Met Gala 2019: दीपिका पदुकोण-प्रियंका चोप्राचा जागतिक फॅशन मंचावर जलवा
फोटो स्रोत, Getty Images
Met gala हा फॅशन जगतातील सर्वांत मोठा समजला जाणारा कार्यक्रम आहे. न्यूयॉर्क मधल्या Metropolitan Museum च्या Costume Institute ला मदत करण्यासाठी तो आयोजित केला जातो.
महागडी तिकीटं आणि खास पाहूणे यासाठी हा कार्यक्रम ओळखला जातो. या वर्षीची थीमही आहे Camp: Notes on Fashion. छायाचित्रकार सुसान सोंटाग यांच्या Notes on Camp या निबंधावर ही थीम बेतलेली आहे.
त्यामुळे यावर्षी या कार्यक्रमातील वेशभूषा विरोधाभास, विनोद, अनुकरण, कौशल्य, अतिरेक यांच्यावर आधारित आहे.
या सगळ्याची झलक गायिका लेडी गागाच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आली. मात्र जे दिसलं ते प्रत्यक्षात तसं नव्हतं.
फोटो स्रोत, AFP
फोटो कॅप्शन, लेडी गागा या कार्यक्रमाच्या यजमानांपैकी एक आहेत. ती एका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आली.
फोटो स्रोत, AFP
फोटो कॅप्शन, तिने गुलाबी गाऊन बाजूला केला आणि ती काळ्या गाऊन मध्ये अवतरली.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, नंतर तोही तिने बाजूला केला. आत तिने गुलाबी रंगाचा स्लीम फिट ड्रेस घातला होता.
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, तो ड्रेस बाजूला केल्यावर ती शेवटी या रुपात दिसली.
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, सेरेना विलियम्सही या कार्यक्रमाची यजमान होती. ती एका पिवळ्या गाऊन मध्ये आली. त्यावर तिने नाईके कंपनीचे शूज घातले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)