अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केलेली इराणची ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड’ नेमकी काय आहे?

फोटो स्रोत, TTA KENARE/AFP/GETTY IMAGES
इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सला (IRGC) विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.
अमेरिकेनं पहिल्यांदाच विदेशातल्या एखाद्या लष्कराच्या संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.
'इंप्लिमेंटिंग इट्स ग्लोबल टेररिस्ट कॅम्पेन' असा IRGCचा अर्थ होतो, असं व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे. ट्रंप यांनी इराणबरोबरचा आंतरराष्ट्रीय आण्विक करार संपवल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
IRGC आणि संबंधित संघटनांवर कट्टरवाद आणि मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिका करत आला आहे.
"परराष्ट्र मंत्रालयाचा हा खूप मोठा निर्णय आहे. इराण फक्त दहशतवादालाच प्रोत्साहन देत नाही तर IRGCयामध्ये सक्रीय आहे," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.
"यामुळे इराणवरील दबाव वाढेल. तुम्ही IRGCसोबत संबंध ठेवत असाल तर तुम्ही दहशतवादाचं समर्थन करत आहात," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटलं की, "हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी एक आठवडा लागेल. जोपर्यंत इराण एखाद्या सामान्य देशासारखा व्यवहार करणार नाही, तोपर्यंत दबावाचं राजकारण सुरुच राहिल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"इराणचे नेते क्रांतिकारी नाहीत. इथल्या जनतेला चांगलं जीवन जगायची इच्छा आहे. इथले नेते संधीसाधु आहेत. इथल्या लोकांची आम्हाला मदत करायची आहे," असंही त्यांनी म्हटलंय.
रिव्हॉल्युशनरी गार्ड काय आहे?
1979मध्ये इराणी क्रांतीनंतर देशात रिव्हॉल्युशनरी गार्डची स्थापना करण्यात आली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी हा निर्णय घेतला होता.
रिव्हॉल्युशनरी गार्डचा उद्देश नवीन सत्ता आणि लष्करासोबत सत्ता संतुलन राखणं हा होता.

फोटो स्रोत, Getty Images
इराणच्या शाहचं पतन झाल्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारला वाटलं की त्यांना एका अशा लष्कराची गरज आहे, जे नवीन निजाम आणि क्रांतीच्या उद्देशाची रक्षा करू शकेल.
इराणच्या मौलवींनी एक मसूदा तयार केला. त्यात लष्कराला देशाची सीमा आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. आणि रिव्हॉल्युशनरी गार्डला निजामाच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.
रिव्हॉल्युशनरी गार्ड कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठी मदत करतात. लष्कर आणि वायुसेनेला नियमितपणे त्यांचं सहकार्य लाभतं.
बदलत्या वेळेनुसार रिव्हॉल्युशनरी गार्ड इराणच्या लष्कराची आणि सत्ताधाऱ्यांची ताकद बनली.

फोटो स्रोत, Getty Images
इराणच्या सर्वोच्च नेत्यानं सोपवलेली प्रत्येक जबाबदारी रिव्हॉल्युशनरी गार्डचे कमांडर-इन-चीफ़ मोहम्मद अली जाफ़री यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं पार पाडली.
रिव्हॉल्युशनरी गार्डमध्ये सध्या सव्वा लाख सैनिक आहेत. लष्कर, नौसेना, हवाईदलाशी संबंधित हत्यारांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
रिव्हॉल्युशनरी गार्डचं सूत्र इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हातात आहेत. ते देशातल्या सशस्त्र दलांचे सर्वोच्च नेतेही आहेत.
या गार्डच्या महत्त्वाच्या पदांवर ते जवळच्या मित्रांची नियुक्ती करतात, जेणेकरून त्यांची गार्डवरील पकड मजबूत राहिल. रिव्हॉल्युशनरी गार्ड ईराणच्या अर्थव्यवस्थेच्या एक तृतीयांश भागाला नियंत्रित करतात, असं म्हटलं जातं.
इराणमधील तेल महामंडळ आणि इमाम रझा यांचा दर्गा यांच्यानंतर रिव्हॉल्युशनरी गार्ड देशातली तिसऱ्य़ा क्रमांकाची श्रीमंत संघटना आहे. याबदल्यात रिव्हॉल्युशनरी गार्ड चांगला पगार देऊन धार्मिक तरुणांची नियुक्ती करतं.
सीरियामधील युद्धादरम्यान रिव्हॉल्युशनरी गार्डचे अनेक कमांडर मारले गेले होते. जगभरातल्या इराणच्या दूतावासात रिव्हॉल्युशनरीगार्डचे जवान गुप्त पद्धतीनं काम करतात, असं म्हटलं जातं.
देशातील इराण समर्थक राष्ट्रांना ते शस्त्र पुरवतात, असं म्हटलं जातं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








