You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टीम इंडियाची ब्ल्यू-ऑरेंज जर्सी आणि पेट्रोल पंपाचं काय कनेक्शन- सोशल
टीम इंडिया आणि पेट्रोल पंप यांचं काय कनेक्शन आहे? सोशल मीडियावर पेट्रोल पंप का ट्रेंड होतंय?
वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची बहुचर्चित ब्ल्यू ऑरेंज जर्सीचं काल अनावरण झालं. बीसीसीआयचं अपारल पार्टनर असलेल्या नाईके इंडिया तसंच खुद्द बीसीसीआयने या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीचे फोटो ट्वीट केले.
थोड्या वेळानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचं या ब्ल्यू-ऑरेंज जर्सीत फोटोशूट झालं. त्याचे फोटो खेळाडूंनी शेअर केले.
नवी जर्सी ब्ल्यू आणि ऑरेंज रंगात आहे. पुढचा भाग गडद निळ्या रंगाचा आहे. बाह्या केशरी रंगाच्या आहेत. मागची बाजू संपूर्ण केशरी आहे.
या जर्सीचे फोटो समोर आल्यानंतर पेट्रोल पंप हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
टीम इंडियाची ब्ल्यू-ऑरेंज जर्सी हा रंग एका पेट्रोल निर्मिती आणि वितरण करणाऱ्या कंपनीच्या कपड्यांशी साधर्म्य साधणारा आहे.
यावरूनच पेट्रोल पंप हा हॅशटॅग बहरला. टीम इंडियाचे खेळाडू म्हणजे पेट्रोल पंपावरील कर्मचारी वाटत आहेत अशा पद्धतीने नेटिझन्स व्यक्त होऊ लागले.
युट्यूबर ध्रुव राठी यांनी टीम इंडियाचे खेळाडू पेट्रोल पंपावरील कर्मचारी वाटतात असं म्हटलं.
मी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेलो. तिथे मला अख्खी टीम इंडिया भेटली. धन्य झालो
टीम इंडियासाठी पेट्रोल पंप युनिफॉर्म अशा शब्दांत नेटिझनने जर्सीचं वर्णन केलं आहे
टीम इंडियाची जर्सी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसारखी का वाटते आहे? असा सवाल एका नेटिझनने केला आहे.
ही जर्सी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते असं एका नेटिझननं म्हटलं आहे.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मंडळींना फुल स्लीव्ह अर्थात पूर्ण बाह्यांचे कपडे असं एकाने म्हटलं आहे.
टीम इंडियाचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. म्हणूनच अशी जर्सी आहे
आयसीसीने वर्ल्ड कप पूर्वी सहभागी संघांना अवे जर्सी तयार ठेवण्याची सूचना दिली होती.
वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत असलेल्या भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका यांच्या जर्सीत निळा रंग आहे. यजमान असल्याने इंग्लंडला जर्सीत बदल करण्याची गरज नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं.
ऑस्ट्रेलिया (पिवळा), वेस्ट इंडिज (मरून) आणि न्यूझीलंड (काळा) यांच्या जर्सीचा रंग कोणत्याशी संघाच्या जर्सीशी साधर्म्य साधत नसल्याने त्यांना अवे जर्सीची आवश्यकता भासली नाही.
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अवे जर्सी तयार केली.
वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या नेहमीच्या ब्ल्यू जर्सी लाँच करण्यात आली. मात्र ब्ल्यू-ऑरेंज जर्सीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.
यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही माहिती दिली नाही. नाईके इंडियानेही गुप्तता बाळगली. टीम इंडियाच्या पत्रकार परिषदांवेळी याबाबत प्रश्न विचारण्यात आले पण खेळाडू तसंच संघव्यवस्थापनाने कोणतीही माहिती दिली नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया नेहमीच्या ब्ल्यू जर्सीत खेळली. अफगाणिस्तान संघाने मात्र त्यांची जर्सी बदलली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)