न्यूझीलंड: ख्राइस्टचर्च हल्ल्यातील संशयितावर दहशतवादाचा आरोप निश्चित

न्यूझीलंड मधल्या ख्राइस्टचर्च इथं मशिदीवर झालेल्या हल्ल्यातील संशयितावर दहशतवादाचा आरोप निश्चित करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ख्राइस्टचर्च शहरात 15 मार्च रोजी दोन मशिदींवर हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात 51 जण ठार झाले होते.

या हल्ल्यातील संशयित ब्रेंटन टारंट याच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.

या संशयितावर हत्या तसंच हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे.

न्यूझीलंड येथील ख्राइस्टचर्च मधल्या दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. या हल्ल्याने पूर्ण देश हादरला होता.

"हल्लेखोराला हवी असलेली प्रसिद्धी आपण मिळू देणार नाही. त्याला जो काय संदेश द्यायचा होता, तो देऊ देणार नाही," अशी भूमिका न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी घेतली होती. या हल्ल्यानंतर न्यूझीलंडमध्ये सेमी-ऑटोमॅटिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)