एव्हरेस्टः या बेस कॅम्पवर गिर्यारोहक चढाईची प्रतीक्षा करतात - फोटो

या दिवसांमध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प एखाद्या गावासारखा दिसू लागतो. या वसंतात सुमारे 2 हजार लोक इथं जमले आहेत. त्यामध्ये 375 गिर्यारोहक आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा समावेश आहे.

एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेस आणि समुद्रसपाटीपासून 5,380 मीटर उंचीवर हा बेस कॅम्प आहे. एव्हरेस्टवर चढाई करण्यापूर्वी इथल्या हवामानाची सवय व्हावी यासाठी गिर्यारोहक इथे काही आठवडे राहाण्यासाठी जमतात.

वातावरणाची सवय व्हावी यासाठी प्रत्यक्ष माऊंट एव्हरेस्ट चढाईपूर्वी गिर्यारोहक काही दिवस वर-खाली जाऊन सराव करतात.

या वर्षी एव्हरेस्टच्या उंचीचे नव्याने मोजमाप करण्यासाठी नेपाळ सरकारने अधिकाऱ्यांचा एक चमू पाठवला आहे.

या वसंत ऋतूमध्ये नेपाळमधील 30 वेगवेगळ्या शिखरांवर जाण्यासाठी 800 गिर्यारोहकांना परवानगी मिळाली आहे.

माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे.

गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरामध्ये फणी चक्रीवादळ आल्यानंतर नेपाळच्या पर्वतमय प्रदेशात बर्फवृष्टी झाली. एव्हरेस्टच्या उंचावरील कॅम्पमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे काही तंबूही उखडले गेले.

गिर्यारोहकांना सुरक्षित जागी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. काही काळानंतर वातावरण निवळलं. आता गिर्यारोहक एव्हरेस्ट चढाईच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत.

(सर्व फोटोंचे हक्क संबंधित व्यक्तींकडे सुरक्षित)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)