नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची बिश्केकमध्ये भेट

इमरान ख़ान और नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, MEA/INDIA

फोटो कॅप्शन, फाईल फोटो

किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची भेट झाल्याची सुत्रांनी बीबीसीला माहिती दिली आहे.

समोरासमोर आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन केलं. पण त्यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.

बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिली भेट आहे. नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांना यंदाच्या शपथविधीसाठी आमंत्रण दिलं नव्हतं.

तसंच बिश्केकला जाण्यासाठी मोदींनी पाकिस्तनच्या हवाई हद्दीतून जाणं सुद्धा टाळलं होतं.

दोन्ही नेत्यांमध्ये SCO म्हणजेच म्हणजेच शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या या बैठकीमध्ये कुठलीही अधिकृत भेट ठरली नव्हती. तसंच मोदींनी या परिषदेत भाषण करताना दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचं नाव न घेता टीका केली होती.

लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय झाल्यानंतर इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांचं फोन करून अभिनंदन केलं होतं. तसंच दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

इम्रान यांचा फोन आणि पत्रानंतर दोन्ही नेत्यांमध्ये यंदाच्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या वार्षिक बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)