You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा गोरिला सेल्फीसाठी अगदी माणसांसारखीच 'पोज' देतात...
कांगोमध्ये दोन गोरिलांनी सेल्फीसाठी व्यवस्थित 'पोज' देण्याचा प्रसंग घडला आहे. त्यांचा हा "अतिशय क्यूट" असा फोटो सर्वत्र व्हायरल होतोय.
कांगोमधील शिकारविरोधी पथकातील दोन रक्षकांनी सेल्फी काढण्यात आला आहे. या रक्षकांनीच या गोरिलांना त्यांच्या लहानपणी वाचवलं होतं.
कांगोमधील विरुंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये हा फोटो काढला आहे. त्या पिलांच्या आई-वडिलांना मारण्यात आल्यानंतर त्यांना वाचवलं होतं.
या पिलांची सुटका केल्यापासून दोन रक्षकांनी त्यांना वाढवलंय, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक मबुरान्वुम्वे यांनी बीबीसीला दिली. तसंच या दोन रक्षकांना हे गोरिला आपले पालक मानतात असंही त्यांनी सांगितलं.
हे गोरिला 2007च्या जुलैमध्ये अनाथ झाले होते. तेव्हा ही पिलं अनुक्रमे दोन आणि चार महिन्यांची होती. त्यानंतर विरुंगाच्या सेंक्वेक्वे या अभयारण्यात आणलं. त्यांचं बालपण या रक्षकांच्या सोबतीनं गेल्यामुळं ते माणसाच्या हालचालींची नक्कल करतात.
माणसाप्रमाणे दोन पायांवर उभं राहाण्याचा प्रयत्न करतात. हे असं नेहमी होत नाही.
"मी जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा आश्चर्यचकीत झालो. गंमतही वाटली. गोरिला माणसाप्रमाणे दोन पायांवर उभं राहून कशी नक्कल करतात," हे पाहून कुतूहल वाटतं," असं मबुरान्वुम्वे यांनी सांगितलं.
पण या विरुंगा राष्ट्रीय उद्यानात उद्यानात काम करणं तितकं सोपं नाही. गेल्या वर्षी संशयित बंडखोरांबरोबर इथे झालेल्या चकमकीत 5 रेंजर्सचे प्राण गेले होते. तसंच 1996 पासून 130 जणांचा मृत्यू झाला आहे.
कांगोच्या पूर्व भागामध्ये सरकार आणि सशस्त्र गटांमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. काही सशस्त्र गट या राष्ट्रीय उद्यानातही आहेत. या उद्यानातच ते शिकारही करतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)