्रस्ताव फेटाळला गेला.
युके कोणत्याही परिस्थितीत 31 ऑक्टोबरपूर्वी युरोपियन महासंघातून बाहेर पडेल, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन सातत्यानं सांगत होते.
बीबीसीच्या सहायक राजकीय संपादक नॉर्मन स्मिथ यांनी म्हटलं, की नो-डील ब्रेक्झिट तर आता बासनात गुंडाळली गेलीये. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचा दबाव खासदारांवर आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








