ट्रंप आणि किम जाँग उन यांची अखेर कोरियाच्या सीमेवर भेट

फोटो स्रोत, AFP
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची भेट अखेर झाली आहे. लष्करमुक्त प्रदेशात त्यांनी किम यांची भेट घेतली. इथे येणं म्हणजे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे असं वक्तव्य त्यांनी किम यांच्याशी झालेल्या हस्तांदोलनानंतर केलं. गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांचा अपमान करायची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. आज मात्र एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं ते भासवत होते.
त्यांच्याबरोबर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन सुद्धा आहेत. दोन्ही नेते लष्करमुक्त प्रदेशात असून ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या सर्व घडामोडी अकल्पित आहेत.
"आमच्या भेटी सकारात्मकही होऊ शकतात" असं ते एका दुभाषाच्या माध्यमातून म्हणाले. याचा भविष्यात चांगला परिणाम होईल असंही ते म्हणाले.
त्याचवेळी किम आणि ट्रंप यांच्या संबंधांबद्दल प्रसारमाध्यमांनी सातत्याने नकारात्मक प्रतिमा तयार केली आहे असं ट्रंप यांना वाटतं.
तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची लष्करमुक्त (DMZ) प्रदेशात रविवारी भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.
ट्रंप यांनी ट्वीट करून किम जाँग उन यांना भेटीचं अचानकपणे आमंत्रण दिलं आणि आज ही भेट घेण्याचं जाहीर केलं होतं.
दक्षिम कोरियाची राजधानी सोल झालेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांनी शांततेतसाठी हस्तांदोलन करणार असंही त्यांनी सांगितलं होतं.
खराब हवामानामुळे रद्द झालेली भेट
ट्रंप यांनी नोव्हेंबर 2017मध्ये दोन्ही कोरियाला विभक्त करणाऱ्या डीमिलिट्राइझ्ड झोनचा दौरा करण्याचा प्रयत्न केला होता, पण खराब हवामानामुळे त्यांना माघारी यावं लागलं होतं.
ट्रंप आणि किम या दोघांची यंदा फेब्रुवारी महिन्यात हनोई इथे भेट झाली होती. ही भेट अयशस्वी झाली होती, यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता आली होती.
उत्तर कोरियानं अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा, असं अमेरिकेला वाटतं. तर दुसरीकडे उत्तर कोरियाला आपल्यावरील आर्थिक निर्बंधातून सुटका हवी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही महिन्यांत ट्रंप यांनी किम यांच्याविषयी कठोर भाषा वापरली होती.
मागच्याच आठवड्यात त्यांनी स्वतः उत्तर कोरियाच्या नेत्याच्या नावानं एक पत्र पाठवलं होतं. किम यांनी या पत्राचं कौतुक केलं होतं.
"किम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाकडे अनेक संधी आहेत," असं ट्रंप यांनी या महिन्यातच म्हटलं होतं.
"किम हे समजूतदार व्यक्ती आहे आणि उत्तर कोरियासोबत आम्ही अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणणार आहोत," असं ट्रंप यांनी मे महिन्यात जपान दौऱ्यामध्ये म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








