You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इतिहास: पेरूमध्ये उत्खननात सापडले शेकडो मुलांचे मृतदेह
बळी दिलेल्या 227 मुलांच्या सांगाड्यांचा शोध पेरूमधल्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावला आहे.
पेरूची राजधानी लिमाच्या उत्तरेस, होनचाको या किनारपट्टीच्या शहराजवळ 5 ते 14 वर्षं वयोगटातील 227 बळींचे मृतदेह आढळले आहेत.
जवळपास 500 वर्षांपूर्वी इथे मुलांचा बळी देण्यात आला होता, असं समजलं जातं.
वर्षभरापूर्वी बळी दिलेल्या 200 मुलांच्या सांगाड्यांचा शोध लागला होता.
पुरातत्वशास्त्रज्ञांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "या नवीन सांगाड्यांपैकी काही मृतदेहांचे केस आणि कातडे दिसून येतात."
ओल्या हवामानात मुलांचा बळी देण्यात आला आणि समुद्राच्या दिशेनं त्यांना जाळण्यात आलं, असं या सांगाड्यांहून दिसत आहे. याचा अर्थ चिमुच्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी या मुलांचा बळी देण्यात आला, असे संकेत यातून मिळतात.
ही घटना कधी घडली, हे अद्याप स्पष्ट नाहीये.
चिमु पेरूच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर वास्तव्यास होता आणि त्या प्रदेशातील ही सर्वांत शक्तिशाली संस्कृती होती.
इन्कस जिंकण्यापूर्वी ते 1200 ते 1400च्या दरम्यान प्रमुख ठरले आणि त्यानंतर त्यांनी स्पॅनिश लोकांवर विजय मिळवला होता.
त्यांनी 'शि' नावाच्या चंद्राच्या देवताची उपासना केली, जे इन्कसप्रमाणेच सूर्यापेक्षाही सामर्थ्यवान आहेत, असा त्यांचा विश्वास होता.
त्याकाळी आध्यात्मिक भावनेपोटी यज्ञ आणि इतर मार्गांतून बळी द्यायची परंपरा होती.
या दफनभूमीतील उत्खननाचं काम अद्याप सुरू आहे. आणखी मृतदेह सापडतील, असं पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात.
"मुलांसोबत घडलेला प्रकार भयंकर आहे. जिथं खोदाल, तिथं मृतदेह सापडत आहेत," असं मुख्य पुरातत्वशास्त्रज्ञ फेरेन कास्टिलो यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)