ब्रिटनच्या राजघराण्यात गोंडस राजकुमाराचा जन्म

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांना मुलगा झाला आहे.
खुद्द प्रिन्स हॅरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपण अत्यंत आनंदी आहोत, असं म्हणत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तसंच प्रेग्नेंसीदरम्यान आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे आभार मानतो. मेगन मार्केल आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक असून बाळाच्या नावाचा विचार सुरू असल्याचं ही त्यांनी पुढे सांगितलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
स्थानिक वेळेनुसार 6 मे म्हणजेच आज सोमवारी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी बाळाचा जन्म झाला.
बकिंगहॅम पॅलेसने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बाळाचं बजन ३.२ किलोग्राम इतकं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
प्रिन्स हॅरी हे 'ड्यूक ऑफ ससेक्स', तर मेगन मार्कल या 'द डचेस ऑफ ससेक्स' म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील हा नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं सातवं पतवंड आहे.

फोटो स्रोत, Instagram/sussexroyal
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये गेल्या वर्षी (19 मे 2018 रोजी) झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)