भारत-पाक वर्ल्ड कप मॅच: शोएब मलिकवर जोरदार टीका

शोएब मलिक

फोटो स्रोत, Getty Images

रविवारी पुन्हा एकदा वर्ल्डकपमध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर देशातील फॅन्सच्या टीकेची झोड उठली आहे.

पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकवर तर सर्वाधिक टीका होते आहे.

पाकिस्तानात ट्विटरवर शोएब मलिक ट्रेंडिंग विषयांमध्ये आहे. कोणी त्याला भारतीय म्हणतंय तर कुणी "भारताविरुद्ध खेळताना शोएब मलिकची डबल सेंच्युरी 200 धावांनी हुकली" अशा शब्दांत टीका केली.

ट्विटरवर शेअर करण्यात येत असलेल्या एका व्हिडिओमध्ये सानिया मिर्झाही त्याच्यासोबत आहे. या व्हिडिओमध्ये टेबलवर बाटल्या आहेत आणि एक व्यक्ती धुम्रपान करतेय.

भारताविरुद्धच्या मॅचच्या आधी शोएब मलिकने मेहनत घ्यायला हवी होती, असं रागावलेले पाकिस्तानी फॅन्स म्हणत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हार्दिक पांड्याने शोएब मलिकला खातंही न उघडू देता क्लीन बोल्ड केलं. याआधीच्या दोन मॅचेसमध्येही शोएब अपयशी ठरला आहे.

टीमवर ओझं झालाय का?

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकच्या करियरमधला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता, अशी चर्चा सुरू आहे.

2019च्या वर्ल्डकपमध्ये शोएब मलिक तीन सामने खेळला आहे आणि तिन्ही सामन्यात त्याची कामगिरी यथातथाच होती. त्याने इंग्लंड विरोधात 8 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध त्याला खातंही उघडता आलं नाही.

वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं शोएब मलिकने आधीच जाहीर केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

गेल्या 30 वनडे मॅचेसमध्ये शोएब मलिकने फक्त तीन अर्धशतकं केली आहेत. 2018च्या सुरुवातीपासून आतापर्यंत शोएब मलिकने 25.33च्या सरासरीने 608 धावा केल्या. यावरूनच शोएब टीमला फारसं काही देऊ शकला नाही, हे स्पष्ट होतं.

आपल्या करियरचा शेवटचा वर्ल्डकप खेळण्याची शोएबची इच्छा होती, पण तो आता टीमवर ओझं झाल्याचं पाकिस्तानच्या क्रीडा पत्रकारांचं म्हणणं आहे. आता यापुढच्या मॅचेसमध्ये शोएब मलिकच्या जागी आसिफ अली खेळण्याची शक्यता आहे.

शोएब मलिकने 287 वन डे मध्ये एकूण 7,534 धावा केल्या. शोएब अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याला टीममध्ये स्थान मिळत राहिलं. मलिक आणि ख्रिस गेल हे दोघं 90च्या दशकापासून खेळत आहेत.

वर्ल्ड कप नंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा शोएबने गेल्या वर्षीच्या जूनमध्ये केली होती. 2015मध्ये शोएब टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला होता आणि त्याने शारजामध्ये इंग्लंड विरुद्ध 245 धावांची केलेली खेळी, ही त्याच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम होती.

सरफराझवर टीकेची झोड

पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कामगिरीची पाकिस्तानाच खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी पत्रकार रेहान उल्-हक यांनी ट्वीट केलंय, "कोहलीने वनडेमध्ये 41 शतकं केली आहेत. आणि पूर्ण पाकिस्तानने मिळूनही 41 शतकं केलीयेत. यावरूनच दोन्ही टीम्समधला फरक दिसून येतो. हे मान्य करायला हवं की भारताची टीम वरचढ आहे. हे स्वीकारणं पाकिस्तानी फॅन्सना कठीण जाणार असल्याचं मला माहीत आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

भारताविरोधात रविवारी पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी कॅप्टन सरफराझ अहमदच्या या निर्णयाविषयीही शंका उपस्थित केल्या जात आहेत.

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ट्विटरवर म्हणतो की विराट कोहलीने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जी चूक केली होती तीच चूक सरफराजने केली. "एखादा कॅप्टन इतका बिनडोक कसा असू शकतो? बॅटिंग हे आपल्या टीमचं बलस्थान नाही, हे त्याला माहीतसुद्धा नव्हतं. बॉलिंग हे पाकिस्तानी टीमचं बलस्थान आहे.

"पूर्ण टीम बिनडोक आहे आणि मॅनेजमेंटही तशीच आहे. बॉलिंग अगदी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. आपण धावांचा पाठलाग करू शकत नाही, ही गोष्ट कॅप्टनला का माहीत नव्हती?"

शोएब अख्तरने म्हटलंय, "डोकं वापरायचंच नाही, असं आपल्या कॅप्टनने ठरवलं होतं. मी विराट कोहलीचा चाहता आहे, असं बाबर आजम म्हणतो. पण त्याच्याकडून शिकत काहीच नाही. इमामकडे काहीच टेकनिक नाही. तो ज्यापद्धतीने बाद झाला ते तर लाजिरवाणं होतं.

"पाकिस्तानी टीम नेमकी काय माईंडसेटने खेळते, हे कळायलाच मार्ग नाही. मला खूप वाईट वाटतंय. कॅप्टन आमच्या मॅनेजमेंटच्या हातातलं प्यादं झालाय. इमरान खानने ट्वीट तर केलं पण त्यांना याचा विचार करायला हवा की ट्वीट त्यांच्यासाठीच करावं, ज्यांच्यात क्षमता असेल."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

शोएब मलिकला टीममध्ये अनुभवी खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं. पण जर कामगिरी करता येत नसेल तर हा अनुभव काय फायद्याचा, असंही शोएब अख्तरने म्हटलंय. मलिकला फक्त अनुभवी म्हणून टीममध्ये ठेवणं चुकीचं असल्याचं अख्तरने म्हटलंय.

तर पाकिस्तानचा माजी कॅप्टन वसीम अक्रमने या पराभवाविषयी म्हटलंय, "गेल्या काही वर्षांमध्ये भारताने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खूप गुंतवणूक केलेली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने काहीच केलेलं नाही. भारतातलं क्रिकेट दरवर्षी बदलतंय. पण पाकिस्तानातलं फर्स्ट क्लास क्रिकेट हे काही निवडक पत्रकारांकडून चालवण्यात येतंय."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

या पराभवामुळे पाकिस्तानातल्या क्रिकेटच्या भविष्याबाबतची चर्चा पुन्हा एका जोमाने होतेय. असं म्हटलं जातंय की पाकिस्तानने त्यांच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुधारणा केली नाही तर येत्या काळात पाकिस्तानातलं देशांतर्गत क्रिकेटही संपुष्टात येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)